कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी बांधवांचा सक्षम साथीदार असणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननिय डॉ.विलास भाले यांचे मार्गदर्शनात विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्राचे प्रक्षेत्रावर संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांचे प्रमुख उपस्थितीत बैलपोळा साजरा करण्यात
आला. या प्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विभाग प्रमुख पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग डॉ. शेषराव चव्हाण, मध्यवर्ती संशोधन केंद्राचे संचालक डॉ. हरमनसिंग सेठी, डॉ. गोविंद जाधव, डॉ. एस. एस. तायडे, उपकुलसचिव श्री राजीव कटारे, डॉ. सतीश ठाकरे, डॉ. जयंत देशमुख, कुलगुरू कार्यालयाचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, तांत्रिक अधिकारी डॉ. नीरज सातपुते, श्री. सुहास कोळेश्वर, विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी
डॉ. किशोर बिडवे, यांचे सर्व यांचेसह सर्व प्रक्षेत्र प्रभारी, अधिकारी, कर्मचारी, कामगार वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यापीठाचे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागामध्ये संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषि अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, विभाग प्रमुख डॉ. शेषराव चव्हाण, उपकुलसचिव श्री. राजीव कटारे, यांच्या शुभहस्ते बैलांची मनोभावे पूजा करण्यात आली By the auspicious hand of Rajiv Katare, the bulls were worshiped enthusiastically व ठोंबरा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. याप्रसंगी पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे डॉ. राजेश्वर
शेळके, डॉ.किशोर बिडवे, डॉ. संजय शेगोकार, डॉ. संजीव नागे, डॉ. प्रकाश कहाते, श्री. राजेश ढगे, श्री. रवि पवार, श्री. शशिकांत गोटे ,श्री. सतीश मुन्नरवार, श्री. जगदीश राठोड, श्री. गिरीश बानोकार आदींची उपस्थिती होती.तर विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रक्षेत्रावर सुद्धा विभाग प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार यांचे प्रमुख उपस्थितीत बैलांची पूजा
करण्यात आली. याप्रसंगी उद्यानविद्या विभागातील फुलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन गुप्ता, कृषी विद्या विभागाचे डॉ. जयंत देशमुख, डॉ. नितीन पत्की, डॉ. नितीन राऊत, डॉ.मिलिंद गिरी, डॉ. इसाळ यांचे सह सर्वच शास्त्रज्ञ, अधिकारी- कर्मचारी यांचेसह सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे व विभागाचे सर्वच अधिकारी, कर्मचारी, कामगार वृन्द मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share your comments