1. कृषीपीडिया

ऊस रोपवाटिका व्यवस्थापन

ऊस हे महाराष्ट्राचे महत्वाचे नगदी पिक असून या पिकांंमुळे ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक परिस्थितीत आमूलाग्र बदल घडून आला आहे. सध्याच्या काळांत व्यापारी तत्वावर आणि सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी करुन उत्पादकता वाढविणे सहज शक्य आहे. गादी वाफ्यावर ऊस रोप निर्मिती किंवा प्लास्टिक पिशवीत ऊस रोप तयार करुन शेतात पुर्नलागण केल्यास बियाण्यामध्ये तसेच सिंचनाच्या पाण्यामध्ये बचत होते, खतांची परिणामकारकता वाढते. आंतरपिकांची लागवड करण्याचे दृष्टिने आणि काही अपरिहार्य किंवा प्रतिकुल परिस्थितीत ऊस रोपे पुर्नलागण पध्दती फायद्याची ठरली आहे.

KJ Staff
KJ Staff


ऊस हे महाराष्ट्राचे महत्वाचे नगदी पिक असून या पिकांंमुळे ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक परिस्थितीत आमूलाग्र बदल घडून आला आहे. सध्याच्या काळांत व्यापारी तत्वावर आणि सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी करुन उत्पादकता वाढविणे सहज शक्य आहे. गादी वाफ्यावर ऊस रोप निर्मिती किंवा प्लास्टिक पिशवीत ऊस रोप तयार करुन शेतात पुर्नलागण केल्यास बियाण्यामध्ये तसेच सिंचनाच्या पाण्यामध्ये बचत होते, खतांची परिणामकारकता वाढते. आंतरपिकांची लागवड करण्याचे दृष्टिने आणि काही अपरिहार्य किंवा प्रतिकुल परिस्थितीत ऊस रोपे पुर्नलागण पध्दती फायद्याची ठरली आहे.

ऊसाची रोपे दोन पध्दतीने तयार करता येतात. गादी वाफ्यावर ऊस रोपे निर्मिती आणि दुसरी पध्दत म्हणजे एक डोळा पध्दतीने प्लास्टिक पिशवीतील रोपवाटीका.

गादी वाफ्यावर ऊस रोपे निर्मिती:

गादीवाफ्याची रोपे, लागवड केलेल्या ऊसामधील नांग्या भरण्यासाठी किंवा खोडवा ऊसामधील नांग्या भरण्यासाठी फायदेशीर आहे. काही वेळेंला शेतकरी लागण केलेल्या ऊसाच्या शेतात सरीच्या बग़लेला एक डोळंयाची ऊसाची लागवड करुंन, ती रोपे लागवडीसाठी वापरतात. त्याऐवजी गादीवाफ्यावर रोपे लागवड फायद्याची आहे.

  • ऊसाची लागवड करावयाच्या शेताशेजारीच गादी वाफ्यावर ऊसाची लागवड करते वेळी एक डोळ्याची लागवड करावी.
  • गादी वाफ्याच्या क्षेत्राची चांगली मशागत करुंन गरजेनुसार शेणखत मिसळूंन 1 मी. 1 मी.  20 ते 25 सेंमी. उंच असे गरजेनुसार गादी वाफे तयार करुन घ्यावेत.
  • गादीवाफ्यावर लागवड करण्यासाठी वापरलेले ऊस बेणे मळ्यातील 9 ते 1 महिने वयाचे चांगले रसरशीत बेणे वापरावे. बेण्यापासून एक डोळ्याचे 1.5 ते 2.5 इंच लांबीचे (वरील बाजूस 1 इंच व मुळांकडील बाजूस 1.5 ते 2 इंच ) तुकडे तयार करावेत.
  • बेणे 0.1% (1 ग्रॅम प्रति लिटर पाणी) बुरशीनाशकाच्या (बाविस्टीन) द्रावणात 5 ते 10 मिनिटे बुडवून नंतर अॅसिटोबॅक्टर+अॅझोटोबॅक्टर+अॅझोस्पीरीलम+स्फुरद विरघळविणारे जिवाणू खते प्रत्येकी 500 ग्रॅम असे एकूण 2 किलो एक एकर लागवडीसाठी (5,000 ते 6,000) रोपांसाठी 15 ते 20 किलो शेणाच्या मिश्रणात (10 ते 15 मिनिटे) बुडवून सावलीत 5 मिनिटे ठेवल्यानंतर लागवडीसाठी वापरावे.
  • रोपवाटीकेतील वाफे पाण्याने चांगले भिजवून घेवून एक डोळ्याचे तुकडे (60 ते 80 प्रति चौ.मी) गादी वाफ्यावर 15 से.मी. अंतर घेवून त्यावर टोकास टोक पद्धतीने डोळा बाजूला राहील अशा रितीने मातीत लावावेत व मातीने झाकून घ्यावेत. यामध्ये दोन ओळींतील अंतर 30 सेंमी ठेवावे.
  • लागण केलेल्या वाफ्यावर ऊसाचे बारिक केलेले पाचट किंवा भाताचा भुसा यांचा 0.5 ते 1 इंच जाडीचा थर पसरुंन त्यावर 1 ते 1.5 इंच चांगल्या गाळांच्या मातीचा थर द्यावा.
  • 5 ते 7 दिवसांनी वाफ्यावर पाणी द्यावे. वाफ्यामध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
  • साधारणपणे 1 महिन्याने रोपांना 3 ते 4 हिरवी पाने आल्यानंतर ही रोपे शेतात लागवडीसाठी वापरावीत.

एक डोळा पद्धत किंवा दोन पद्धतीने लागवड केलेल्या ऊसातील नांग्या भरण्यास ही पद्धत योग्य आहे. परंतु या पद्धती मध्ये रोपे उपटल्यानंतर मुळांंना ताण पडत असल्यामुळे रोपे मरतात म्हणून प्लास्टीक पिशवीत रोपे तयार करुन ती लागण केल्यास रोपे मरण्याचा धोका नसतो.  

एक डोळा पद्धती रोपवाटीका:

पाण्याची बचत, असाधारण परिस्थिती, हंगाम साधणे, पूर्व पिकाची काढणी न झाल्याने जमिनीची उपलब्धता आणि ऊस पिकाची उत्पादकता वाढविणे यासाठी प्लास्टिक पिशवीत एक ते दिड महिना रोपे वाढवून नंतर शेतात पुर्नलागण केल्यास फायद्याचे दिसून आले आहे. म्हणून या पद्धतीचा वापर हल्ली वाढू लागला आहे.

शास्त्रोक्त पद्धतीने प्लास्टिक पिशवीत रोपे तयार करणे:

  • रोपे तयार करण्यासाठी 1 मी. रूंद आणि रोपांच्या संख्येनुसार 5 ते 10 मी. लांब आकाराचे वाफे तयार करावेत. एक ब्रास पोयट्याची माती आणि चांगले कुजलेले शेणखत (3:1) या प्रमाणात घेउन यामध्ये 25 कि. युरिया, 50 कि. सिंगल सुपर फॉस्फेट टाकून चांगले मिश्रण करावे. हे मिश्रण 5x7 इंच आकाराच्या व तळाला 5-6 छिद्रे असलेल्या प्लास्टिक पिशवीत भरावे. पिशवीचा वरचा एक ते दिड इंच भाग पाणी देण्यासाठी मोकळा ठेवावा.
  • पिशव्या झारीच्या सहाय्याने किंवा वाफ्यात पाणी सोडून चांगल्या भिजवून घ्याव्यात.
  • लागणीसाठी 9 ते 10 महिने वयाचे चांगले रसरशित ऊस बेणे निवडावे. या बेण्यापासून 1.5 ते 2.5 इंच लांबीचे एक डोळ्याचे तुकडे करावेत.
  • हे एक डोळ्याचे तुकडे 5 ते 10 मिनिटे 0.1% बुरशीनाशकाच्या (बाविस्टीन) द्रावणात बुडवून नंतर अॅसिटोबॅक्टर+अॅझोटोबॅक्टर+अॅझोस्पीरीलम+स्फुरद+विरघळविणारे जिवाणू एका एकरासाठी 500 ग्रॅम असे एकूण 2 किलो, 15 ते 20 किलो शेणाच्या स्लरीत 5 ते १० मिनिटे बुडवून ५ मिनिटे सावलीत वाळंवून नंतर लागवडीसाठी वापरावे.जास्त थंडी असेल तर एक डोळ्याचे तुकडे १०० पी.पी.एम मिरॅकुलान किंवा जिब्रॅलिक अ‍ॅसिडच्या द्रावणात बुडवून लावावेत.
  • डोळां असलेला भाग पिशवीत वरच्या बाजूस राहून, कांडीचा सर्व भाग मातीखाली झाकला जाईल याची काळजी घेणे जरुरीचे असते. या पिशव्यांना दर 3-4 दिवसांतून झारीच्या अथवा पाईपच्या सहाय्याने वाफ्यात पाणी दयावे. एक ते दिड महिन्यांच्या रोपांना 3-4 हिरवी पाने आल्यानंतर शेतात लागवड करावी.

