“माझा एक दिवस बळीराजासाठी” उपक्रमांतर्गत कृषि विद्यापीठ व कृषि विभाग शेतकऱ्याच्या शेतावर: प्रक्षेत्र भेटीचे आयोजन तसेच शेतकऱ्याच्या समस्या घेतल्या जाणून डॉ विलास भाले यांनी कुलगुरू पदाचा शेवटचा दिवस घालवीला शेकऱ्याच्या बांधावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला आणि कृषि विभाग, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने *“माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी”* या उपक्रमांतर्गत मौजे टाकरखेड हेलगा, ता. चिखली, जि. बुलढाणा येथे दि. ०३ सप्टेंबर २०२२ रोजी डॉ.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. विलास भाले,Panjabrao Deshmukh Agricultural University Akola Vice Chancellor Dr. luxury spears, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संशोधन विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, विद्यापीठ नियंत्रक मा. श्री. प्रमोद पाटील यांचे सह विभागीय सहसंचालक अमरावती विभाग श्री.किसन मुळे,वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा डॉ. अनिल तारू, डॉ. जगदीश वाडकर, शास्त्रज्ञ विस्तार शिक्षण, डॉ. प्रवीण देशपांडे, कीटकशास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा, डॉ. दिनेश कानवडे, शास्त्रज्ञ, कृषि
संशोधन केंद्र, बुलढाणा, डॉ, सतीशचंद्र जाधव, प्राचार्य, कृषि तंत्र विद्यालय, बुलढाणा, श्री. संतोष डाबरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा, श्री. अमोल शिंदे, तालुका कृषि अधिकारी, चिखली आणि श्री. पंढरी यशवंत गुंजकर यांच्या शेतावर उपस्थिती लाभली.माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाचे प्रास्ताविक श्री. डाबरे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले. विभागीय कृषि सहसंचालक श्री किसन मुळे यांनी शेतकरी बांधवांनी खचून न जाता शासनाच्या योजनाचा लाभ घेऊन
अधिक शेतीतील उत्पन्न वाढवावे असे आवाहन केले आणि माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमास सर्वांनी प्रतिसाद देऊन आपल्या समस्या सर्व विभागातील साधिकारी कर्मचारी जे गावात येतील त्यांना कळवाव्यात असे आवाहन केले.विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील कीड उपद्रवाचा प्रकार ओळख लक्षात घेऊन सर्वेक्षण करून गरज असेल तरच कीटकनाशकांचा वापर करावा व पीक संरक्षणासाठी होणारा खर्च कमीत कमी करावा असे त्यांच्या मार्गदर्शनात संबोधित केले.
संशोधन संचालक डॉ. खर्चे यांनी विद्यापीठ प्रसारित तंत्रज्ञान व वाणांचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले.ज्यांच्या शेतावर कार्यक्रम आयोजित केला होता असे श्री गुंजकर यांनी नवीन पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता शासनाच्या विविध योजनाचा उत्साहाने लाभ घेऊन शेतामध्ये प्रत्यक्ष कष्ट करावे आणि नवनवीन प्रयोग करावेत असेआपल्या अनुभव कथनातून आवाहन केले.अध्यक्षीय भाषणात सन्माननीय कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी कृषि विद्यापिठाचा आणि सर्व सलग्न कृषि
संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्राचा आणि कृषि विभागाचा प्रत्येक दिवस शेतकऱ्याचा आहे असे सांगत आजच्या काळात जे विकेल ते पिकेल या भावनेतून आणि बाजारपेठेमध्ये ज्या शेतीमालाला भाव आहे ती पिके घेणे आज काळाची गरज आहे असे सांगितले. स्वतःच्या कुटुंबासाठी जे आवश्यक आहे ते स्वतः पिकवावे आणि आपल्या गावातच लहान प्रक्रिया उद्योग उभारून गावाची गरज भागेल ते तयार करावे असे संबोधित केले. आपल्या शेतावर
मुंग, उडीद, तूर, जवस, ज्वारी, बाजरी, गहू, तेलवर्गीय पिके लागवड करून सर्व अन्नधान्य घरीच तयार करावीत आणि उर्वरित धान्य प्रक्रिया करून उद्योग उभा करावेत आणि विक्री व्यवसायात उतरावे असे आवाहन केले.कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थिती राहिले आणि कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. जगदीश वाडकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. अमोल शिंदे, तालुका कृषि अधिकारी, चिखली यांनी केले.
Share your comments