- पोटॅश / पालाश :-
पोटॅश युक्त खतेही वनस्पतींना आवश्यक असणारे खते आहेत यातील पोटॅशियमचे प्रमाण नेहमी पोटॅसियम ऑक्साईड मध्ये (K20) व्यक्त केली जाते.पोटॅश युक्त खतेहीवाढणाऱ्या वनस्पतींना आवश्यक असून उतकांच्या चयापचयासाठी ही ( शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक- भौतिक घडामोडींसाठी ही ) आवश्यक असतात.
स्टार्च व शर्करा तयार करण्यासाठी आणि त्यांच्या वहनासाठी, धान्य व यांची खोडे बळकट होण्यासाठीखराब हवेपासून पासून वनस्पतीचे संरक्षण करण्यासाठी, जमिनीतील नायट्रोजनाचे प्रमाण व्यवस्थित राखण्यासाठी इत्यादी कारणांसाठी ही या खतांचा उपयोग होतो.
पोटॅशियम लवणापैकी क्लोराईड सल्फेट व नायट्रेट ही लवणेखत म्हणून वापरले जातात. ती पाण्यात विद्राव्य असून त्यांचे वनस्पती शोषून घेऊ शकतील. अशा पोटॅशियम आयनात अपघटन होते. पृथ्वीवर पोटॅशियम हे विविध खनिजांचा भाग म्हणून सर्वत्र आढळते. बहुतेक सर्व पोटॅश खते ही सिल्वाइट,कार्नालाईट,कायनाइट,लँगबेनाईट,सीलव्हॅनाईट या जलविद्राव्य खनिजांपासून आणि काही प्रमाणात लवण द्रव्हापासून तयार करतात.
- पोटॅशियम क्लोराईड :- ही म्युराईट ऑफ पोटॅश या नावाने विकलेजाते. नेहमीचे 98 टक्के शुद्ध पोटॅशियम क्लोराइड खत व्यवसायात 60 टक्के म्युराईट म्हणून ओळखले जाते,तर अशुद्ध पोटॅशियम क्लोराईड ला 50 टक्के म्युराईट म्हणतात.
हे मिठासारखे दिसणारे व कडू चव नसणारे खत आdहे. त्यातून 60 टक्केपोटॅशमिळते. खनिजांपासून ते स्फटिकी करणाने वप्लवनाने(तरंगवून ) तयार करतात. ते चूर्ण स्वरूपात तसेच दाणेदार स्वरूपात तयार करतात. ते जलविद्राव्य असून जास्त प्रमाणात वापरात असणारे पोट्याश युक्त खत आहे.
- पोटॅशियम सल्फेट :-
या खतात 48-50 % पोटॅश असते. हे खत पोटॅशियम क्लोराइड व सेल्फयुरिक आम्ल यांच्या विक्री येणे तसेच लेग बे नाईट या खनिजापासून तयार करतात. हे खत जलविद्राव्य असले तरी ते वाहून जात नाही.
- पोटॅशियम नायट्रेट :- नायट्रिक अम्ल व पोटॅशियम क्लोराईड यांच्या विक्रीयेणे हे खत तयार करतात.ही नेहमी जलशोषक असल्याने त्याचा खत म्हणून वापर करतात. यात 44 टक्के पोटॅश व 13 टक्के नायट्रोजन असतो.
- इतर पोटॅश युक्त खते :- पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट (25-30 % पोटॅश ) हे लेगबेनाईटापासून तयार करतात. सिमेंट निर्मितीच्या भट्ट्यातील वाया जाणारी धूळ, साखर व्यवसायात निर्माण होणारे मळी, राख, लोकर,त्यावर निघणारा मूळ यापासूनही पोटॅश मिळवतात.
- पोटॅशियम विषयी थोडेसे…
पोटॅश युक्त खते अनेक आहेत पण खालील दोन प्रकारची पोट्याश युक्त खते आपल्याकडे प्रामुख्याने वापरले जातात.
- क्लोराईड :- या गटात ढोबळ मानाने आपल्याकडे एकच प्रकारचे खत आहे. ते म्हणजे MoP यामध्ये 50 टक्के पोटॅशियम असते.
- सल्फेट :- या गटात SoP व पोटॅशियम नायट्रेट ही खते प्रामुख्याने वापरली जातात. SoP मध्ये 43% तर पोटॅशियम नायट्रेट मध्ये 36 टक्के पोटॅशियम असते.
द्राक्षे, फळझाडे, ऊस, बटाटा, टोमॅटो, काकडी,कांदा, कपाशी या पिकांमध्ये क्लोराईड युक्त खते वापरू नयेत. याचे कारण म्हणजे या पिकांना क्लोरीन थोडे सुद्धा जास्त झाले तर चालत नाही म्हणून सदर पिकांमध्ये पोटॅशियम द्यायचे असल्यास सल्फेट/फास्फेट गटातील खतातून द्यावे.म्हणजे आपल्या खतांना चांगला रिझल्ट येईल. आणि झाडांना होणारा त्रास व त्यातून होणारा विनाकारण खर्च वाचेल.(स्रोत-होय आम्ही शेतकरी)
Share your comments