1. बातम्या

शेती "या" सात मार्गांनी आधुनिक आणि स्मार्ट होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली संपूर्ण माहिती

गेल्या सात वर्षांत बियाण्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत अशा अनेक नवीन प्रणाली तयार केल्या आहेत. ज्याचा कृषी क्षेत्राला खूप फायदा होत आहे. जुन्या यंत्रणा सुधारल्या आहेत. अवघ्या सहा वर्षांत कृषी अर्थसंकल्प अनेक पटींनी वाढला आहे, शेतकऱ्यांचे कृषी कर्जही सात वर्षांत अडीच पटीने वाढले आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
PM Modi

PM Modi

गेल्या सात वर्षांत बियाण्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत अशा अनेक नवीन प्रणाली तयार केल्या आहेत. ज्याचा कृषी क्षेत्राला खूप फायदा होत आहे. जुन्या यंत्रणा सुधारल्या आहेत. अवघ्या सहा वर्षांत कृषी अर्थसंकल्प अनेक पटींनी वाढला आहे, शेतकऱ्यांचे कृषी कर्जही सात वर्षांत अडीच पटीने वाढले आहे. कोरोनाच्या काळात ३ कोटींहून अधिक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड (KCC) शी जोडले गेले आहेत. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सूक्ष्म सिंचनामुळे छोट्या शेतकऱ्यांना मदत होत आहे. नैसर्गिक शेती, हायटेक शेती, बाजरीचे महत्त्व, स्मार्ट शेती आणि खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्णता या विषयांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. पीएम मोदींनी प्रामुख्याने शेतीला आधुनिक आणि स्मार्ट बनवण्यासाठी सात मार्ग सांगितले आहेत.

हेही वाचा : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जोडव्यवसयांना सरकारचे पाठबळ; योजनांचा मिळणार लाभ

ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर ऊस पेटवून देण्याची वेळ; कोण उठलंय शेतकऱ्यांच्या मुळावर?

शेतीच्या आधुनिकीकरणाचे सात मार्ग

१. गंगेच्या दोन्ही काठावर 5 किमीच्या परिघात नैसर्गिक शेती मिशन मोडवर करण्याचे लक्ष्य आहे. वनौषधी, औषधी वनस्पती आणि फळे, फुले यावरही भर दिला जात आहे.

२. शेती आणि फलोत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाईल.

३. खाद्यतेलाची आयात कमी करण्यासाठी आम्ही मिशन ऑईल पाम तसेच तेलबियांना जास्तीत जास्त बळकट करण्याचा प्रयत्न करत आहोत. यावर भर देण्यात आला आहे.

४. पीएम गतिशक्ती योजनेद्वारे कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी लॉजिस्टिकची नवीन प्रणाली तयार केली जाईल.

५. कृषी-कचरा व्यवस्थापन अधिक संघटित होईल. वेस्ट टू एनर्जी या उपायांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.

६. देशातील दीड लाखांहून अधिक टपाल कार्यालयांना नियमित बँकांप्रमाणे सुविधा मिळतील, जेणेकरून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

७. कृषी संशोधन आणि शिक्षणाशी संबंधित अभ्यासक्रमातील कौशल्य विकास, मानव संसाधन विकास हे आजच्या आधुनिक काळानुसार बदलले जातील.

हेही वाचा : सोयाबीनला उच्चांकी भाव; शेतकरी सुखावला

शेतकऱ्यांनो पारंपरिक शेती सोडा आणि करा जेरेनियमची लागवड; डोळे झाकून कमवा ५ लाख

देशातील कृषी क्षेत्रात किसान ड्रोनचा जास्तीत जास्त वापर करण्याचा उपक्रम हा याच बदलाचा एक भाग आहे. जेव्हा आम्ही कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देऊ तेव्हाच ड्रोन तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल. प्रति ड्रॉप मोअर क्रॉपवर सरकारचा भर आहे आणि ही काळाची गरजही आहे. व्यापार जगतासाठीही यामध्ये भरपूर वाव आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा : अफगाणिस्तानने कितीपण कुरघोड्या केल्या तरी, भारताने जपला माणूसकीचा धर्म, अन्यधान्यांची केली मोठी मदत

English Summary: Agriculture will be modern and smart in seven ways Published on: 24 February 2022, 05:06 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters