रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपीकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक शेतीतवापर केला पाहिजे गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रीय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात नितांतयांची नितांत गरज आहे.
- गांडूळ खत करण्याची पद्धत:
गांडूळ खत ढीग आणि खड्डाया दोन्ही पद्धतींनी तयार करता येते.मात्रदोन्ही पद्धतीमध्ये कुत्रिम सावलीचीगरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छपराचीशेडतयार करावी. या शेडची लांबी दोन ढिगासाठी4.25 मिटरचारढिगासाठी 7.50 मीटर असावी. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराचे असावेत. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.50 मिटरआणि मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.50 मीटर ठेवावी. छपरासाठी गवत,भाताचा पेंढा, नारळाचीझापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्याज्वारीचीजाड प्लास्टिक कागद किंवा गांडूळ खत अथवा लोखंडी पत्रांचा उपयोगकरावा. गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडुळांची योग्य जात निवडावी.
- ढीगपद्धत :-
ढीग पद्धतीने गांडूळ खत तयार करण्यासाठी साधारणता 2.5 ते 3.0 मी.लांबीचे आणि 90सें.मी.रुंदीचे ढीग तयार करावे. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. तेजाच्या तळाशी नारळाच्या काथ्यागवत भाताचे तूस या सारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थाच्या तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा थर रचावा. त्यावर पुरेसे पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडूळे हळुवारपणे सोडावेत.
साधारणात: 100 कि.ग्रॅ.सेंद्रीय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी 7,000 प्रौढ गांडुळे सोडावी. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र,धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरिपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादीचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिकच चांगले असते. त्यातील कर्ब: नत्राचे गुणोत्तर 30 ते 40 च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढीगांचीउंची 60 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमध्ये 40 ते 50 टक्के पाणी असावे.त्यासाठी ढिगावर गुण पाठाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे.ढीगातील सेंद्रिय पदार्थाचे तापमान 25ते 30 सेल्सिअस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.
- खड्डा पद्धत :-
या पद्धतीमध्ये सिमेंटच्या खड्ड्याची लांबी 3 मीटर रुंदी 2 मीटर आणि खोली साठ सेंटीमीटर ठेवावे.खड्ड्याच्या तळाशी नारळाचा कात्या, गवत, भाताचे तूस, गव्हाचा कोंडा,3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाललेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही तर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणात: शंभर कि.ग्रॅ. सेंद्रिय पदार्थांपासून गांडूळ खत तयार करण्यासाठी 7,000 प्रौढ गांडुळे सोडावी.
त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थाचा जास्तीत जास्त 50 सेंटिमीटर चा जाडीचा थर रचावा त्यावर कोण पाठाचे आच्छादन देऊन नेहमी ओले ठेवावे गांडुळाच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थाचे थर घट्ट झाल्यास हाताने सैलकरावेत. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील. अशाप्रकारे गांडूळ खताचा झालेल्या शंकू आकृती ढीग करावा.ढीगातील वरच्या भागाचे खत वेगळे करून सावलीत वाळवून चाळुन घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे त्यांची पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा.
Share your comments