केळी हे जागतिक पातळीवर विचार केला तर भात, गहू, मका या पिकानंतर चौथे महत्त्वाचे खाद्य पीक आहे.केळी हे उष्णकटिबंधीय गटातील फळपीक असून या पिकाच्या फळांचा समावेश पिकविण्याच्या प्रक्रियेत अधिक इथीलीन वायूचे उत्पादित करणाऱ्या तसेच शोषण क्रियेत वाढ होणाऱ्या गटात होता.
जर साध्या भाषेत बोलायचे झाले तर केळीची पिकवण झाडावर असताना होतं नाहीतर गड कापणीनंतर ठराविक कालावधीत केळी पिकते. जर आपण जुन्या काळाचा विचार केला तर केळी भट्टी लावून पिकवली जात असे.परंतु या पद्धतीत अनेक तोटे आहेत. अनेक वेळा केळी चांगल्या पिकलेल्या अवस्थेत येत नाहीत तर कधी फळे कच्ची राहतात तर कधी जास्त पिकून फळांची नासाडी होते. केळी पिकवण्याच्या पद्धतीत संशोधन होत केळी पिकवण्याची आधुनिक पद्धती विकसित होत गेल्या. या लेखामध्ये आपण केळी पिकवण्याच्याएका अल्प खर्ची पिकवण तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेणार आहोत.
केळी पिकवण्याचे अल्पखर्चि केळी पीकवण तंत्रज्ञान
प्रतवारी करताना बऱ्याच वेळा केळीच्या घडातील पाच ते दहा टक्के केळी नाकारली जाते. त्याला पण वापसी केळी म्हणतो. ही वापसी केळी आपल्या शेतकऱ्यांना अक्षरशः फेकून द्यावी लागते. परंतु ही केळी फेकून न देता ती स्थानिक बाजारपेठेत विकून त्यापासून अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल याबाबत अल्प खर्ची केळी पिकवणे तंत्रज्ञानाची शिफारस केळी संशोधन केंद्र जळगाव येथे संशोधनाअंती करण्यात आली. हा अल्प खर्ची केळी पिकवणी कक्ष सात बाय सात बाय सात घनफूट असलेल्या एक इंची पीव्हीसी पाईप च्या सांगाड्यावर सिल्पोलीन ब्रँड असलेल्या युवी स्टॅबिलॉईडटारपॉलिनकापड ताणून तयार केला जातो.यात दोन घनफूट आकारमान कक्षात 1 ते 1.25 टन केळी पिकवली जाऊ शकते.
हा पिकवण कक्ष मोठ्या हवे दार खोलीमध्ये रचावा.या खोलीत तापमान नियंत्रणासाठी कमी खर्चिक एक टन क्षमता असलेला एसी बसवावा. केळीच्या फण्यान ना 0.1 टक्का बायोसेप बुरशीनाशकाची प्रक्रिया देऊन ती पिकवण कक्षात क्रेट्स मध्ये एकावर एक ठेवतात.पिकवण कक्षेत आद्रता 90% टिकून ठेवण्यासाठी पाण्यात भिजलेल्या सुती कापडाच्या चादरी कक्षाच्या आतून टागण्यात येतात. कक्षात सिल्पोलीन कापडातून विशिष्ट छीद्रातून इथिलीन वायूच्या सिलेंडर मधून आठ सेकंदापर्यंत इथिलिन वायू सोडतात जेणेकरून कक्षेत 100 पीपीएम तीव्रता टिकून राहते आणि ते छीद्र घट्ट बंद करून घेतात.इथिलिन गॅसच्या प्रक्रियेनंतर 24 तासांनी झीप असलेला पडदा पंधरा मिनिट उघडून कक्षेत साचलेला कार्बन डाय-ऑक्साइड गॅस बाहेर काढला जातो व पुन्हा पडदा बंद करून घेतला जातो.
या दरम्यान पिकवणी कक्ष असलेल्या खोलीच्या तापमानात 16 अंश ते 18 अंश सेंटिग्रेड तर आद्रता 90 टक्के पर्यंत टिकवून ठेवली जाते. 48 तासांनी पुन्हा या कक्षाचे दार उघडले जाते तेव्हा केळी पूर्णतः पिवळी पिकलेली तयार मिळते. या संपूर्ण पिकवणी कक्षाचा खर्च 56 हजार रुपयांपर्यंत येतो. तर उच्च तंत्रज्ञानाने युक्त पिकवून कक्ष पाच ते सहा टन क्षमतेसाठी आठ ते दहा लाख रुपये खर्च येतो या अल्प खर्ची पिकवण कक्षात वर्षाला किमान 60 टन केळी पिकवू शकतो.(स्रोत-शेतकरी मासिक)
Share your comments