1. फलोत्पादन

संत्रा फळगळ! या मुख्य कारणामुळे होते संत्रा फळांची गळती,जाणून घेऊ कोणती आहे ती कारणे

संत्रा फळबाग मध्ये नैसर्गिक परिस्थिती,पाण्याचीतसेच मूलद्रव्यांचे असलेली कमतरता,संजीवकांचा अभावतसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव या प्रमुख कारणांमुळे फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते.त्यामुळे संत्रा बागेचे योग्य व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते.या लेखात आपण संत्रा बागेची फळगळ का होते याची कारणेमाहिती करू.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
orchard planting

orchard planting

संत्रा फळबाग मध्ये नैसर्गिक परिस्थिती,पाण्याचीतसेच मूलद्रव्यांचे असलेली कमतरता,संजीवकांचा अभावतसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव या प्रमुख कारणांमुळे फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते.त्यामुळे संत्रा बागेचे योग्य व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते.या लेखात आपण संत्रा बागेचीफळगळ का होते याची कारणेमाहिती करू.

या कारणांमुळे होते संत्रा बागेतील फळगळ

  • वातावरणाचा परिणाम- संत्राबागे मध्ये तापमान, आद्रता आणि वारा या बाह्य घटक फळगळ होण्यासाठी कारणीभूत ठरतात. जर आपण मागील काही वर्षांचा विचार केला तर एप्रिल महिन्यामध्ये तापमानात झालेली अचानक वाढ खूप मोठ्या प्रमाणात आंबिया बहराच्या फळांची गळ होण्यास कारणीभूत ठरते. त्यासोबतच हवेतील आद्रता सुद्धा फळ गळीस  कारणीभूत ठरते.
  • अनियमित पाणीपुरवठा- संत्रा फळ झाडाला फळधारणा झाल्यानंतरझाडांना नियमित पाणी न दिल्यास फळांची गळ होते. आंबिया बहराची फळे टिकविण्यासाठी पाण्याची फार आवश्यकता असते. जर उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असली तर फळगळ मोठ्या प्रमाणात होऊ शकते. अशा जमिनीमध्ये जास्त पाण्याचे प्रमाण असताना सुद्धा फळ होते.
  • बागेचे व्यवस्थापन-पावसाळ्यामध्ये जर संत्रा बागेमध्ये पाणी साचून राहिले तर फळगळ होते.तसेच गरजेपेक्षा जास्त पाणी तसेच चुकीच्या पद्धतीने झाडाला दिले तर फळगळ होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याच बागांमध्ये सल काढण्यात येत नाही.सल न काढल्यास त्यावर बुरशीची वाढ होऊन फळीगळ होण्यास कारणीभूत ठरते. अशा बागेमध्ये फळे काढल्यानंतर फळांची सड लवकर होते.
  • कीड व रोग- संत्रा बागेत जर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झाला तर फळगळ आढळून येते.आंबिया बहराची फळे, रस शोषण करणाऱ्या पतंग आंबुळे ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात गळतात. या फळांना दाबून पाहिले तर त्याला क्षीद्रपडलेले दिसते आणि त्यातून रसाची चिळकांडी उडते. काही फळे बुरशीमुळे गळतात.
  • अन्नद्रव्यांची कमतरता-काही बागांमध्ये फळधारणा चांगली झाल्यानंतर सुद्धा फळांची गळ होते.झाडावर फार कमी प्रमाणात फळे शिल्लक राहतात व फळांची प्रत व्यवस्थित राहत नाही.याचे महत्त्वाचे कारण म्हणजे झाडांची फळधारणा व ती टिकवून ठेवण्याची क्षमता या सगळ्या बाबी जमिनीचा मगदूर आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता यावर अवलंबून असतो.जमिनीमध्ये जर चुनाव जस्ताचे प्रमाण कमी असेल तर मोठ्या प्रमाणावर फळगळ होते.
  • संजीवकांचा अभाव-झाडातील नैसर्गिक संजीवकांचे प्रमाण कमी झाल्यास फळांची गळ होते. या फळ गळी मुळे मात्र उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते.  ही फळगळ वेळीच उपाययोजना करून थांबविणे आवश्यक असते.
English Summary: orange fruit omission reason and management of this problem Published on: 18 November 2021, 12:17 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters