1. फलोत्पादन

आंबा लागवडीच्या विचारात आहात का! मग जाणुन घ्या आंबा लागवडीची माहिती.

कमी खर्चात कशी बरं करणार आंब्याची शेती? भारतात आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. भारतीय फळ बाजारात आंब्याची मागणी खूप जास्त आहे. असे मानले जाते की भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अधिकाधिक फळबाग लागवडीला प्रोत्साहन द्यावे लागेल. कारण फळबाग लागवडीचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल, कारण बाजारात फळबागांच्या उत्पादनाला मोठी मागणी आहे. फळे, फुले आणि भाज्यांची मागणी नेहमीच बाजारात राहते. आज आम्ही तुम्हाला या लेखच्या माध्यमातून आंबा फळांच्या लागवडीबद्दल सांगणार आहोत. म्हणजे तुम्ही खूप कमी खर्चात आंब्याची लागवड कशी करू शकाल आणि एवढेच नाही तर तुम्ही आंब्याच्या लागवडीतून भरपूर पैसे कमवू शकाल.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
mango cultivation

mango cultivation

कमी खर्चात कशी बरं करणार आंब्याची शेती?

भारतात आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. भारतीय फळ बाजारात आंब्याची मागणी खूप जास्त आहे. असे मानले जाते की भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अधिकाधिक फळबाग लागवडीला प्रोत्साहन द्यावे लागेल. कारण फळबाग लागवडीचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल, कारण बाजारात फळबागांच्या उत्पादनाला मोठी मागणी आहे. फळे, फुले आणि भाज्यांची मागणी नेहमीच बाजारात राहते. आज आम्ही तुम्हाला या लेखच्या माध्यमातून आंबा फळांच्या लागवडीबद्दल सांगणार आहोत.  म्हणजे तुम्ही खूप कमी खर्चात आंब्याची लागवड कशी करू शकाल आणि एवढेच नाही तर तुम्ही आंब्याच्या लागवडीतून भरपूर पैसे कमवू शकाल.

 

 

भारतात आंबा शेतीसाठी खुप मोठी आहे बाजारपेठ

आंबा हे आपल्या देशातील सर्वात आवडते फळ आहे. विशेषतः छत्तीसगड राज्याची माती, हवामान सर्व आंब्याच्या बाजूने आहे. फक्त छत्तीसगडच नाही तर महाराष्ट्रात पण याच्या लागवडीला खुप वाव आहे, तसे पाहता इतर राज्यांमध्येही आंबा लागवडीसाठी प्रचंड वाव आहे. उत्तर भारताबद्दल बोलायचे झाले तर आंब्याला इतर ठिकाणांपेक्षा 20 ते 25 दिवस अगोदर फळे येतात. यामुळेच बाजारात आंबा आधीच उपलब्ध होतो. म्हणूनच भारतीय राज्यांमध्ये आंब्याच्या बागायतीसाठी प्रचंड वाव आहे.

 

 

 

 

 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आंब्याचीच लागवड का बरं करावी?

आंब्याची लागवड करण्याचे अनेक कारणे आहेत, त्यातील प्रमुख एक कारण म्हणजे लागवडीसाठी कमी पाण्याची गरज असते.  म्हणुन पाण्याचे संसाधने विकसित करून कोरडवाहू जमिनीवरही आंब्याची लागवड सहज करता येऊ शकते. आंबा लागवडीचे खुप फायदे आहेत. आंब्याचे सर्व भाग जसे की लाकूड, पाने इत्यादी हिंदू धर्मात पूजा साहित्य म्हणून वापरली जातात. या व्यतिरिक्त, हे केवळ चविष्ट फळेच पुरवते असं नाही, तर आंब्याचे लाकूड देखील खूप महाग विकले जाते. याच्या लाकडापासून खूप मजबूत फर्निचर बनवता येते. एवढेच नाही तर जर आंब्याची बाग लावली, तर इतर पिके पुढील 10 वर्षे त्याच बागेत आंतरपीके म्हणुन घेता येतात.  त्यामुळे साहजिकच सुरुवातीचे 8 ते 10 वर्षे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. त्यानंतर, आंब्याला फळे यायला लागल्यावर आंब्याच्या बागेतूनच प्रचंड उत्पन्न मिळेल.

