1. फलोत्पादन

आंबा बागायदारांसाठी पंचसुत्री कार्यक्रम, या सूत्रांचा वापर केल्यास आंबा उत्पन्नात वाढ होणार

डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचसोबत बदलते हवामान आणि ढगाळ वातावरण यामुळे बुरशी कीड यासारख्या रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता.तसेच जोराचा वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे मोहर सुद्धा बऱ्याच प्रमाणात झडुन गेला होता. परंतु येणाऱ्या काही दिवसात वातावरण स्वच्छ असल्याने पुन्हा एकदा आंब्याला मोहर बहरू लागले आहेत.तसेच यासाठी औषध फवारणी करणे सुद्धा खूप गरजेचे आहे. असे आवाहन कृषी पिद्यापीठाने सुद्धा केलेले आहे. तसेच शेतकरी वर्गाने विद्यापीठाचा पंचसुत्री कार्यक्रम सुद्धा अमलात आणला आहे. हा पंचसूत्री कार्यक्रम आंबा पिकाला नवसंजीवनी मिळणार लाभणार आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
mango

mango

डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याचे (mango) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचसोबत बदलते हवामान आणि ढगाळ वातावरण यामुळे  बुरशी कीड यासारख्या रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता.तसेच जोराचा वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे मोहर सुद्धा बऱ्याच प्रमाणात झडुन गेला होता. परंतु  येणाऱ्या काही दिवसात वातावरण स्वच्छ असल्याने पुन्हा एकदा आंब्याला मोहर बहरू लागले आहेत.तसेच यासाठी औषध फवारणी करणे सुद्धा खूप गरजेचे आहे. असे आवाहन कृषी पिद्यापीठाने  सुद्धा केलेले आहे. तसेच शेतकरी वर्गाने विद्यापीठाचा पंचसुत्री कार्यक्रम सुद्धा अमलात आणला आहे. हा पंचसूत्री कार्यक्रम आंबा पिकाला नवसंजीवनी मिळणार लाभणार आहे.

व्यवस्थापन:-

आता पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे वातावरण एकदम स्वच्छ आणि कोरडे आहे. तसेच कोकणातील भागात 19 ते 23 सेल्शियस तापमान वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे व्यवस्थापन करण्यासाठी हे वातावरण खूप पोषक ठरत आहे तसेच गरजेनुसार छाटणी, रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर, संजीवकांचा वापर, आंबा मोहोर संरक्षण आणि फळांचे व्यवस्थापन या खूप महत्वाच्या प्रक्रिया आहेत.आंब्याच्या कैऱ्या या सुपारीच्या आकाराच्या झाल्या की प्रत्येक झाडाला 100 ते 150  लिटर पाणी द्यावे. 15 दिवसांच्या काळामध्ये कमीत कमी 3 ते 4 वेळा पाणी द्यावे. यामुळे फळांचा आकार लवकर वाढेल आणि फळगळती चे प्रमाण सुद्धा कमी होईल. आंब्याच्या मोहोराचे  संरक्षण  करतन्यासाठी  तिसऱ्या  आणि सहाव्या  फवारणीच्या  वेळी युरियाचे मिश्रण करावे आणि फवारणी करावी. त्यामुळे आंब्याची वाढ लवकरात लवकर होते.

मोहरासाठी पोषक वातावरण:-

डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला आंब्याच्या मोहरासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे बागायतदार चिंतेत होता परंतु आता आंब्याला  मोहर  बहरू लागले आहेत. तसेच  वातावरणात  पोषक वातावरण असल्यामुळे ते मोहरासाठी खूप उपयुक्त असते. मोहर यायच्या वेळी झाडावर पोटॅशियम नायट्रेटची  फवारणी  करावी त्यामुळे झाडाला एकसारखा मोहर लागण्यास  मदत  होते.

कीड,बुरशी व्यवस्थापन गरजेचे:-

सध्या वातावरणामध्ये आंब्यासाठी पोषक अशी थंडी उपलब्ध नाही. जर का वातावरणामध्ये गरमी निर्माण झाली तर आंब्याच्या  मोहरावर कीड  पडण्याची दाट  शक्यता असते.यासाठी  कीड नियंत्रणाच्या  उपाययोजना  करणे गरजेचे  आहे. यामध्ये  रासायनिक  खतांचा  योग्य  वापर, छाटणी, आणि कीटकनाशकाची फवारणी करावी. सध्या वातावरण पोषक आहे यामध्ये योग्य व्यवस्थापन करून आपण आंब्याचे उत्पादन वाढवू शकतो.

English Summary: Panchasutri Program for Mango Growers, Use of these formulas will increase mango yield Published on: 13 December 2021, 07:09 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters