शेतीमध्ये कुठलेही पीक किंवा फळबागा यांचा विचार केला तर योग्य व अचूक व्यवस्थापन फार गरजेचे असते. व्यवस्थापनामध्ये पाण्याचे व्यवस्थापन, खत व्यवस्थापन फारच गरजेचे असून ते वेळेत होणेफारच आवश्यक असते.
त्यामध्ये लिंबू फळबाग याचा विचार केला तर लागवड केल्यानंतर नवीन झाडांना फार कमी खतांची गरज असते. पण जसजशी झाडांची वाढ होत जाते त्याप्रमाणे खतांची गरज देखील वाढत जाते. लिंबाची झाडे सूर्यप्रकाशात आणि कोरड्या हवामानात चांगले वाढतात. अशावेळी लिंबू बागेतून जर तुम्हाला मोठ्या, रसयुक्त व अधिक लिंबूनिचे उत्पादन हवे असेल तर अशा प्रकारे खताचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या लेखात आपण या बाबतीत माहिती घेऊ.
लिंबू फळबागेसाठी अशा पद्धतीने करा सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर
लिंबाच्या झाडा साठी शेणखताचा वापर
- चांगले तयार झालेले व कुजलेले शेणखत पिकांच्या वाढीसाठी चांगली असते.
- लिंबाच्या झाडाला शेणखत देताना ते चांगल्या प्रतीचे व शरद ऋतूमध्ये वापरावे
- लिंबाच्या झाडा भोवताली मातीमध्ये खाते चांगली मिसळावीत.
- सुमारे दोन इंच कंपोस्ट पसरावा. झाडाचे नुकसान होऊ नये म्हणून साल देठापासून किमान दोन इंच दूर ठेवा. प्रति झाडास प्रति वर्ष एक गॅलन कंपोस्ट वापरा.
लिंबाच्या झाडा साठी एनपीकेचा वापर
- लिंबाच्या झाडासाठी खत देताना नायट्रोजनचे प्रमाण 8-8-8 पेक्षा जास्त नसावे.
- झाडाच्या वाढीच्या अवस्थेत एनपीके चा पुरवठा करणे खूपच महत्त्वाचे असते.
- नायट्रोजन ॲप्लीकेशन चे तीन फिडींग मध्ये विभागणी करावी. म्हणजे फेब्रुवारी,मी आणि सप्टेंबर या महिन्यातद्यावे.
- हिवाळ्यात ऋतूत लिंबाच्या झाडाला जास्त खत देऊ नये अन्यथा झाड मरू शकते.
साइट्रस गेन फर्टीलायझर
याखतातील पोषक गुणोत्तर 8-3-9 असे आहे. लिंबूवर्गीय वनस्पतींच्या गरजांसाठी तयार केले जाते आणि मुळाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. या खतामुळे झाडाला अधिक लिंबू तयार होण्यास मदत होते. या खतांमध्ये मॅगनीज, लोह, तांबे आणि जस्त देखील असते. याचा उपयोग लिंबाच्या झाडा साठी पोषक द्रव्य म्हणून होतो.
एस्पोमा साइट्रस प्लांट फूड
या खताचे पोषक गुणोत्तर 5-2-6 आहे. ते लिंबाच्या झाडावर वर्षातून तीन वेळा लावावे लागते.एक नैसर्गिक आणि सेंद्रिय खत आहे.
लिंबाच्या झाडांना खत देण्याची पद्धत
- वसंत ऋतूच्या सुरुवातीस, उन्हाळ्यात दर चार ते सहा आठवड्यांनी एकदा आपल्या लिंबाच्या झाडाला खत द्यावे.
- लिंबाच्या झाडाच्या वाडी दरम्यान चार ते सहा आठवड्यांच्या अंतराने खते दिल्यास तुमच्या लिंबाच्या झाडाला वाढण्यास आणि फळ देण्यास पुरेसे पोषक असतात याची खात्री होईल.
- लिंबाचे झाड जेव्हा उन्हाळ्याच्या उत्तरार्धामध्ये उत्पादन कमी करते तेव्हा पुढील वसंतऋतू पर्यंत खत देणे थांबवा.लिंबाच्या झाडाला दरवर्षी योग्य हंगामात खत घालण्याची व्यवस्था करावी.(स्त्रोत-हॅलो कृषी)
Share your comments