1. फलोत्पादन

फळ बागांमधील संजीवकांचा वापर आणि त्यांचे होणारे फायदे

सजीव वनस्पतींमध्ये जी रासायनिक द्रव्य प्रमाणात कार्यरत होऊन त्या वनस्पतींच्या अंतर्गत कार्यपद्धतीत बदल घडवून आणतात त्यांना वनस्पती संजीवके असे म्हणतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
fruit orchred

fruit orchred

सजीव वनस्पतींमध्ये जी रासायनिक द्रव्य प्रमाणात कार्यरत होऊन त्या वनस्पतींच्या अंतर्गत कार्यपद्धतीत बदल घडवून आणतात त्यांना वनस्पती संजीवके असे म्हणतात.

सजीव वनस्पतीमध्ये अथवा शेतातील पिकांमध्ये कार्यरत असणाऱ्या संजीवकांचा पीक संजीवकांची म्हणतात.संजीवकांचे वाढ प्रेरक आणि वाढ निरोधक असे मुख्य दोन प्रकार आहेत. या लेखामध्ये आपण फळबाग यामध्ये  संजीवकांचा होणारेफायदे जाणून घेणार आहोत.

 फळझाडांमध्ये होणारे संजीवकांचे उपयोग

  • वनस्पतींची अभिवृद्धी करण्यासाठी संजीवकांचा उपयोग- फाटे व गुटी कलमांना लवकर आणि भरपूर मुळे येण्यासाठी संजीवकांचा उपयोग होतो. उदा. डाळिंब,द्राक्ष, अंजीर यासाठी आयबीए ते ऑक्सिनगटातील संजीवक चांगले परिणाम कारण ठरते. भेट कलम, शेंडा कलम आणि डोळा भरणे या कलम पद्धतीत खुंट आणि सायन यांचे मिलन साधून एकजीव होण्यासाठी संजीवके मदत करतात. संत्रा, मोसंबी आणि लिंबू या फळझाडांची अभिवृद्धी डोळे भरून केली जाते. कलमे जगण्यासाठी आणि वाढण्यासाठी या संजीवकांचा उपयोग होतो.
  • सुप्तावस्था मोडण्यासाठी संजीवकांचा वापर- डोळ्यांची सुप्तावस्था आणि बियांची सुप्तावस्था मोडून काढण्यासाठी संजीवकांचा उपयोग होतो. बियांची सुप्तावस्थेत मुळे बीज वेळेवर रुजत नाहीत. त्यामुळे उगवण व त्या पुढील वाढ होण्यास उशीर होतो. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या सुप्तावस्थेत मुळे डोळे फुटण्याचे प्रमाण कमी होते व डोळे अंकुर येण्यास उशीर होतो. याचा परिणाम हा फुले व फळे येण्यास उशीर होतो. झाडावरील सर्व फळे एकसारखी व एका अवस्थेत तयार होण्यासाठी बी सुप्तावस्था एकाच वेळी मोडणे आवश्यक असते. डोळ्यांची सुप्तावस्था मोडण्यासाठी जिब्रेलिक एसिड, इथेल संजीवकांचा उपयोग होतो.
  • फळांचा बहार नियंत्रित करण्यासाठी संजीवकांचा उपयोग- फळांमध्ये फुलांचा बहार येण्याअगोदर झाडांची शाखीय वाढ पूर्ण व्हावी लागते. झाडांच्या अंतर्गत शरीरक्रिया आणि बाह्य वातावरण यांच्या एकत्रित परिणामामुळे शाकीय वाढ पूर्ण होण्यासाठी कमी अधिक वेळ लागतो. शाखीय वाढ होऊन ती पक्व झाल्यावर डोळ्यात फुलांची निर्मिती होते. ही निर्मिती काही काळ सुप्तावस्थेत राहते आणि ठराविक कालावधीनंतर डोळे फोडून त्यातून फुलांचा मोहर बहाराच्या रुपाने बाहेर पडण्यासाठी फळझाडांची अंतर्गत स्थिती आणि बाह्य वातावरणातील सूर्यप्रकाश, आद्रता, तापमान या घटकांचा समन्वय साधण्यासाठी संजीवकांचा उपयोग होतो.
  • फळझाडांचे आकारमान मर्यादीत राखून उत्पादन क्षमता वाढवणे- काही फळे झाडांचा विस्तार जास्त मोठा होतो पण त्या मानाने त्यावर फळे कमी लागतात. फळांची निगा राखणे, काढणी करणे या कामातही अडचणी येतात. अशा स्थितीत झाडांची वाढ आणि विस्तार मर्यादित राखण्यासाठी मॅलिक हायड्रोझाईन क्लोरमक्वाट इत्यादी संजीवके उपयुक्त ठरतात. फळझाडाच्या मर्यादित वाढ आणि विस्तारामुळे दर हेक्‍टरी झाडांची संख्या वाढवून घेता येते आणि उत्पादनक्षमता वाढवून वेगवेगळी कामे सहजपणे करता येतात.
  • फळपिकाच्या काटकपणा व लवकर उत्पादनक्षम होण्यासाठी संजीवके- फळ पिकांमध्ये संजीवकांचा वापर करून फळझाडांना काटकपणा तसेच उत्पादनाची सुरुवात लवकर करता येते. बरीचशी फळझाडे बहुवर्षीय असून सुरुवातीची काही वर्षे त्यांची फक्त शाकीय वाढ होत असते. ही शाकीय वाढ होत असताना संजीवकांचा वापर केला तर शाकीय वाढीवर मर्यादा येऊन फळे येण्याची अवस्था लवकर सुरू होते. फळझाडांची शाकीय वाढ होत असताना झाडांच्या शाखांत लुसलुशीतपणा अधिक असतो.त्यामुळे हा भाग विशेष हवामानातील,पाणीटंचाई आणि रोग व किडीस लवकर बळी पडतो. संजीवके वापरल्यावर हा भाग कणखर बनतो.
English Summary: use of analeptic in fruit orchred and thats advantage of fruit Published on: 13 February 2022, 07:05 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters