1. बातम्या

कर्जमाफीची योजना रखडली; 34 हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत, शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सरकार प्रयत्नशील असतात. अनेक योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. अशीच एक योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जाहीर करण्यात आली होती. ती योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची. मात्र आता ही योजना केवळ नावापुरतीच राहीली आहे असं चित्र दिसत आहे.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कर्जमाफीची योजना रखडली

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कर्जमाफीची योजना रखडली

शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सरकार प्रयत्नशील असतात. अनेक योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. अशीच एक योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जाहीर करण्यात आली होती. ती योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची. मात्र आता ही योजना केवळ नावापुरतीच राहीली आहे असं चित्र दिसत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या दोन योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. सन २०१७ मध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना' जाहीर करण्यात आली होती. मात्र यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ३४ हजार ४९८ शेतकरी कर्जमाफीला मुकले आहेत. अजूनही शेतकरी २०० कोटींच्या कर्जमाफीची प्रतीक्षा करत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शिंदे सरकार सत्तेत आल्याने, फडणवीस यांच्या काळातील रखडलेली कर्जमाफी योजना पुन्हा सुरु होईल अशी अपेक्षा आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'च्या अंमलबजावणीला विलंब झाला. त्यानंतर सत्तेवर ठाकरे सरकार आले. त्यामुळे हजारो शेतकरी कर्जमाफीस पात्र असतानाही लाभपासून वंचित राहिले आहेत.

आता या शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर व्याज चढले असून बँकांद्वारे शेतकऱ्यांना रक्कम भरण्याची सूचना दिली जात आहे मात्र कर्ज भरायला पैसेच नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. आता यावर शिंदे सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शेतकऱ्यांना पूर्वीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठीच पैसे जवळ नाहीत त्यात आता कर्ज आणि वाढलेल्या व्याजाने शेतकरी हतबल झाला आहे.

आता नव्याने स्थापन झालेल्या शिंदे - फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना या योजेनेबाबत बरीच अपेक्षा आहे. २०१७ च्या कर्जमाफीला या जिल्ह्यातील १ लाख ३० हजार ७८६ शेतकरी पात्र ठरले होते. मात्र यंत्रणेत ऑनलाईन त्रुटी राहिल्याने ३४ हजार ४९८ शेतकऱ्यांची ग्रीनलिस्टच लागली नाही. अहवालानुसार, या शेतकऱ्यांचे १९९ कोटी ७२ लाख रुपयांचे कर्ज थकले आहे.

आता सर्व सोलरपंप अर्जांना मिळणार मंजुरी, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

या थकबाकीतही आता वाढ झाली आहे. २०१९ साली महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी ८९ हजार शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले होते. यांना ६७३ कोटींची कर्जमुक्ती मिळाली मात्र १,५६४ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे पैसेच आले नाहीत. आता या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निधी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या:
देशी जुगाड! पठ्ठयाने शेळ्यांसाठी खतांच्या गोण्यांपासून घरीच तयार केला 'रेनकोट'
मोठी बातमी: सरकारकडून खाद्यतेलाचे दर कमी करण्याचे निर्देश; सर्वसामान्यांना दिलासा..

English Summary: 34,000 farmers waiting for debt waiver, Shinde government ready to take big decision? Published on: 13 July 2022, 05:27 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters