विद्राव्य खते हे पिकासाठी फार उपयुक्त आहेत. विद्राव्य खत यामार्फत आताच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पिकांना पुरवठा व्यवस्थितपणे केला जातो. परंतु ही विद्राव्य खते वापरताना आवश्यक ती काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. या लेखात आपण विद्राव्य खते वापरताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती घेऊ.
विद्राव्य खते वापरताना घ्यायची काळजी..
- एककिलो00:00.50 ड्रिप खतव विरघळण्यासाठी कमीत कमी वीस लिटर पाणी वापरावे
- कॅल्शियम नायट्रेट व कॅल्शियम अधिक बोरॉन मिश्र खत ची ड्रीप खते 13:00:45 व्यतिरिक्त कोणत्याही खताबरोबर मिसळू नये
- सर्व नत्रयुक्त खते वातावरणातील आद्र्रता शोषून घेतात त्यामुळे खाते उघडा ठेवल्यास ओलावाधरतात.
- ह्युमिक ऍसिड व सीविड पावडर पाण्यामध्ये मिसळताना ड्रामा मधील पाणी अगोदर चक्राकार ढवळून घ्यावे व त्यानंतर पावडर हळूहळू पाण्यात टाकावी.
- ह्युमिक ऍसिड करण्यासाठी पाण्याचे प्रमाण शंभर लिटर प्रति किलो एवढी वापरावे.
- योग्य मिश्रणासाठी पाण्यामध्ये खते टाकावी उलटे खतामध्ये पाणी टाकू नये.
- चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट वापरानंतर पॅकेट सीलबंद करून ठेवावे.
- खते विरघळण्यासाठी पाणी स्वच्छ वापरावे.
- कोणताही खताबरोबर कॅल्शियम, कॉपर युक्त खते तसेच सल्फर मिळू नये.
- फॉस्फरिक ऍसिड बरोबर कोणती फवारणी अथवा ड्रिप खत मिसळू नये.
- ठिबकमधून खते द्यायची संपल्यानंतर दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाणी देऊ नये.
- काही अपवाद वगळता सर्व कीटकनाशक व बुरशीनाशकासोबत फवारणी खते,बायोस्टीमुलेंट मिसळून फवारता येतात. परंतु मिसळण यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
- विद्राव्य खतांच्या उत्कृष्ट परिणामासाठी कंपनीच्या शिफारशीप्रमाणे उत्पादनाचा वापर करावा.
- प्रत्येक पिकाच्या प्रस्तावित शिफारशीप्रमाणे खतांचा वापर केल्यास अनावश्यक खर्च टाळून खतांचे परिणाम मिळतात.
- एक किलो विद्राव्य ड्रीप खाते जसे 19:19:19,12:61:00,00:52:34 इत्यादी विरघळण्यासाठी कमीत कमी 15 लिटर पाणी वापरावे. (संदर्भ-कृषीवर्ल्ड)
Share your comments