शेतकऱ्यांच्या मनोरंजनाचा भाग म्हणजे बैलगाडा शर्यत होय अशी भावना अनेक शेतकरी व्यक्त करत असतात. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांसह बैलगाडा हौशी बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवण्यासाठी प्रयत्न करत होते. जेव्हा सर्वोच्च न्यायालायने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवली तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले गेले. नुकतीच देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ही पुणे जिल्ह्यात भरवण्यात आली होती. त्यानंतर कर्जत येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर आता राज्यात ठिकठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. या मध्ये कितीतरी दुर्घटना घडतात. या स्पर्धेत बैलांचे हाल होत आहेत का असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे. अशीच एक घटना घडली आहे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळमधील कुकटोळी गावामध्ये. या गावात बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
बैलगाडा हौशी असणाऱ्यांच्या उपस्थितीत ही शर्यत सुरू झाली. अतिशय थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी शर्यत सुरु असताना अचानक एक बैल पाय घसरून पडला मात्र दुसऱ्याच क्षणी उठून तो पळू लागला. पाय घसरून पडला आणि लगेचच उठून बैल पळू लागल्याने बैलप्रेमींनी टाळ्या आणि शिट्टी वाजवून त्याचे कौतुक केले.
आता तासंतास नंबरला बसण्याची गरज नाही; फिरत्या सलूनची होतीये राज्यभर चर्चा
कुकटोळी गावामध्ये बैलगाडाप्रेमींच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला होता. शर्यत सूटल्यानंतर अवघ्या काही वेळातच एका बैलजोडीतील एका बैलाचा धावत असतानाच पाय घसरला. हा बैल चारही पायावर पडला. असा प्रकार घडताच बैलगाडी मालकाने दुसऱ्या बैलाची वेसण ओढत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र क्षणातच पडलेल्या बैलाने उठून पुन्हा पळण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार बघून सगळ्या बैलगाडाप्रेमींनी टाळ्या आणि शिट्टी वाजवत त्या त्या बैलाचे कौतुक केले.
शर्यतीमुळे बैलांचे हाल
शर्यतीमुळे बैलांचे हाल होत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुदैवाने या अपघातात बैलाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र शर्यत आयोजित केल्यानंतर त्यात बैलांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही तसेच बैलांचा कोणत्याही कारणाने छळ होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असल्याचे समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द; शेतकऱ्यांची लूट केल्याप्रकरणी कृषी विभागाची मोठी कारवाई
शेतकऱ्यांनो काळजी घ्या; पुढील चार दिवस महत्वाचे,13 जिल्ह्यांमध्ये जारी केला यलो अलर्ट
Share your comments