पिशवीतील रोपांची शेतात पुर्नलागवड:

जमिनीच्या प्रतिनुसार हलक्या जमिनीसाठी 3 फूट, मध्यम व भारी जमिनीसाठी ४ फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. साऱ्यांची दुरुस्ती करुन पाणी देण्यासाठी उभे-आडवे पाट पाडून घ्यावेत. लागण करण्यासाठी शेताला हलके पाणी दयावे आणी 4-5 दिवसांनी वाफसा आल्यानंतर साऱ्यांमध्ये दोन रोपांत 60 सेंमी. अंतर ठेवून पिशव्या पूर्ण गाडल्या जातील या मापाचा खड्डा घेवून पिशव्या फाडून रोपांची अलगद लागवड करावी. रोपांची संख्या जमिनीच्या प्रतिनुसार एक हेक्टरसाठी 11,000 ते 16,700 ठेवावी किंवा शेतात ओली लागवड करण्यासाठी शेताला आगोदर पाणी दयावे. पाणी मुरल्यानंतर एक ते दिड महिन्यांनी रोपे मातीच्या गोळ्यासहीत 10-15 मिनिटांपूर्वी पाणी दिलेल्या सरीत अलगदपणे चिखलात 60 सेंमी. अंतरावर दाबावे. 10-15 दिवसांनी सांधनी करावी. शिफारशीत खता व्यतिरिक्त जास्त फुटवे येण्यासाठी 2, 3 व 4 थ्या महिन्याला 500 पी.पी.एम (1.25 मि.ली प्रति 1 लीटर पाणी) या प्रमाणात इथेलच्या द्रावणाची फवारणी करावी.

रोप लागणीचे फायदे:

  • सुरुवातीचा उगवणीचा काळ, एक ते दीड महिन्यापर्यंत रोपे पिशवीत वाढत असल्यामुळें या काळांत जमिनीस विश्रांती मिळते. या काळात हिरवळीच्या खताचे पीक घेण्यास किंवा हंगामामधील घेतलेल्या पिकाच्या काढणीस अवधी असल्यास रोपे पिशवीत वाढवून हंगाम साधता येतो.
  • सुरुवातीच्या काळात पाणी उपलब्ध नसल्यास किंवा मान्सून ऊशीरा सुरु झाल्यास हंगामात लागवड करता येते.
  • तणांचा बंदोबस्त सुरुवातीच्या काळांत औजारांच्या सहाय्याने करता येतो.
  • रोपांची लागवड केल्यामुळे 90 ते 100 टक्के उगवण होवून योग्य प्रमाणात फुटव्यांचे प्रमाण ठेवून, एका रोपाला 9 ते 10 गाळण्यालायक अधिक वजनाच्या ऊसांची संख्या साधता येते.
  • सर्व अन्नद्रव्ये रोपांच्या मुळांजवळ दिल्यामुळे खतांचा अपव्यय होत नाही.
  • सर्व रोपांना सुर्यप्रकाश, अन्नद्रव्ये,पाणी आणी वाढीव इतर घटक योग्य आणी सारख्या प्रमाणात मिळांल्यामुळे सर्व ऊसांची वाढ एकसारखी (ऊस संख्या एकरी 45 ते 50 हजार) होवून उत्पादनात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होते
  • क्षारपड जमिनीत ऊसाची उगवण खूपच कमी होते किंवा उगवलेल्या रोपांचा जोम कमी राहतो. परंतू प्लास्टिक पिशवीत रोपे तयार करुंन लागण केल्यास रोपांचा वाढीचा जोर चांगला राहून वाढ चांगली राहते.
  • लागवड केलेल्या ऊसातील नांग्या भरण्यासाठी किंवा खोडवा पिकातील नांग्या भरण्यासाठी प्लास्टिक पिशवीतील रोपाचा वापर फायदेशीर आहे.
  • नवीन वाण प्रसारीत झाल्यावर बियाणे कमी असल्यास प्लास्टिक पिशवीत रोपे तयार करून लागवड केल्यास कमी बेण्यापासून जास्त क्षेत्रावर लागवड करता येते.

तसेच सध्याच्या परिस्थितीचा विचार करता महिला बचत गटाच्या माध्यमातून रोपांची निर्मिती आणि त्यांच्या पुर्नलागणीचे काम यशस्वीरित्या राबवले जाऊ शकते.

म्हणजेच ऊस रोपनिर्मितीचे, रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात देखील असाधारण महत्व आहे. याद्वारे महिला सबलीकरणास आणि सक्षमीकरणास हातभार लागेल यात शंकाच नाही.  प्रतिकुल परिस्थितीत ऊस रोपे पुर्नलागण पध्दती फायद्याची

बेण्यापासून एक डोळ्याचे 1.5 ते 2.5 इंच लांबीचे (वरील बाजूस 1 इंच व मुळांकडील बाजूस 1.5 ते 2 इंच ) तुकडे तयार करावेत.

एक डोळ्याची लागवड करावी

 

रोपांना सुर्यप्रकाश, अन्नद्रव्ये,पाणी आणी वाढीव इतर घटक योग्य आणी सारख्या प्रमाणात मिळांल्यामुळे सर्व ऊसांची वाढ एकसारखी (ऊस संख्या एकरी 45 ते 50 हजार) होवून उत्पादनात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होते.

साधारणपणे 1 महिन्याने रोपांना 3 ते 4 हिरवी पाने आल्यानंतर ही रोपे शेतात लागवडीसाठी वापरावीत.


प्रा. संग्राम पाटील, डॉ. महेश बाबर, अश्विनी गायकवाड

(कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा)

English Summary: sugarcane nursery management Published on: 21 September 2018, 02:29 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters