शेतकऱ्यांच्या बाबतीत कायमच समाजातील काही घटकांमध्ये गैरसमज राहिला आहे की शेतकरी घेतलेल्या कर्जाची परतफेड करत नाहीत. परंतु सत्य परिस्थिती जर पाहिली तर शेतकरी जेवढ्या प्रकारे कर्जाची परतफेड करू शकतात तेवढे कर्जाची परतफेड कुठलाही घटक करू शकत नाही. हेदेखील तेवढेच सत्य आहे. कारण निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय करून कर्जाची परतफेड नियमित करणे हे वाटते तितके सोपे नाही.
याच गोष्टीचे एक ज्वलंत उदाहरण सध्या समोर आले असून औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल दीड लाख शेतकर्यांनी गेली तीन वर्षे नियमितपणे कृषी कर्जाचे हप्ते भरले आहेत. त्यामुळे सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजनेच्या माध्यमातून मिळणारे प्रोत्साहन अनुदानाचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
दिव्य मराठीच्या वृत्तानुसार,चार लाख 9 हजार शेतकऱ्यांपैकी दोन लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा खातेदार असून यापैकी तब्बल दीड लाख शेतकर्यांनी गेली तीन वर्षे नियमितपणे कृषी कर्जाचे हप्ते भरले आहेत.
नक्की वाचा:Good News: 'या' राज्यात नवीन कापसाला मिळाला 'इतका' भाव,नवीन कापसाची आवक सुरू
याबाबतीत औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आव्हान केले आहे की, सप्टेंबर पर्यंत बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे त्यामुळे ज्यांचे बचत खाते नाही अशा शेतकऱ्यांनी ते लवकरात लवकर उघडावे व कर्ज खात्याशी आधार कार्ड प्रमाणीकरण करून घ्यावे. हे करण्यासाठी संबंधित बँकेच्या शाखेत,
ग्राहक सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर आणि आपले सेवा केंद्र या ठिकाणी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा. एवढेच नाही तर आपले बचत खाते क्रमांक व मोबाइल क्रमांकाची माहिती विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व बँकांना उपलब्ध करून द्यावी असे देखील आवाहन त्यांनी केले आहे.
Share your comments