1. बातम्या

...आणि बाहेरची जनावरे चक्क अजितदादांनी ताणली!! दादांनी सांगितला तो किस्सा

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना फ्रायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाते. तसेच अजित पवार शिस्तप्रिय, रोखठोक आणि शब्द पाळणारा नेता म्हणून ओळखले जातात. अजित पवार भाषणावेळी अनेक जुने रंजक किस्से सांगत असतात. असाच एक किस्सा अजित पवार यांनी कन्हेरीत लक्ष्मीमाता मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्ताने भाषणावेळी सांगितला आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
ajit pawar

ajit pawar

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना फ्रायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाते. तसेच अजित पवार शिस्तप्रिय, रोखठोक आणि शब्द पाळणारा नेता म्हणून ओळखले जातात. अजित पवार भाषणावेळी अनेक जुने रंजक किस्से (Old funny stories) सांगत असतात. असाच एक किस्सा अजित पवार यांनी कन्हेरीत (Kanheri) लक्ष्मीमाता मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्ताने भाषणावेळी सांगितला आहे.

अजित पवार हे महाराष्ट्राचे (Maharashtra) ४ वेळा उपमुख्यमंत्री झाले आहेत. आता नुकतीच त्यांची राज्याच्या विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे. अजित पवार हे सतत रोखठोक बोलत असतात. तसेच त्यांच्या कामाच्या शैलीचे अनेक वेळा कौतुक केले जाते.

कान्हेरी आणि काटेवाडी (Katewadi) मधील जुन्या मित्रांसोबतच्या आठवणींना अजित पवार यांनी उजाळा दिला आहे. अजित पवार म्हणाले, त्यावेळचा कन्हेरीचा माळ आणि आजची कन्हेरी यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पूर्वी येथे पाणी नव्हते.

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची उद्यापासून विक्री सुरू; जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्ये

कालव्यावरून पाईपलाईन आणायचा खर्च पाहूनच सारे गप्प बसायचे. मात्र नंतर एकापाठोपाठ पाच लिफ्ट योजना येथे झाल्या. मला आठवते, कन्हेरीतील या माळावर दत्ता शिंदे, अकबर, मुल्ला आम्ही फिरायचो. एकदा बाहेरची जनावरे आली होती. मग आम्ही ट्रॅक्टर घेऊन जनावरांना ताणत होतो.

एलआयसी फक्त 100 रुपयांमध्ये देत आहे 75 हजार रुपयांचा नफा

भाषणावेळी अजित पवार यांनी झालेल्या हल्ल्याचाही किस्सा सांगितला आहे. दादा म्हणाले, आपल्याला हे माहिती आहे की, इथल्या लोकांवर पारधी समाजातील काही जणांकडून हल्ला झाला. त्यानंतर बरेच काही घडले ते फार खोलवर जाऊन सांगत नाही. दादांनी हा किस्सा सांगतानाच कन्हेरीचे बाळासाहेब पवार यांनी त्यांच्या कानात ती व्यक्ती समोरच होती असे सांगताच हशा पिकला.

महत्वाच्या बातम्या:
कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! कापसाला मिळणार सोन्याचा भाव
सावधान! महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये लंपी रोगाचा फैलाव, 11 लाखांहून अधिक जनावरे बाधित

English Summary: ...and the animals outside were quite stretched by Ajit dada!! Published on: 02 September 2022, 11:05 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters