1. फलोत्पादन

परफेक्ट छाटणी तंत्र, लिंबूवर्गीय झाडांना देईल व्यवस्थित आकार व मिळेल बक्कळ उत्पादन

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
prunning technology of citrus fruit is so immportant for more production

prunning technology of citrus fruit is so immportant for more production

झाडाच्या वरच्या भागातील मुख्य व उप - फांद्यांवर खालच्या व मधील बाजूस येणाऱ्या, गर्दी करणाऱ्या अनावश्‍यक फांद्या कात्रीच्या साह्याने कापून घ्याव्यात.

यामुळे झाडात सूर्यप्रकाश व हवा खेळती राहून कर्बग्रहणाचे, नवीन फुटी चे प्रमाण वाढून त्यावर अधिक फुलधारणा - फलधारणा होण्यास मदत होईल. जमिनीपासून 1 मीटर उंचीपर्यंत खांद्या मुख्य खोडापासून कापून घ्याव्यात. याशिवाय वाळलेल्या रोग-कीडग्रस्त फांद्या कात्रीच्या साह्याने कापून त्या पेटवून घ्याव्यात. झाडावरील पानसोट वेळच्यावेळी काढून घ्यावेत. पानसोट तसेच वाढ दिल्यास त्यांचे रूपांतर फांद्यात होऊन ते जोमदार वाढतात. परंतु अशा फांद्यांवर फलधारणा उशिरा आणि फारच कमी प्रमाणात होते. यामुळे बराचसा लिंबोनी बागायतदारांचा असा समज होतो की लिंबोणीच्या जमिनी लगतच्या फांद्यांवर फक्त फलधारणा होतो वरील फांद्यांवर नाही. त्यामुळे जमिनीलगतच्या फांद्या काढायला ते इच्छुक नसतात. परंतु अशी परिस्थिती असून जमिनीलगतच्या फांद्या मुळे झाडांमधील अंतर मशागत करता येत नाही, काट्यांचा उपद्रव होतो, गर्दीमुळे बागेतील आर्द्रता वाढून 'खैरा' रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. रस शोषणाऱ्या किडी तसेच पाने पोखरणाऱ्या अळ्यांच्या प्रमाण वाढून त्यांचा अनिष्ट परिणाम झाडांची वाढ फलधारणा तसेच फळांच्या प्रतीवर होतो.

झाडांच्या फांद्या पान सोटद्वारे  तयार झालेले असल्यास त्यावर फलधारणा केव्हाही कमी होणार. बागेमध्ये झाडांमध्ये सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचायला हवा तसेच हवा खेळती रहायला हवी.

 बागेतील आर्द्रतेचे प्रमाण 50 ते 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नको,याच साठी जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंतच्या संपूर्ण फांद्या काढायला हव्यात. बागेची छाटणी करताना प्रत्येक झाड बदलताना वापरात येणारे हत्यारे करवती, कात्री, कुराडी या सोडियम हायपोक्लोराईड (10 मिली औषध 1 लिटर पाणी ) द्रावणाने धुवून घ्यायला हव्यात. ( सोडियम हायपो क्लोराईड उपलब्ध नसल्यास पोटॅशियम परमॅग्नेट चा वापर करावा. ) छाटणी झाल्याबरोबर संपूर्ण झाडांवर बोर्डो मिश्रणाचा फवारा घ्यावा. झालेल्या जखमांवर लगेच बोर्डो पेस्ट लावावी. झाडांच्या फांद्यांवर 70 ते 90 सें.मी.उंचीपर्यंत बोर्डामिश्रण लावून घ्यावे.

खोडावर मुख्य फांद्यांवर डीक्या  रोगाचा अथवा खोडकुज, पायकुज या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्या ठिकाणी डिंक कुजलेली साल चाकूच्या साह्याने खरडून काढून ती पेटवून घ्यावी. नंतर झालेल्या जखमा पोटॅशियम मॅग्नेट च्या द्रावणाने स्वच्छ धुऊन त्यावर लगेच बोर्डोपेस्ट लावावे.

 महत्त्वाच्या बातम्या

नक्की वाचा:तरुण शेतकरी मित्रांनो! शेती तर नक्कीच करा परंतु शेतीला जोडधंदा म्हणून बटाटा प्रक्रिया उद्योगाचा विचार करा

नक्की वाचा:नक्की वाचा! निसर्ग ठरवतो कोणत्या घटकाला लवकर कुजवायचे, कुजवणे हे निसर्गाची क्रिया आहे आपली नाही....!

English Summary: prunning technology of citrus fruit is so immportant for more production Published on: 08 May 2022, 09:48 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters