1. बातम्या

"शिंदे यांच्याविरोधात पातळी सोडून बोलाल तर चून चून के, गिन गन के मारे जायेंगे"

राज्यात शिवसेनेतून बाहेर पडत काही आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वाद निर्माण होताना दिसत आहेत. शिवसेना कोणाची असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे. बुलढाण्यात शिवसेना समर्थक आणि शिंदे समर्थक यांच्यामध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
eknath shinde-sanjay gaikwad

eknath shinde-sanjay gaikwad

राज्यात शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडत काही आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपबरोबर (BJP) सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वाद निर्माण होताना दिसत आहेत. शिवसेना कोणाची असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे. बुलढाण्यात शिवसेना समर्थक आणि शिंदे समर्थक यांच्यामध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला आहे.

शिंदे गटाचे बुलढाण्याचे (Buldhana) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी या राड्यानंतर थेट धमकीच (threat) दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पातळी सोडून बोलाल तर चून चून के, गिन गन के मारे जायेंगे अशी धमकी संजय गायकवाड यांनी दिली आहे.

बुलढाण्यामध्ये शनिवारी ठाकरे गटाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी आमच्या नेत्यांवर टीका का करता, असं म्हणत शिंदे गटाच्या आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना राडा केला.

ठाकरे-शिंदे गटाच्या दसरा मेळावा मैदान वादात शरद पवारांची उडी; म्हणाले, मेळावा घेण्याचा अधिकार...

कुणाल गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या स्थळी दाखल झाले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली होती.

एकनाथ शिंदेंसाठी टेन्शन वाढले, गटातले ४ आमदार नाराज झाले तरी सरकारचा खेळ खल्लास!

या राड्यात पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. कार्यक्रमध्ये ठेवण्यात आलेल्या खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. तसेच नियोजित कार्यक्रम उधळून लावण्यात आला. या राड्यावेळी पोलीस उपस्थित होते तरीही हा राडा त्यांच्यासमोर झाला. या संपूर्ण राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलंय.

महत्वाच्या बातम्या:
भारीच की! iPhone 12 वर मिळत आहे 25 हजार रुपयांहून बंपर सूट; पहा ऑफर...
Gold Price: सणासुदीच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी! सोन्याच्या भावात घट, 5600 रुपयांनी स्वस्त...

English Summary: if you leave the level and speak against Shinde" Published on: 04 September 2022, 11:32 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters