1. फलोत्पादन

फायदेशीर पेरू लागवड तंत्रज्ञान

पेरू पिकाचे वैशिष्ट्ये म्हणजे या पिकाचा कणखरपणा म्हणजेच कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे फायदेशीर पीक. पेरूचे फळे रूचकर आणि इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असल्यामूळे पेरूचे फळ सर्व लोकांमध्ये प्रिय आहे. पेरूच्या फळामध्ये ‘क’ जीवनसत्व तसेच खनिजद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. पेरूच्या फळापासून जॅम, जेली, आईस्क्रीम, सरबत तसेच हवाबंद डब्यातील फोडी तयार करता येतात. पेरूचे झाड टणक असल्यामूळे शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी झाडाचा उपयोग होतो. इतर फळझाडांच्या तुलनेत पेरूचे पिक कमी खर्चाचे हमखास उत्पादन देणारे आणि कमी मेहनतीचे असल्याने ह्या पिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Guava Cultivation

Guava Cultivation

पेरू पिकाचे वैशिष्ट्ये म्हणजे या पिकाचा कणखरपणा म्हणजेच कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे फायदेशीर पीक. पेरूचे फळे रूचकर आणि इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असल्यामूळे पेरूचे फळ सर्व लोकांमध्ये प्रिय आहे. पेरूच्या फळामध्ये ‘क’ जीवनसत्व तसेच खनिजद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. पेरूच्या फळापासून जॅम, जेली, आईस्क्रीम, सरबत तसेच हवाबंद डब्यातील फोडी तयार करता येतात. पेरूचे झाड टणक असल्यामूळे शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी झाडाचा उपयोग होतो. इतर फळझाडांच्या तुलनेत पेरूचे पिक कमी खर्चाचे हमखास उत्पादन देणारे आणि कमी मेहनतीचे असल्याने ह्या पिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.

हवामान आणि जमीन:

उष्ण आणि समशितोष्ण हवामानात जेथे हिवाळ्यात थंडी अधिक असते तेथे पेरूची लागवड करता येते. कोरड्या आणि उष्ण हवामानात पेरूचे उत्पादन चांगले येते. पेरूच्या झाडाची ताण सहन करण्याची क्षमता जास्त असल्याकारणाने दुष्काळी भागात सुध्दा पेरूची यशस्वी लागवड करता येते.

लागवडीसाठी जमीनीची निवड करताना जमीन पाण्याचा योग्य निचरा होणारी तसेच हलकी व मध्यम काळी व ज्या जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 आहे अशी जमीन लागवडीस योग्य आहे.

सुधारित जाती:

पेरूच्या अनेक सुधारती जाती उपलब्ध आहेत. यापैकी व्यापारीदृष्ट्या सरदार (लखनऊ-49) व ललित या जातींची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये सरदार (लखनऊ-49) ही जात अधिक उत्पादन आणि चांगल्या प्रतीची फळे देणारी आहे.

हेही वाचा:‘या’ कारणांमुळे आंबा उत्पादन कमी होण्याची शक्यता

पेरूची अभिवृध्दी:

पेरूची अभिवृध्दी दाब कलम पध्दतीने करतात. पेरूच्या लागवडीसाठी जोमदार वाढीची आणि निरोगी कलमे निवडावीत. कलमाच्या लागवडीसाठी 3 X 3 X 3 फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्डा भरताना यामध्ये जैविक खताचे मिश्रण तयार करून टाकावे.

शेणखत/गांडूळखत: 15 किलो प्रती खड्डा

अझोटोबॅक्टर: 50 ग्रॅम प्रती खड्डा

पी.एस.बी: 50 ग्रॅम प्रती खड्डा

के.एम.बी: 50 ग्रॅम प्रती खड्डा

ट्रायकोडर्मा: 50 ग्रॅम प्रती खड्डा

निंबोळी पेंड: 50 ग्रॅम प्रती खड्डा

फॉलीडॉल पावडर: 100 ग्रॅम

कलमांची लागवड कमी पावसाच्या भागात पावसाळ्याच्या सुरूवातीला आणि जास्त पावसाच्या भागात पाऊस संपल्यावर म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये करावी. लागवड केल्यानंतर नवीन झाडाला काठीचा आधार द्यावा. कलमांना सुरुवातीला पाण्याचा ताण पडून देऊ नये.

पारंपारिक पेरू लागवडीचे तोटे:

  • पारंपारिक पेरू लागवड पध्दतीमध्ये 200 X 20 फूट अंतरावर लागवड केली जाते. लागवड केल्यानंतर चौथ्या वर्षानंतर उत्पादनास सुरूवात होते. फळांच्या काढणीनंतर छाटणी केली जात नाही.
  • छाटणी करण्यामूळे बागांमध्ये फांद्यांची दाटी होते. यामूळे सूर्यप्रकाश जमीनीपर्यंत पोहचत नाही. व जमीन लवकर वाफसा स्थितीमध्ये येत नाही.
  • पारंपारिक पाणी व्यवस्थापनामध्ये झाडाभोवती गोल किंवा चौकोणी आळे तयार करून जास्त प्रमाणात पाणी दिले जाते. पाणी देण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर कमी असते. त्यामूळे बागेमध्ये ओलावा व आर्द्रता वाढल्यामूळे फळमाशीचे प्रमाण वाढते.
  • झाडांना शेणखत किंवा सेंद्रीय खताचा वापर कमी केल्यामूळे रासायनिक खतांचा वापर जास्त असल्यामूळे जमिनीतील सामू-क्षारांचे प्रमाण वाढते. व पांढरी मूळी जास्त वाढत नाही. परिणामी फळांचा आकार वाढत नाही. आणि पुढे लवकर परिपक्व होऊन गळतात.

यासाठी पेरूची लागवड सघन पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते. सघन पद्धतीने किंवा मिडो ऑर्चड पद्धतीने लागवड कशी करावी याविषयी महितीसाठी: सघन पद्धतीने पेरू लागवड

खते आणि पाणी व्यवस्थापन:

पेरूच्या झाडाला सुरूवातीच्या पाच वर्षे पुढीलप्रमाणे खते द्यावीत.

वय   

शेणखत (किलो)

नत्र (ग्रॅम/झाड)

स्फुरद (ग्रॅम/झाड)     

पालाश (ग्रॅम/झाड)

1

10

150

150

150

2

20

300

300

300

3

30

450

450

450

4

40

600

600

600

5 वर्षे व पुढे

50

750

750

750


एकुण नत्राच्या मात्रेपैकी 30 टक्के नत्र जुन-जुलै महिन्यात, 30 टक्के नत्र सप्टेंबर महिन्यात आणि उरलेला नत्र फेब्रुवारी मध्ये द्यावा. झाडाला फळे होण्यास सुरूवात झाल्यावर प्रत्येक झाडाला दरवर्षी 20 ते 30 किलो शेणखत मे महिन्याच्या शेवटी 375 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश द्यावे आणि उरलेला 375 ग्रॅम नत्र फळधारणा झाल्यानंतर द्यावे.

पेरूला उन्हाळ्यात 10 ते 15 दिवसाच्या अंतराने दर हिवाळ्यात 20 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. फळधारणा चालु झाल्यानंतर बहार नियोजनानूसार पाणी व्यवस्थापन करावे व झाडांना पाण्याचा ताण देऊ नये. नाहीतर फळगळ चालू होते. बहाराच्या वेळी ठिबक सिंचन पध्दतीने दररोज 3-4 तास पाणी द्यावे.

श्री. यशवंत जगदाळे, डॉ. सय्यद शाकीर अली
कृषी विज्ञान केंद्र, बारामती 
02112-255207 / 255227
 

English Summary: Profitable Guava Cultivation Published on: 03 October 2018, 06:24 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters