आपण आपल्या आहारासाठी रोज अन्न तर खातोच मात्र फळे सुद्धा आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत. आपल्या रोजच्या आहारात किमान एका तरी फळाचा समावेश असणे गरजेचे आहे. आतापर्यंत तुम्ही जास्तीत जास्त ५०० रुपये प्रति किलो मिळणारी फळे खाली असतील मात्र असे एक फळ आहे ज्याची किमंत लाखो रुपये आहे. भारतात अनेक प्रकारची फळे तसेच भाज्या आढळत असतात. जसे की सफरचंद, द्राक्षे, डाळिंब, संत्री, आंबा, लिची जे कर्क आपण सर्वसामान्यपणे ही फळे खातोच. मात्र एका फळाला जर लाखो रुपये देऊन खरेदी करणे म्हणजे स्वप्नात सुध्दा न येणारी गोष्ट.
जपान मध्ये आढळते फळ :-
भारताव्यतिरिक्त जगात अनेक प्रकारची फळे आहेत ज्याच्या किमती ऐकून तुम्ही सुद्धा चकित व्हाल. जपान या देशामध्ये असे एक फळ आहे ज्या फळाची किमंत लाखो रुपयांच्या घरात आहे जे की हे फळ खरेदी करण्याचा कोण विचार सुद्धा करू शकत नाही. आज आपण या महागड्या फळाबद्धल जाणून घेणार आहोत तसेच याची किमंत किती आहे आणि सर्वात महत्वाचे या फळामध्ये नक्की काय आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत.
हे फळ हिऱ्यांपेक्षा महाग विकले जाते :-
जगात अशी अनेक लोक आहेत त्यांच्या आहारात ते वेगवेगळी फळे खातात. मग त्या फळांची किमंत १०० रुपये पासून चालू ते १००० रुपये पर्यंत असू शकतात. मात्र जे फळ आपण पाहणार आहोत त्याची किंमत लाखो रुपये आहे. तुमच्या ध्यानीमनी सुद्धा नसेल की फळाची किमंत लाखो रुपये कशी असू शकते. मात्र हे खरं आहे की जपानमधील फळाला लाखो रुपये लोक मोजतात. तुम्हाला वाटत असेल की सोने किंवा चांदी घेण्यापेक्षा या फळामध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. करण जपान देशात या फळाचा लिलाव चालतो.
जपानमध्ये आढळणारे फळ :-
जपानमधील या फळाचे नाव युब्री खरबूज असे आहे जे की हे फळ जपान देशात आढळते. जपान मधील शेतकरी या फळाची लागवड करून त्या ठिकाणी विकतात. युब्री खरबूज या फळाची खूपच कमी प्रमाणत निर्यात आहे. जे की या फळाला सूर्यप्रकाश चालत नाही तर हे फक्त ग्रीनहाऊस मध्ये घेतले जाते. जपानमध्ये सापडलेल्या या युब्री खरबुज फळाची किमंत १० लाख रुपये आहे तर दोन टरबूज घेतले तर आपणास २० लाख रुपये मोजावे लागतात. २०१९ साली जपानमध्ये या फळाचा ३३ लाख रुपयांचा लिलाव झालेला होता. युब्री खरबूज हे फळ आतमधून केशरी रंगाचे दिसते जे की चवीला सुद्धा खूप गोड आहे.
Share your comments