शेती पिकांचे नुकसान बऱ्याच अंशी रोगांमुळे किंवा कीटकांमुळे जितके जास्त प्रमाणात होते तितकेच काही काही पिकांचे नुकसान हे उंदरांमुळे होते. उंदरांमुळे पिकांचे जास्त नुकसान होणाऱ्या पिकांचा विचार केला तर यामध्ये भुईमूग आणि गहू या पिकांचा जास्त नुकसान होते.
जर आपण एका अभ्यासाचा विचार केला तर त्यानुसार उंदीर उभ्या पिकांचे पाच ते 15 टक्क्यांपर्यंत नुकसान करतात. या उदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची अमर्याद प्रजनन क्षमता असल्यामुळे त्यांना नियंत्रित करणे देखील खूप कठीण जाते.जेव्हा नेमके पिक काढणीला तयार होत असते तेव्हाच पिकामध्ये उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. अशावेळी जर वेळीच पावले उचलली नाहीत तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
जर त्यांच्या संख्येचा विचार केला तर मे आणि जून महिन्यात यांची संख्या कमी असते. याच वेळी ही मोहीम एकत्रितपणे राबवावी. जर आपण उंदीर यामुळे होणाऱ्या नुकसानीचे स्वरूप पाहिले तर ते कोठार, घरे तसेच धान्याच्या गोदामेयादीमधील अन्न खातात व त्यांच्या विष्टेतून अन्न वाया घालवतात व त्यामुळे रोगांचा प्रसार होतो.एक असे मानले जाते की उंदीर एका वर्षात धान्याचे इतके नुकसान करतात की जगाच्या अर्ध्या लोकसंख्येला अन्न पुरवू शकतात. उन्हामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असते. अशा याउपद्रवी उंदराचेनियंत्रण करण्याच्या काही टिप्स या लेखात आपण पाहू.
उंदरांचे नियंत्रण करण्यासाठी च्या उपयुक्त टिप्स
1- मिंट- पुदिन्याची रोपे तुम्ही शेतात कोणत्याही ठिकाणी लावली तर उंदीर अशा ठिकाणी फिरकत नाहीत. उंदीर पुदिन्याचा वास देखील सहन करू शकत नाही.
जर उंदरांच्या बिळामध्ये पुदिन्याची पाने टाकली तर उंदीर पळून जातात.
2- लाल मिरची- उंदरांना मारण्यासाठी लाल मिरची ही खूप प्रभावी उपाय आहे. उंदरांचा वावर असलेल्या ठिकाणी फवारणी केल्यास त्यांना दूर ठेवण्यास मदत होईल. ज्या ठिकाणी उंदरांचा सुळसुळाट जास्त असतो अशा ठिकाणी लाल तिखट टाकावे.
3- काळी मिरी- शेतातील उंदरांपासून सुटका व्हावी असे वाटत असेल तर उंदीर ज्या ठिकाणी लपतात अशा ठिकाणी काळीमिरी पसरावी, यामुळे उंदीर नियंत्रणात मदत होते.
4- तुरटी- तुरटीला उंदीर यांचे शत्रू मानले जाते. तुरटीच्या पावडर चे द्रावण तयार करून दाराजवळ किंवा बिळाजवळ फवारावे. उंदरांपासून मुक्ती मिळवण्याचा हा एक सोपा व प्रभावी मार्ग आहे.
5- तमालपत्र-ऊंदिरांना दूर ठेवण्यासाठी हा एक मार्ग आहे. तमाल पत्रा च्या वासाने उंदीर पळूनजातात.म्हणून आपण इच्छित असल्यास आपण उंदीर जिथे येतात तिथे तमाल पत्रा चे पाने ठेवू शकता.
6- कापूर-घरच्या पूजेसाठी कापूरगोळ्या वापरतो पण त्याचा उपयोग उंदीर मारण्यासाठी देखील होऊ शकतो. कापूर च्या गोळ्या ऊंदिराच्या बिळाच्या दाराजवळ आणि आजूबाजूला ठेवा.
त्यांच्या वासामुळे उंदराला श्वास घेणे कठीण होते आणि तो बाहेर येतो.(स्त्रोत-किसानराज)
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:Tooth Pain:दात दुखी पळवायची असेल तर करा हे घरगुती उपाय, दातदुखी पळेल भुर्रकन
Share your comments