1. बातम्या

जाणून घ्या! अधिक नफा देणाऱ्या शेती व्यवसायातील गोष्टी

KJ Staff
KJ Staff


शेतीपासून आपल्याला हवे तितके उत्पन्न मिळत नसेल तर शेतीसह जोडव्यवसाय केल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.   शेतीसह आपले उत्पन्न कसे दुप्पट करायचे याची कल्पना आम्ही तुम्हाला देत आहोत.   शेतीबरोबर कोणते व्यवसाय केल्याने किंवा कमी पैशाची गुंतवणूक करून अधिक उत्पन्न कसे मिळेल याची माहिती या लेखात आम्ही तुम्हाला देत आहोत.  या व्यवसायातून कशाप्रकारे लाखो रुपये कमावता येतील, याविषयी आपण जाणून घेऊ.

फुलांचा व्यवसाय - शेतात सर्वात लवकर कुठले पीक येत असेल तर ते म्हणजे फुले. फुलांना विविध कार्यक्रमात मागणी असते.  देव -धर्माचे काम असो किंवा कोणाचा सत्कार फुलांना त्या कार्यक्रमात मागणी असतेच.  विशेष म्हणजे या व्यवसायात मोठा नफा मिळतो.
खाद्य आणि खतांचा व्यवसाय - अधिक उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी आपल्या शेतात खतांचा वापर करत असतात.  दर हंगामाला खतांची मागणी मोठी असते. हा व्यवसाय बहुतेक वेळा शासननियंत्रित असतो.
सेंद्रिय शेती , ग्रीन हाऊस - अधिक उत्पन्न मिळावे, यासाठी शेतकरी आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर करत असतात. सध्याच्या काळात हायब्रीड पिकांचे मोठे लोन आले आहे. यामुळे कमी वेळात आणि कमी खर्चात जास्त उत्पादन शेतकऱ्यांना मिळत असते.   परंतु आरोग्याच्या समस्या नागरिकांना येत असल्याने नागरिक परत सेंद्रिय शेताकडे वळले आहेत.
पोल्ट्री फार्म - शेतीसोबत सर्वाधिक कमाई देणारा व्यवसाय म्हणजे, पोल्ट्री फार्म. पोल्ट्री फार्म टाकून बळीराजा लाखो रुपयांचा नफा मिळत आहेत.
 आळंबीची  शेती- याची शेतीही खूप फायदेशीर असते. सुरुवातीला अगदी कमी खर्चात तुम्ही याची शेती करु शकतात.   याच्या शेतीसाठी तुम्ही थोडी माहिती गोळा केली किंवा तज्ज्ञांचा मार्गदर्शन घेतले तर तुमचा नफा नक्कीच अधिक होईल.
हाईड्रोपोनिक रिटेल स्टोर व्यवसाय - याला वृक्षारोपण तंत्र म्हणतात. हाईड्रोपोनिक रिटेल स्टोरला वाणिज्यिक आणि घरगुती या दोन्हींसाठी याचा उपयोग होतो.  या तंत्राने माती न वापरता वृक्षरोपण केले जाते.

सुर्यफुलाची शेती - या शेतीसाठी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. याला कमर्शियल कॅश क्रॉप व्यापारीक पीक पण याला म्हटले जाते. याच्यातून पण तुम्ही मोठा नफा कमावू शकता.
मस्यपालन - हा व्यवसाय तुम्ही वर्षातून कधीही करु शकता. मत्स्य शेतीसाठी आधुनिक तंत्र आणि थोडा फार पैसा गुंतवा लागतो. त्यानंतर मात्र कमाई दुप्पट होत असते.   यासह आणखी काही व्यवसाय आहेत, ज्यातून तुम्ही अधिकचा नफा कमावू शकता.   फुलांचा रस उत्पादित करणे, पशुसाठी चारा उत्पादन, काजूवरील प्रक्रिया केंद्र, झिंगा कोळंबी पालन, वराह पालन, मसाला तयार करणे, सोयाबीन प्रक्रिया, भाजीपाला उत्पादन, गवती चहाचे उत्पादन, रजनीगंधाची शेती, ई-शॉपिंग पोर्टल, कॅक्टसची व्यवस्था, दूध उत्पादन, मका उत्पादन.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters