सध्या शेतकरी पावसाची वाट बघत असून शेतीसाठी बियाणे आणि खत खरेदी करत आहेत. असे असताना शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. आता खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांना कृषी विभागाने चांगलाच दणका दिला आहे.
एकूण १४ कृषी साहित्य विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे कृषी सेवा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे विक्री करताना सुद्धा तुमची फसवणूक होणार नाही ना याची काळजी घेणे गरजेचे आहे.
दरम्यान, पुढेही अशीच कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती सातारा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. खते, बियाणे विक्रीत बोगसपणा करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईसाठी विभागीय स्तरावर भरारी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत.
हे मसाले तुमच्या घरात आरामात पिकवता येतील, दर महिन्याला चांगली बचत होईल
या पथकाने शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांची लुटमार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
डाळिंब खरेदीत १३ लाखांची फसवणूक, एकाला अटक
याठिकाणी 12 भरारी पथकांमार्फत कृषि सेवा केंद्रांची तपासणी सुरू आहे. कृषि निविष्ठांची जादा दराने विक्री, अप्रमाणित कृषि निविष्ठांची विक्री करणे इत्यादी प्रकार आढळून आल्यास संबंधित कृषि सेवा केंद्रावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.
राज्याला जागतिक दर्जाचे 'ड्रोन हब' बनवणार, देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना...
या पक्ष्यापासून कमवा 8 ते 10 लाख रुपये, जाणून घ्या खासियत
गणेश कारखाना निवडणुकीत विखे पिता-पुत्रांना धक्का! आमदार निलेश लंके म्हणाले, लोकसभा अजून बाकी...
Share your comments