1. बातम्या

कृषी उत्पादनाच्या विपणनला लॉकडाऊनमधून सूट ; १५ दिवसातून एकदा सुरू राहिल अंगणवाडी

KJ Staff
KJ Staff


कोरोना व्हायरसमुळे देशातील अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता आहे. आपली अर्थव्यवस्था कोलमडणार नाहीय यासाठी सरकार विविध निर्णय घेत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी उद्योगाचे काम लॉकडाऊनमुळे ठप्प पडू नये, यासाठी केंद्र सरकारने ताबोडतोडपणे कृषीशी संलग्न असलेल्या उद्योगांना कामांना सूट दिली आहे.नेहमी निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान सोसणाऱ्या बळीराजाला या लॉकडाऊनमधून सरकार बाहेर काढत आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून कृषी उत्पादनाच्या विपणनाला आणि अंगणवाडी कार्यकर्त्ये, आयुष संबंधित आरोग्य सुविधांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारने यासंबंगी राज्यांना सुचना दिल्या आहेत.

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांशी पत्रव्यवहार केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, उपयुक्त सेवा आणि लॉजिस्टिक्सला इतर सेवांबरोबर सूट द्यावी. या सेवांमध्ये खाद्य वितरण आणि मुले आणि महिलांना १५ दिवसातून एकदा अंगणवाडी कार्यकर्त्यांद्वारे पोषण सहायता उपलब्ध करणे याचा ही यात समावेश आहे.याआधी कृषीशी संलग्न कामांना लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली होती. बाजार समित्या, मंडईशिवाय कृषी उद्योगाशी निगडित सर्व कामांना सूट देण्यात आली होती. सध्या रब्बी पिकांची कापणी/ काढणीचे कामे चालू आहे. पण लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला होता. परंतु सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची दखल घेत काढणींच्या कामांना यातून वगळ्यात आले. गृहमंत्रालयाने याविषयीचे निर्देश दिले होते. त्यानुसार सरकार शेत मजूर, खते, कीटकनाशके आणि बि-बियाणे निर्मिती आणि पॅकेजिंग युनिटलाही या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली होती.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters