1. फलोत्पादन

Veriety of nutmeg: जायफळ लागवड करायचे असेल तर या आहेत जायफळाच्या काही सुधारित जाती

जायफळ हे एक उंच वाढणारे मसाल्याचे सदापर्णी झाड आहे. ईस्ट इंडिया कंपनीने हे झाड भारतात आणले होते. जायफळाचे लागवड ही प्रामुख्याने केरळ,तामीळनाडू आणि महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये प्रमुख्याने होते.भारताचा विचार केला तर भारतात जायफळ लागवडी खालील क्षेत्र हे 5350 हेक्टर असून त्यापासून दोन हजार 890 टन एवढे उत्पादन मिळते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
nutmeg crop

nutmeg crop

 जायफळ हे एक उंच वाढणारे मसाल्याचे सदापर्णी झाड आहे. ईस्ट इंडिया कंपनीने हे झाड भारतात आणले होते. जायफळाचे लागवड ही प्रामुख्याने केरळ,तामीळनाडू आणि महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये प्रमुख्याने होते.भारताचा विचार केला तर भारतात जायफळ लागवडी खालील क्षेत्र हे 5350 हेक्टर असून त्यापासून दोन हजार 890 टन एवढे उत्पादन मिळते.

जायफळ यामध्ये नर व मादी झाडे वेगवेगळी असतात. सुमारे 50 टक्के झाडे हे मादी तर 45 टक्के झाडे येणार असतात तर उरलेली पाच टक्केही संयुक्त फुले असणारी झाडे निघतात.जायफळाची फळे चिकूच्या आकाराची पण गुळगुळीत व पिवळसर रंगाची असतात. जायफळाच्या टरफलांचा उपयोग मुरांबा,कॅंडी, लोणचे तसेच चटणी इत्यादी टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी होतो. तसेच जायफळाचा तेलाचा उपयोग औषध,साबण आणि टूथपेस्ट उत्पादनात देखील केला जातो. या लेखात आपण जायफळाच्या काही उपयुक्त जाती बद्दल माहिती घेऊ.

 जायफळाच्या या आहेत काही सुधारित जाती…..

  • कोकण सुगंधा- या जातीचा झाडाचा आकार शंकूसारखा आणि भरगच्च विस्तार असून या जातीपासून सुमारे 525 फळे प्रतिवर्षी मिळतात. महत्त्वाचे म्हणजे या जातीच्या झाडावर नर आणि मादी फुले दोन्ही एकाच झाडावर वेगवेगळ्या ठिकाणी येतात. त्यामुळे परागीभवनासाठी स्वतंत्र नर झाडे लावावी लागत नाही आणि 100% झाडांपासून फळांचे उत्पन्न मिळते. जायफळ बियांचे वजन 5.25 ग्रॅम तर जायपत्री एक ग्रॅम प्रति फळ मिळते.
  • कोकण स्वाद- ही जात शंकूसारखा विस्तार असणारी मात्र सरळ वाढणारी जायफळाची मादीजात असून प्रतिवर्षी सरासरी 760 फळे मिळतात. मी मध्यम आकाराचे असून वजन सुमारे पाच ग्रॅम असते तर जायपत्रे सुमारे 1.3 ग्राम प्रति फळ मिळते.
  • कोकण श्रीमंती- या जातीची फळे मोठी आणि टपोरी तसेच जायपत्री जाड असते. जायफळाच्या या जातीपासून दरवर्षी सरासरी 900 फळे मिळतात. मी मोठ्या आकाराचे असून वजन सुमारे दहा ग्रॅम असते तर जायपत्री सुमारे 2.10 ग्रॅम प्रति फळ मिळते.
  • कोकण संयुक्ता-ही नरव मादी फुले एकाच झाडावर येणारी जायफळाची नवीन जात आहे. याच्या जायफळाचा आकार मोठा असून सुक्या जायफळाची वजन नऊ ग्रॅम च्या आसपास असते. तसेच सुक्या जायपत्री चे वजन 1.07 ग्रॅम असते. जायफळ आतील तेलाचे प्रमाण 27 टक्के तर जायपत्री तील तेलाचे प्रमाण 17.75 टक्के असते. या जातीपासून सुमारे 500 फळे दरवर्षी मिळतात.

 या चारही जाती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली यांनी विकसित केले आहेत.

English Summary: this is some benificial veriety of nutmes for nutmeg cultivation Published on: 09 January 2022, 05:17 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters