नत्र, स्फुरद आणि इतरांना द्रव्यांची उपलब्धता वाढविण्यासाठी जिवाणू संवर्धकाच्या वापर करणे फायदेशीर ठरते. रासायनिक खतांची गरज भागवण्यासाठी देखील जीवाणू संवर्धनाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. या लेखात आपण द्रवरूप जिवाणू खतांच्या वापराच्या पद्धती आणि फायदे याविषयी माहिती घेणार आहोत.
द्रवरूप जिवाणू खते वापरावयाच्या पद्धती आणि मात्रा
बीजप्रक्रिया
1-नत्रस्थिरकरणारे आणि पीएसबी जिवाणू संवर्धक प्रत्येकी 100 मिली प्रति 10 किलो बियाण्यास सारख्या प्रमाणात लावून लगेच पेरणी करावी.
2-सोयाबीन, भुईमूग यासारख्या पियानोवर पातळ आवरण असलेल्या पिकांसाठी प्रत्येकी 50 मिलि प्रति 10 किलो बियाण्यास जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
माती प्रक्रिया
एका एकर साठी नत्र स्थिर करणारे व पीएसबी जिवाणू प्रत्येकी एक लिटर प्रति चारशे किलो बारीक चाललेले शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये मिसळून पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर करतेवेळी दुचाड पाभरीतून पेरावे.
ठिबक सिंचनाद्वारे वापर
नत्र स्थिर करणारे व पीएसबी हे जिवाणू संवर्धक प्रत्येकी एक लिटर प्रति एकरासाठी वेंचुरी टॅंक मध्ये मिसळून ठिबक सिंचनाद्वारे पिकास द्यावे.
उद्या पिकास पिकाच्या मुळा सभोवती देणे..
एक एकर क्षेत्रासाठी नत्र स्थिर करणारे आणि पीएसबी जिवाणू संवर्धक प्रत्येकी एक लिटर ए 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी पंपाचा नोझलकाढून रोपाच्या जवळ सकाळी किंवा संध्याकाळी फवारावे.
जिवाणूसंवर्धकाची फायदे
1-जैविक खतांमुळे जमिनीच्या सुपीकता वाढून पोत सुधारतो, जमीन जैविक क्रियाशील बनते व उत्पादन क्षमतेत भरपूर वाढ होते.
2- मुळांच्या संख्येत व लांबीमध्ये भरपूर वाढ होते त्यामुळे खोलवर असणार्या अन्नद्रव्य आणि पाणी पिकास उपलब्ध झाल्यामुळे उत्पादनात वाढ दिसते.
3- जमिनीत प्रतिजैविके सोडल्यामुळे पिकांचे रोग व किड प्रतिकारक शक्ती वाढते. पीक संरक्षण खर्चाची बचत होते.
4-दुबार पेरणीसाठी उपयुक्त नत्र साठा शिल्लक राहतो.
5- धान्याचा दर्जा सुधारतो तसेच पिकाचे उत्पादन साधारणपणे 15 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढते.
Share your comments