 

 

 

 

 

 

पर्यावरणाच्या दृष्टीने आंब्याच्या बागांना अणण्यसाधारण असे महत्व प्राप्त होते

आंबा लागवडीची कल्पना ही एक उत्तम कल्पना आहे असे म्हटले जाते, एवढेच नाही तर तुम्ही जर आंब्याची लागवड केली तर तुमचे उत्पन्न देखील वाढवू शकाल. शेतकरी मित्रांनो आंब्याचे झाड हे पर्यावरणीय दृष्टीने महत्वाचे आहे असे अनेक कृषी वैज्ञानिक सांगतात म्हणुन आंब्याची बाग लावून आपण पर्यावरणासाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान देत आहात. यासोबतच आंब्याच्या लागवडीमुळे आजूबाजूची हवा स्वच्छ होईल म्हणुन हवेचे प्रदूषण कमी होईल व परिणामी आजूबाजूची जागा राहण्यासाठी एक उत्तम पर्याय बनेल. या व्यतिरिक्त, आपण जलसंधारणाच्या क्षेत्रात आपली महत्वाची भूमिका देखील देत आहात.  कारण झाडे लावल्याने परिसरातील भूजल पातळीत सुधारणा होते. शास्त्रीय पद्धतीने आंब्याची लागवड कशी करायची याबद्दल आपण चर्चा करणार आहोत म्हणुन शेवटपर्यंत हा लेख वाचा निश्चितच फायदा होईल..

 

 

 

 

आंबा लागवड कशी करायची?

  • आंब्याची आपल्या जमिनीसाठी योग्य असलेली सर्वोत्तम वाण निवडा कारण आंब्याची लागवड ही अशी लागवड नाही ज्यासाठी वारंवार कापणी आणि लागवड करता येते कारण आंब्याचे पिक हे बहुवार्षिक फळपीक आहे म्हणुन बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम आंब्यांची जात निवडा आणि मग लागवडीस सुरुवात करा.
  • आंब्याच्या सुधारित जातीची आणि योग्य प्रतीच्या निरोगी झाडांची निवड करा.
  • जमीन निवडल्यानंतर तेथे पाण्याची सुविधा आहे कि नाही हे बघा आणि नसेल तर पाण्याची सुविधा विकसित करा.
  • याशिवाय, जणावरांपासून संरक्षणासाठी जमिनीवर व्यवस्थित कुंपणाची व्यवस्था करा. यामुळे तुमचे केवळ प्राण्यांपासून संरक्षण होणार नाही, तर तुमचे पीकही चोरांपासून मोठ्या प्रमाणात सुरक्षित राहील. काटेरी तारांनी संपूर्ण शेताभोंवती करणे चांगले राहील.

 

 

 

 

आंबा लागवडीसाठी उत्तम शेतजमीन कोणती?

  • आंब्याच्या लागवडीसाठी सर्वात योग्य जमीन ही चिकणमातीची आहे, परंतु त्याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत शक्य आहे. जर थोडी कोरडी किंवा कडक माती असेल तर त्यातही आंब्याची बाग लावली जाऊ शकते.
  • पावसाळ्यात आपल्या शेतात पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. तसेच,पावसाळ्याच्या पाणी शेताबाहेर काढण्यासाठी ड्रेनेजची उत्तम व्यवस्था असावी.
  • आंबा पिकाला आंशिक पाणी दिले पाहिजे. शक्य असल्यास, बागेत ठिबक सिंचन प्रणालीच बसवा. जेणेकरून झाडांसाठी अधिक प्रभावी पद्धतीने पाणी देता येईल. ठिबक सिंचन झाडाला अधिक फायदा देते.
  • आंब्यांना मोहर येण्याच्या वेळी पावसाची किमान शक्यता असणारे क्षेत्र निवडा, अन्यथा त्याचा पिकावर नकारात्मक परिणाम होईल.
  • प्रदूषित वातावरणात आंब्याची लागवड प्रभावी ठरत नाही, जर जमीन वीटभट्ट्या किंवा चिमणीजवळ असेल तर तिथे शेती करू नका. याचा पिकावर नकरात्मक परिणाम होईल.

 

 

 

 

 

 

 

आंबा लागावाडीचा हंगाम नेमका कोणता बरं

  • जून महिन्यात आंब्याची लागवड करणे चांगले. हूण मध्ये 4 ते 6 इंच पाऊस झाल्यानंतर खड्डे तयार करा. खड्डा तयार केल्यानंतर आंब्याचे रोपे लावा.
  • 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान आंबा कधीही लावू नये, कारण हा काळ संपूर्ण पावसाळ्याचा असतो. पावसाळ्यात आंब्याची लागवड करू नका.
  • जर पुरेसे पाणी उपलब्ध असेल तर आपण फेब्रुवारी-मार्च महिन्यात आंब्याची लागवड करू शकता. ह्या काळात लागवड केली तर उत्पादन चांगले येते.

 

 

 

 

 

आंबा फळबागचे व्यवस्थापन

  • आंबा फळबाग लावणाऱ्या शेतकऱ्यांनो लक्षात ठेवा, लागवडीनंतरही, खालील प्रक्रियेनुसार झाडांना खत आणि खाद्य घाला कारण झाडांना दरवर्षी निश्चित प्रमाणात पोषकतत्वाची आणि खतांची गरज असते.
  • आंब्याची बागा लावण्यासाठी, लागवड करण्यापूर्वी जमीन व्यवस्थित स्वच्छ करा. आणि ज्या ठिकाणी झाडे लागवड करायची आहेत त्या ठिकाणी कव्हर केलेल्या अंतरानुसार त्याची रूपरेषा तयार करा.
  • आंब्याच्या बागांमध्ये एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत किमान 10 ते 12 मीटर अंतर असणे आवश्यक आहे.
  • तथापि, आंब्याच्या फळांची लागवड दाट केली जाते, ज्यामध्ये केवळ 2.5 मीटर अंतरावर खड्डा खोदला जातो आणि रोपांची लागवड केली जाते.
  • लागवडीसाठी नेहमी 1 × 1 × 1 मीटर आकाराचे खड्डे खणून काढा.
  • पावसाळ्यापूर्वी जून महिन्यात प्रत्येक खड्ड्यात 50 किलो शेण किंवा सेंद्रीय खत घालावे. याशिवाय 500 ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि 750 ग्रॅम पोटॅश आणि 50 ग्रॅम क्लोरोपायरीफ्रान्स जमिनीत मिसळून खड्डे भरावेत.

 

  • योग्य वेळ आल्यावरच खड्ड्यात चांगल्या प्रतीचे निरोगी आंब्याचे झाड लावा.
  • पावसाळा संपल्यानंतर 7 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्या. शक्य असल्यास, पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन करा. ठिबक सिंचन उपकरणांवरही सरकारकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात आहे.
  • सेंद्रिय खत किंवा सेंद्रिय खत उपलब्ध नसल्यास, दर 6 महिन्यांनी शेणखत वापरत रहा.

 

 

 

 

 

 

 

 

आंब्याच्या सुधारित जाती कोणत्या बरं (Improved Varieties Of Mango)

आंब्याच्या वाणांचे तीन भाग करता येऊ शकतात.

  • पहिले लवकर फळ देणारी विविधता जी खूप वेगाने विकसित होते आणि फळ देण्यास सुरवात करते. उदा.बैंगनफाली, तोतापरी, गुलाबखस, लंगडा, बॉम्बे ग्रीन, दसहरी इ.
  • दुसऱ्या प्रकारात मध्यम फळ देणाऱ्या आंब्याच्या सर्वोत्तम जाती येतात. उदा. मल्लिका, हिमसागर, आम्रपाली, केशर सुंदरजा, अल्फोन्झो इ.
  • प्रक्रिया केलेली वाणी बैंगनफली, अल्फोन्झो, तोतापारी इ.
  • याव्यतिरिक्त, उशीरा फळ देणारी वाण चान्स आणि फाजली आहेत.

 तथापि, या सर्व  जातींमध्ये भिन्न-भिन्न वैशिष्ट्ये आहेत.

 

 

 

 

 

 

फळांची काढणी आणि निगा

  • फळ तोडतांना देठ लांब राहूद्या.
  • फळे काढल्यानंतर फळे नीट स्वच्छ करावीत.
  • फळे नेहमी हवेशीर ठिकाणी ठेवा. •प्लास्टिकऐवजी, लाकडी पेट्या साठवण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात.
  • फळांना त्यांच्या आकारानुसार वेगळे करा.
  • आंबा तोडताना हे लक्षात ठेवा की फळ कधीही जमिनीवर पडू नये.
  • नेहमी हवादार कार्टूनमध्ये पेंढा किंवा कोरडी पाने टाकून आंबा बंद करा.ह्यामुळे फळ खराब होणार नाही.

 

 

 

 

English Summary: mango cultivation management Published on: 04 September 2021, 01:16 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters