मुंबई: राज्यात शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात (Shinde Group) जोरदार वाकयुद्ध सुरु आहेत. त्यामुळे राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून दावेप्रतिदावे केले जाते आहेत. पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, 32 वर्षांचा पोरगा उठतो आणि आमच्यावर टीका करतो. अरे बाबा तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत असा कडवा टोला पाटील यांनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) लगावला आहे.
पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “मी गुवाहाटी गेलो. तेव्हा पत्नी-मुलांचे फोन आले की परत या. पण आता परत येत नाही असं मी त्यांना ठणकावून सांगितलं. ज्याप्रमाणे अली बाबा के चालीस चोर थे तसं आम्ही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत! या शब्दात इतिहास लिहिला जाईल” असेही ते म्हणाले.
CNG Cars: संधीच करा सोनं! या वेबसाइटवर मिळतायेत सर्वात स्वस्त सीएनजी कार...
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे गेलो होतो. त्यांना सांगितले की, गेलेल्या आमदारांना परत बोलवा. असे केले असते तर सरकार वाचू शकले असते. मात्र त्यावेळी त्यांनी उडाले ते कावळे, राहिले ते मावळे अशी भाषा वापरण्यात आली. ते पटणारे नव्हते, असे म्हणत गुलाबराव पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विषयचं हार्ड! स्वतःची बाईक चोरीला गेली म्हणून पठ्याने चोरल्या तब्बल 29 बाईक
गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली. “चहा पेक्षा किटली गरम”, असा टोला गुलाबराव पाटलांनी राऊतांना लगावला. कोण आहेत संजय राऊत? आमदारांनी मतं दिली म्हणून ते खासदार झाले.
महत्वाच्या बातम्या:
PM Kisan: प्रतीक्षा संपली! या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 12 व्या हफ्त्याचे 2000 हजार रुपये
...तर भाजप २०२४ ला फक्त ५० जागांवर निवडून येईल
Share your comments