1. बातम्या

Big Breaking: पीएम किसानचा 11 वा हप्ता होणार आज जारी,10 कोटी शेतकऱ्यांना सरकार देणार 21 हजार कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच 31 मे रोजी देशातील दहा कोटी शेतकऱ्यांना एकवीस हजार कोटी रुपयांचा पीएम किसान योजनेचा अकरावा हप्ता जारी करणार आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
11th installment of pm kisan scheme transfer to farmer bank account

11th installment of pm kisan scheme transfer to farmer bank account

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच 31 मे रोजी देशातील दहा कोटी शेतकऱ्यांना एकवीस हजार कोटी रुपयांचा पीएम किसान योजनेचा अकरावा हप्ता जारी करणार आहेत.

पीएम मोदी हा निधी शिमला येथून जारी करणार असल्याचे कृषी मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच हा निधी जारी करण्यासोबतच पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे 16 सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या लोकांशी चर्चा देखील करतील. हा कार्यक्रम स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा होत असलेल्या अमृत महोत्सवाचा एक भाग  आहे.

 यावर्षीचा पहिला हप्ता केव्हा मिळाला?                                   

 सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना दोन-दोन हजार रुपयांच्या हप्त्यात वार्षिक सहा हजार रुपये देतात. या योजनेचा या वर्षीचा पहिला हप्ता एक जानेवारी ला मिळाला  होता.

अगदी वर्षाच्या सुरुवातीला सरकारने दहा कोटी शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपये दिले होते. सरकारने या योजनेमध्ये आता बदल केले असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना केवायसी करणे गरजेचे आहे.

जर तुम्ही ई-केवायसी अजून पर्यंत केले नसेल तर ते तुम्ही करू शकता.

 तुमच्या मोबाईलवर किंवा संकेतस्थळावर या प्रमाणे -केवायसी करा

1- सर्वप्रथम पी एम किसान पोर्टल https//:pmkisan.gov.in/ला भेट द्या.

2- या ठिकाणी तुम्हाला फार्मर कॉर्नर वर ई केवायसी ची एक लिंक दिसेल.या लिंक वर क्लिक केल्यावर तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल.

3- याठिकाणी तुम्ही तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागतो. परंतु यामध्ये महत्त्वाचे आहे की तुम्हालातुमच्या आधार नंबरशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल.

4- त्यानंतर ओटीपी टाका. अशा प्रक्रियेने तुमचे ई केवायसी पूर्ण होईल

5- जर तुम्हाला केवायसी पूर्ण करण्यासाठीकाही अडचण येत असेल तर तुम्ही आता सेवा केंद्राचे संपर्क साधू शकता.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:75 वर्षात 41 वेळा मान्सून वेळेपूर्वी:3 दिवस आधीच केरळमध्ये मान्सून दाखल, 7 जूनला महाराष्ट्रात

नक्की वाचा:West Nile Fever: काय आहे नेमका वेस्ट नाईल ताप?या तापामुळे केरळ मध्ये पहिला मृत्यू, जाणून घ्या लक्षणे

नक्की वाचा:Mango Museam: 12.5 एकर वर आहे हे आंबा संग्रहालय, 230 हून अधिक आंब्याच्या जाती आणि वार्षिक उत्पन्न 24 लाखापेक्षा अधिक

English Summary: 11th installment of pm kisan scheme transfer to farmer bank account Published on: 31 May 2022, 08:45 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters