1. बातम्या

निवडणुकीसाठी १७ बाजार समित्यांकडे पैसेच नाहीत, निवडणूक होणार नाही...

सध्या राज्यातील बाजार समित्यांची निवडणूक (APMC Election) लागली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना १७ बाजार समित्यांकडे पुरेसा निधी नसल्याने निवडणूक लागू शकली नाही. यामुळे याठिकाणी निवडणूक होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
market committees election

market committees election

सध्या राज्यातील बाजार समित्यांची निवडणूक (APMC Election) लागली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना १७ बाजार समित्यांकडे पुरेसा निधी नसल्याने निवडणूक लागू शकली नाही. यामुळे याठिकाणी निवडणूक होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच दोन बाजार समित्या विभाजनामुळे पात्र नसल्याने तेथे निवडणुकाच लागल्या नसल्याची स्थिती आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मतदारसंघातील सिल्लोड आणि सोयगाव या दोन बाजार समित्यांचे विभाजन झाल्यामुळे त्या बाजार समित्या निवडणुकीस पात्र ठरलेल्या नाहीत.

पुणे ग्रामीण, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद येथील १५ बाजार समित्यांकडे निधीच नसल्याने निवडणूक प्रक्रियाच सुरू केलेली नाही. या बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्याने निवडणूक निधीच नाही. यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांनो जनावरांना शिळे अन्न खाऊ घातल्याने होऊ शकतो मृत्यू...

परिणामी येथे पुन्हा प्रशासक कामकाज पाहणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि संग्रामपूर या दोन बाजार समित्यांनी अपुरा निधी भरल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू केलेली नाही.

धक्कादायक! मराठवाड्यात तीन महिन्यांत 214 शेतकरी आत्महत्या, दररोज दोन जणांच्या आत्महत्या..

दरम्यान, राज्यातील २८१ बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासक किंवा प्रशासक मंडळ स्थापन करण्यात आले होते. निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर या बाजार समित्यांची निवडणूक लागली. यासाठी अनेक अर्ज दाखल झाले आहेत.

'या' गावात जनावरांना साप्ताहिक सुट्टी. गावकरी या दिवशी दूध काढत नाहीत, बैलांना कामेही सांगितली जात नाहीत..
कर्जत जमखेडचा दुष्काळ हटणार! रोहित पवार यांच्या पुढाकाराने 43 गावांमध्ये काम सुरू...
राज्यातील ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे आंदोलन, राजू शेट्टी मैदानात..

English Summary: 17 market committees have no money for election, election will not be held... Published on: 06 April 2023, 10:07 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters