
the calcium sulphate is so useful and benificial crop and soil fertility
जिप्सम हा शेतीसाठी एक महत्त्वाचा घटक असून हे चांगले प्रकारचे भूसुधारक देखील आहे. कॅल्शियम सल्फेट यालाच जिप्सम असे म्हणतात. चोपण जमिनीची सुधारणा करायची असेल तर जीप्सम खूप उपयोग होतो.
ज्या जमिनीचा पीएच साडे सात पेक्षा जास्त झाला तर पिकांना अन्नद्रव्य अपटेक करताना बऱ्याच प्रकारच्या अडचणी उपलब्ध होतात. कारण त्या जमीन अल्काइन आहेत आणि जिप्सम मध्ये सल्फ्युरिक ॲसिड असल्याने जास्त झालेला पीएच कमी होतो व पिके जमिनीतील अन्नद्रव्य अपटेक करू शकतात.
जिप्समचे होणारे फायदे (Benifit Of Calcium Sulphate)
1-जिप्सम मुळे जमिनीची सुपीकता वाढते.
2- जमीन भुसभुशीत होण्यासाठी मदत होतेतसेच जमिनीची रचना बदलणास देखील खूप मदत होते.
3- क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सम मुळे सुटसुटीत होतात. त्यामुळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते.
4- बियाण्याची उगवणक्षमता चांगली होते.
5-पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात.
6-जमिनीची धूप कमी होते.
7- जमिनीचा पाण्याचा निचरा होऊन जमिनी या पाणथळ होत नाहीत. तसेच जमिनीतील कॅल्शियम व मॅग्नेशियम चे प्रमाण सुधारते.
8- सेंद्रिय पदार्थांचे लवकरकुजण्यासाठी मदत होते.
9- जिप्सम मुळे पिकांना गंधक मिळतो व तो पिकांना खूपच महत्त्वाचा आहे.
10-जिप्सम मुळे पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्य जास्त शोषले जातात.
11- कंद पिकांसाठी जिप्सम खूप महत्त्वाचा असून जिप्सम मुळे कंद पिकाला माती चिटकत नाहीआणि सर्वात महत्वाचे म्हणजे जमिनीतील हुमणीचे नियंत्रण होते.
महत्वाच्या बातम्या
Share your comments