1. बातम्या

महाराष्ट्राच्या मुकुटात मानाचा तुरा! मराठमोळे यू. यू. लळीत भारताचे नवे सरन्यायाधीश,घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

सर्वोच्च न्यायालय हे भारतातील सर्वोच्च न्यायसंस्था असून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या जागी न्या. यू. यू. लळीत यांनी शनिवारी देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित एका सोहळ्यात यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. एन. व्ही. रमणा हे नऊ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहे म्हणजे लळीत यांचा कार्यकाल अवघा 74 दिवसांचा आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
chief justice u.u.lalit of supreme court

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यावर्षीच्या कापूस हंगामाची सुरुवात धडाकेबाज,वाचा 'या' राज्यातील सुरुवातीचे भाव

या छोट्याशा कालावधीत मात्र त्यांना सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेले 492 घटनात्मक खटल्यांचा निपटारा करावा लागेल.

या पार्श्वभूमीवर न्या. लळीत यांनी शुक्रवारी काही महत्त्वपूर्ण सुधारणा यांचे आश्‍वासन दिले असून खटल्यांची वेळेवर लिस्टिंग तसेच तातडीच्या प्रकरणांच्या मेशनिंग प्रकरणी नवी व्यवस्था तयार करणे व अधिकाधिक घटनात्मक खंडपीठ स्थापन करण्याचा समावेश आहे.

 न्या. लळीत हे कोकणचे आहेत सुपुत्र

 न्यायमूर्ती उदय उमेश लळीत म्हणजेच यू. यू. लळीत हे महाराष्ट्राचे सुपुत्र असून महाराष्ट्रातील कोकणचे सुपुत्र आहेत.  त्यांचे मूळ गाव हे सिंधुदुर्गाच्या देवगड तालुक्यातील गिर्ये- कोठारवाडी हे आहे.

नक्की वाचा:अकोला कृषी विद्यापीठातही बैलपोळा अतिशय उत्साहात साजरा!

 त्यांचे आजोबा वकिली निमित्त सोलापूरला कायमचे स्थायिक झाले व वडील उमेश लळीत 1974 ते 76 या काळात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. त्यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1957 रोजी झाला व त्यांनी त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले.  एप्रिल 2004 मध्ये त्यांची सुप्रीम कोर्टाकडून ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून नियुक्ती झाली.

एवढेच नाही तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार टूजी प्रकरणाच्या सर्व प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्यांची सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. एवढेच नाही तर सुप्रीम कोर्टाच्या विधी सेवा समितीचे सदस्य देखील होते.

नक्की वाचा:Sudhir Mungantivar: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस आणि बैलाचा मृत्यू झाल्यास मिळणार 'इतकी' मदत

English Summary: u.u.lalit take oath of chief justice of suprim court today they are related with maharashtra Published on: 27 August 2022, 11:56 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters