लिंबू लागवड महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये केली जाते. जर आपण लिंबू बागेचा विचार केला तर कमी किमतीत जास्त उत्पादन देणारे फळ पीक म्हणून याचा उल्लेख करू शकतो. परंतु लिंबू फळबागला देखील त्याच्या लागवडीपासून तर उत्पादन हातात मिळेपर्यंत खूप तंतोतंत नियोजन करावे लागते.
सगळ्या प्रकारच्या व्यवस्थापनासोबतच खत व्यवस्थापन जर लिंबू फळ बागेसाठी व्यवस्थित केले तर त्यापासून खूप चांगले उत्पादन मिळते. त्यामुळे या लेखात आपण लिंबू बागेचे खत व्यवस्थापन याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ.
लिंबू बागेसाठी शेणखताचा वापर(manure use)
1- लिंबाच्या झाडांना चांगले कुजलेले व चांगले तयार झालेले शेणखत द्यावे. कारण झाडाच्या चांगल्या वाढीसाठी अत्यावश्यक आहे.
2- शेणखत वापरताना ते चांगल्या प्रतीचे प्रामुख्याने शरद ऋतूमध्ये वापरावे.
3- लिंबूच्या झाडाच्या सभोवती आळ्याच्या मातीमध्ये खते चांगल्या प्रमाणात मिसळून द्यावीत.
4- तसेच झाडाच्या सभोवती 2 इंच कंपोस्ट खत पसरून घ्यावे. तसेच झाडाचे नुकसान होऊ नये म्हणून साल देठापासून किमान दोन इंच दूर ठेवावी. तसेच प्रति झाडाला प्रतिवर्ष एक गॅलन कंपोस्ट खत वापरावे.
एनपीकेचा वापर
1- रासायनिक खतांचा वापर करताना प्रति झाड नत्राचे प्रमाण 8:8:8 पेक्षा जास्त नसावे.
2- जेव्हा झाडाची वाढीची अवस्था असते तेव्हा एनपीकेचा पुरवठा खूप महत्त्वाचा ठरतो.
3- नायट्रोजन एप्लीकेशनचे तीन फिडिंग म्हणजेच तीन टप्प्यांत विभागणी करावी. पहिला टप्पा हा फेब्रुवारी दुसरा मे आणि तिसरा सप्टेंबर या महिन्यात द्यावे.
4- खत देताना हिवाळ्यामध्ये लिंबूच्या झाडाला जास्त प्रमाणात देऊ नये नाहीतर झाड मरण्याची शक्यता वाढते.
साइट्रस गेन फर्टीलायझर
या खतातील पोषक गुणोत्तर 8:3:9 अशा प्रकारचे आहे. लिंबूवर्गीय वनस्पतींच्या गरजांसाठी तयार केले असून तसेच झाडाच्या मुळाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. खतामुळे लिंबूच्या झाडाला लिंबू अधिक लागतात.या खतात मॅग्नीज, लोह, तांबे आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते.
एस्पोमा साइट्रस प्लांट फूड
या खताचे पोषक गुणोत्तर 5:2:6 असून ते लिंबाच्या झाडावर वर्षातून तीन वेळा द्यावे. एक नैसर्गिक सेंद्रिय खत आहे.
लिंबाच्या झाडाला खते केव्हा द्यावी?
1- वसंत ऋतूच्या सुरुवातीस आणि उन्हाळ्यात दर चार ते सहा आठवड्यांनी एकदा आपल्या लिंबाच्या झाडाला खत द्यावे.
2- झाडाच्या वाढीदरम्यान चार ते सहा आठवड्याच्या अंतराने खत दिल्यामुळे लिंबाच्या झाडाला वाढण्यास व फळ देण्यास पुरेशे पोषक घटक मिळतात.
3- लिंबूचे झाड उन्हाळ्याच्या उत्तरार्धामध्ये उत्पादन कमी करते तेव्हा पुढील वसंतऋतूपर्यंत खत देणे थांबवावे.लिंबाच्या झाडाला दरवर्षी योग्य हंगामात खत देण्याची व्यवस्था करावी.
नक्की वाचा:फळबागेत 'फुलांचे आंतरपीक' एक वाढीव उत्पन्नाचा स्त्रोत, वाचा फायदे आणि घ्यायची काळजी
Share your comments