1. फलोत्पादन

आंबा अन् पपईवरील बुरशीवर कसा कराल उपाय

KJ Staff
KJ Staff


देशातील शेतकरी आता फळबागाकडे मोठ्या प्रमाणात वळू लागला आहे. महाराष्ट्रामध्ये ही फळबागांच्या खालील लागवड क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. तसेच महाराष्ट्रातील खानदेश,  पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भागांमध्ये पपईची लागवड मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.  तसेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी इत्यादी कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांमध्ये आंबा लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत चांगल्या प्रकारचे भर पडत आहे. परंतु वातावरणात अचानक बदल किंवा इतर तत्सम कारणांमुळे फळबागांवर अनेक बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे पपई आणि आंब्यावर येणाऱ्या अँथ्रॅकनोज बुरशी हे जास्त नुकसानकारक आहे.  त्याविषयी लेखात आपण माहिती घेऊ.

अँथ्रॅकनोज बुरशी ही थोडक्यात खालील लक्षणांवरून ओळखता येते. प्रामुख्याने म्हणजे प्रादुर्भावित फळांवर गडद तपकिरी डाग येतात  आणि हाडांमध्ये गुलाबीसर ते नारिंगी ठिपके दिसायला लागतात.  पानांवर गडत कडांचे आणि पिवळ्या प्रभावळीचे राखाडी तपकिरी डाग येतात.

अँथ्रॅकनोज बुरशीविषयीची माहिती

जगभरात अँथ्रॅकनोज हा महत्वाचा बुरशीजन्य रोग आहे. कोलेटोट्रिकम ग्लोईओस्पोरि ओईड्स नावाच्या जमिनीत राहणाऱ्या बुरशीमुळे हा रोग होतो. बऱ्याचवेळा ही बुरशी आंब्याच्या कोई मध्ये किंवा जमिनीवरील पिकाच्या अवशेषात जिवंत राहते. अनुकूल हवामानात निरोगी, जखमी न झालेल्या कैऱ्यांवर वाऱ्याद्वारे किंवा पावसाच्या पडणाऱ्या पाण्यामुळे पसरते. आंबा, केळी हे या बुरशीचे काही पर्याय वाहक आहेत. मध्यम तापमान, अतिशय उच्च आर्द्रता आणि जमिनीचा कमी सामु या रोगाच्या वाढीसाठी अनुकूल असतात. कोरडी हवा, कडक ऊन किंवा अतिशय जास्त तापमान या बुरशीची वाढ थांबवितात. या बुरशीला तिचे जीवन चक्र पूर्ण करण्यासाठी लागण झालेली फळे एका विशिष्ट प्रमाणात पर्यंत पिकणे गरजेचे असते.

    अँथ्रॅकनोज बुरशीची काय आहेत लक्षणे

अँथ्रॅकनोज बुरशी पानांवर आणि देठांवर ही दिसते पण जास्त करून हा फळांचा रोग आहे. प्रादुर्भाव झालेली पाने हे राखाडी तपकिरी घेऊन त्यांचे कडा गडद पिवळी दिसते. काही कालांतराने हे पडलेले डाग मोठे होतात. एकमेकात मिसळलेले सारखे दिसतात.  त्यांचा आकार मोठा होतो. ज्याने मोठे करपलेले भाग तयार होतात. सुरुवातीच्या काळामध्ये फळांच्या सालीवर लहान, फिक्कट रंगाचे ठिपके दिसतात. जशी ती पिकतात तसे दाग चांगलेच मोठ्या आकाराचे आणि गोल गडद तपकिरी रंगाचे होतात. काही वेळेस फळांना साठवण करून शीतगृहमध्ये ठेवले जाते. अशा वेळीसुद्धा फळांवर या रोगाची लक्षणे दिसतात किंवा येऊ शकतात.

    अँथ्रॅकनोज बुरशीवर नियंत्रण ( जैविक)

बॅसिलस सबटीलीस आधारित बुरशीनाशके ही जर अनुकूल हवामानात वापरली तर चांगला परिणाम दिसून येतो. बियाणांवर किंवा फळांवर गरम पाण्याचे उपचार म्हणजे जवळजवळ ४८ डिग्री सेल्सिअस गरम पाण्यात वीस मिनिटे बुडवून ठेवणे असे केल्याने ही काही बुरशीचे अवशेष राहिले असतील तर मारले जातील आणि रोगाचा प्रसार शेतात किंवा परिवहन आत होणार नाही.  जेव्हा आपण संक्रमित काट्याच्या काडीत असतो तेव्हा छाटलेल्या जागी बोर्डो पेस्ट लावावी. दहा ते १२ दिवसांच्या अंतराने लागोपाठ किमान तीन वेळा फवारणी करावी. किंवा रासायनिक उपचारांमध्ये जर अझोक्सिस्टरॉबीन, क्लोरोथॅलोनील किंवा कॉपर सल्फेट असणाऱ्या बुरशीनाशकांची लागोपाठ तीनवेळा १० ते २ दिवसांच्या अंतराने फवारणी केल्यास संसर्गाची जोखीम कमी होते. जेव्हा आपण बीजप्रक्रिया करतो तेव्हा सुद्धा या बुरशीनाशकांचा वापर करणे फायदेशीर ठरते.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters