सणासुदीच्या काळात सर्वसामान्य लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी (farmers) टेंशन देणारी बातमी आहे. कांदा (onion) भाज्यापाल्यांच्या दरात घट झाली आहे.
बटाटे वगळता कांदे, लसूण आणि टोमॅटोसह अन्य सर्व भाज्यांचे भाव कमी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाहिले तर यावर्षी शेतकरी वर्गाला तोटा सहन करावा लागला आहे.
भरघोस उत्पन्न (income) आणि बाजारात वाढलेली आवक (income) यामुळे येणाऱ्या दोन महिन्यांच्या काळात भाज्यांच्या किमती वाढतील. लासलगाव बाजारपेठेत कांद्याच्या भावात वार्षिक आधारावर ३० टक्के घसरण झाली आहे.
कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी करा 'या' तंत्रज्ञानाचा वापर; मिळेल भरघोस उत्पन्न
याठिकाणी सध्या कांदा १,१५२ रुपये क्विंटल आहे. ग्राहकांना तो २६ रुपये किलो दराने मिळत आहे. बटाट्याच्या टोमॅटो किमती मात्र गेल्यावर्षाच्या तुलनेत ६४ टक्के अधिक आहेत.
यावर्षी पावसामुळे खरीप कांद्याची लागवड लांबली असून, उत्पादनही १५ टक्क्यांनी घटले आहे. तरीही कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता नाही. सडण्याच्या भीतीने शेतकरी कांदा विकत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा ३५ टक्क्यांपर्यंत स्वस्त आहे.
कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक 2780 क्विंटल झाली. या ठिकाणी कमीत कमी दर 500 तर जास्तीत जास्त दर 1600 रुपये आणि सर्वसाधारण दर 1000 इतका दर मिळत आहे.
खेड - चाकण - या बाजार समितीत कांदा आवक 300 क्विंटल झाली तर कमीत कमी दर 1000 तर जास्तीत जास्त दर - 1500 आणि सर्वसाधारण दर - 1300 रुपये मिळत आहे.
पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी खुशखबर; फक्त 1500 रुपये जमा करून मिळवा 35 लाखांचा फायदा
पीठ स्वस्त होण्याची शक्यता
गव्हाच्या निर्यातीवर (Exports of wheat) बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने हा निर्णय नुकताच घेतला. त्यामुळे सणासुदीच्या काळा आटा स्वस्त होईल. तसेच गोरगरिबांना खाद्य सुरक्षा मिळेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
Deshi Cow: संकरीत गायीच्या पोटी देशी गाय; कृषी विद्यापीठाचा प्रयत्न यशस्वी
शेतकरी मित्रांनो बँक खात्याशी त्वरित आधार जोडणी करा; लवकरच दिले जाणार प्रोत्साहनपर अनुदान
Wheat Varieties; वाढत्या तापमानातही गव्हाच्या 'या' वाणातून मिळणार चांगला नफा
Share your comments