मिलीबगही कीड झाडाच्या सालीच्या खाली, फळांच्या आणि फांद्यांच्या फटीत राहते. चिवट कापसासारख्या पांढऱ्या पदार्थाच्या आवरणामध्ये ती अंडी घालते.पूर्ण वाढ झालेल्या कीडीच्या शरीरावर मेणचट पांढऱ्या रंगाचे आवरण असते.
त्यामुळे आपण फवारणी जरी केली तरी ती हंड्रेड पर्यंत किंवाकिडीच्या शरीरापर्यंत पर्यंत पोहोचू शकत नाही. ही कीड फारच नुकसान दायक असते.ही कीडचीमादी सैलसर कापडासारखे पुंजक्यातजवळपास सहाशे अंडी घालते. अंडी वाढत्या शेंड्यावर,फळांवर, सालीखाली, जमिनीलगत खोडाभोवती दिसून येतात. अंडी अंडाकृती व नारंगी रंगाचे असतात.
या किडीमुळे होणारे नुकसान
- पिल्ले व प्रौढ पाने, कोवळ्या फांदया,कळ्या आणि कोवळी फळे या मधून रस शोषण करतात. परिणामी फळांचा आकार वेडावाकडा होतो. झाडाची वाढ मंदावते.
- नवीन फुटींची व पानांची वाढ खुंटते. फळांची वाढ अयोग्य होऊन आकार वेडावाकडा होतो.
- मिलीबग शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ सोडते.त्यावर काळी बुरशी वाढते. परिणामी पाने व फळे काळी पडतात. कांदा बाजार भाव मिळत नाही.
मिलीबगचे एकात्मिक कीडनियंत्रण
- जमिनीची खोलवर गरट करावी. जमीन उन्हात चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीत असणाऱ्या किडींच्या अवस्था नष्ट होतात.
- मिलीबग झाडावर चढू नये यासाठी 15 ते 20 सेंटिमीटर रुंदीचे प्लास्टिक पट्टी ग्रीस लावून खोडावर बांधावी.मिलीबग या चिकटपट्टी यांना चिकटून मरतात.
- बागेचा सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. बागेच्या सभोवती भेंडी, कपाशी ही पिके घेऊ नयेत. कारण या पिकांवर ही कीड मोठ्या प्रमाणावर वाढते.
- परभक्षी मित्र कीटक क्रिप्टोलिमस मोंटरोझायरी प्रति एकरी सहाशे या प्रमाणात 15 दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळा बागेत झाडावर सायंकाळच्या वेळी सोडावे. भुंगेरे सोडल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकाची बागेवर फवारणी करू नये.
- आद्रता युक्त हवामान असल्यास व्हर्टिसिलियम लेकॅनीहे जैविक कीटकनाशक अधिक चार ग्रॅम फिशओईल रोझीनसोप पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
Share your comments