1. बातम्या

...तर भाजप २०२४ ला फक्त ५० जागांवर निवडून येईल

देशात सध्या अनेक विरोधी पक्ष भाजपला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कमी जागा कशा मिळतील यावर लक्ष देत आहेत. त्यामुळे देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्यासाठी मोट बांधत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत. त्याअगोदर नितीश कुमार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
BJP

BJP

देशात सध्या अनेक विरोधी पक्ष भाजपला (BJP) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) कमी जागा कशा मिळतील यावर लक्ष देत आहेत. त्यामुळे देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्यासाठी मोट बांधत आहेत. बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत. त्याअगोदर नितीश कुमार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

नितीश कुमार हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नितीश कुमार म्हणाले, २०२४ ची लोकसभा निवडणूक विरोधकांनी एकत्र येत लढवली तर भाजप फक्त ५० जगणावर निवडून येईल. मणिपुरमधील जनता दल युनायटेडच्या (JDU) पाच आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

त्यानंतर नितीश कुमार हे नाराज असल्याचे दिसत आहे. तसेच त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तर भाजपकडूनही त्यांना प्रतित्युत्तर दिले जात आहे.
नितीश कुमार यांनी भाजपवर पैशाच्या जोरावर आमदार फोडले असल्याचा आरोप केला आहे.

सर्व विरोधकांनी एकत्र येत २०२४ ची लोकसभा निवडणूक (2024 Lok Sabha Elections) लढवली पाहिजे तेव्हाच भाजपचा पराभव होऊ शकतो असे नितीश कुमार म्हणाले आहेत.

"शिंदे यांच्याविरोधात पातळी सोडून बोलाल तर चून चून के, गिन गन के मारे जायेंगे"

विरोधकांना एकत्र आणून भाजप विरोधात मोट बांधण्याचे काम त्यांनी हाती घेतले असल्याचे सांगितले आहे. नितीश कुमार यांच्या भाषणानंतर लगेचच भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे. बिहार भाजपचे (BJP Bihar) अध्यक्ष संजय जायसवाल यांनी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन ऊर्फ ललनसिंह यांच्यावर जोरदार शाद्बिक हल्ला चढवला.

जर पैशांच्या जोरावर विधायक फोडता येत असतील तर ,राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अर्धा डझन आमदार फोडण्यासाठी जेडीयूने किती कोटी रुपये खर्च केले असा सवाल त्यांनी विचारला. ज्यावेळी आरजेडी, काँग्रेस आणि इतर पक्ष फोडले त्यावेळी जेडीयूची नैतिकता कुठे गेली होती, असा खोचक प्रश्न ही त्यांनी विचारला.

EPFO: व्यवसाय करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शन; EPFO ​​ची योजना

जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन ऊर्फ ललनसिंह यांनी भाजपच्या आरोपांना उत्तर दिले आहे. ते म्हणाले, आम्ही कोणताही पक्ष फोडला नाही. पण त्या पक्षातील काही आमदारांना जेडीयूत प्रवेश करायचा होता.

मग ते काँग्रेसचे असो वा आरजेडीचे, त्यांना पक्षात घेण्यात आले, असे त्यांनी सांगितले. भाजपने कितीही जोर लावला तरी त्यांचे मनसुबे सफल होणार नाहीत, असा टोलाही ललन सिंह यांनी भाजपला लगावला. भाजपने कितीही डावपेच टाकू द्या, त्यांना यश येणार नसल्याचा दावा ललन सिंह यांनी केला.

महत्वाच्या बातम्या:
विषयचं हार्ड! स्वतःची बाईक चोरीला गेली म्हणून पठ्याने चोरल्या तब्बल 29 बाईक
CNG Cars: संधीच करा सोनं! या वेबसाइटवर मिळतायेत सर्वात स्वस्त सीएनजी कार...

English Summary: while BJP will be elected in 2024 on only 50 seats Published on: 04 September 2022, 03:41 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters