सध्या कोरोना-या विषाणू संकटामुळे शेतकरी बांधव संभ्रमावस्थेत आहेत. सध्या उपलब्ध स्थितीमध्ये ज्या शेतकरी बांधवांना फळबाग लागवड करावयाची आहे त्यांनी काही महत्त्वाचे नियोजन करणे गरजेचे आहे.
तसेच नव्याने फळपिकांची लागवड केलेली आहे. त्यांनी या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये अशा फळबागांची काळजी घेणे अत्यंत जिकरीचे ठरते. त्याच प्रमाणे ज्या फळ बागायतदाराकडे उत्पादनक्षम विविध फळपिके फळधारणेवर असतील व फळ पिकांची काढणी करण्यायोग्य असतील त्यांनी अशा परिस्थितीत मध्ये काढणीच्या संदर्भात काही बाबी कटाक्षाने अमलात आणण्याचे गरजेचे आहे. फळपिकांची साठवण क्षमता कमी असल्याकारणाने व नाशवंत असल्याने त्वरित बाजारपेठेत पाठविणे किंवा प्रक्रिया करणे नितांत गरजेचे आहे.
नक्की वाचा:बातमी मोठी आनंदाची! खाद्यतेल होणार लवकरच स्वस्त
नव्याने लागवड केलेल्या फळबागांची जोपासना कशी करावी.
नव्याने लागवड केलेल्या फळबागांची सुरुवातीच्या काळात योग्य प्रकारे निगा राखल्यास हमखास उत्पादन मिळण्याची शक्यता असते. अशा फळपिकांची लागवड ओलिताखालील, सौरक्षितात्मक ओलिताखाली तसेच कोरडवाहू म्हणून केली जाते. सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे जोपासणे करण्याच्या दृष्टीने खालील बाबींचा विचार करणे पुढील उत्पादनाच्या दृष्टीने हितावह ठरेल.
1) लागवड केलेल्या कलमांना सरळ वाढविण्यासाठी बांबूच्या काठीचा आधार द्यावा.
2) ज्या शेतकऱ्यांनी वर प्रतिरोधक झाडे बागेभोवती लावले नसतील त्यांनी त्याची लागवड बागेभोवती करावी.
3) प्रत्येक कलमांची प्रखर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी झाडाभोवती वाळलेल्या गवताची तुरटीचा, कडव्याचा किंवा शेकरेट चा वापर करून खोपडी करावी व कमीत कमी दहा सेंमी उंचीचा वाळलेला पाला पाचोळ्याचे आच्छादन झाडाभोवती टाकावे आणि त्यास वळवीचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी.
4) झाडावर किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शिफारशीप्रमाणे संरक्षणात्मक उपाय योजावेत.
नक्की वाचा:आता आणि अशी करा सोयाबिन बियाणाची निवड व तयारी
5) कलमांच्या झाडाचे वय एक वर्षाचे झाल्यानंतर कलमा भोवताली 15- 20 सेंमी अंतर सोडून गोलाकार 15 सेंमी खोल व 30 सेंमी रुंद नाली खोदून त्यात शिफारशीप्रमाणे मुरलेले शेणखत आणि रासायनिक खते मातीत मिसळून द्यावी व ओल नसल्यावर त्वरित पाणी द्यावे.
6) छाटणी केल्यावर जमिनीतून तसेच खोडावर येणारे फुटवे वेळोवेळी काढावेत. तसेच पुढे फांद्या वाढविल्यानंतर मुख्य खोडांच्या खांद्यापासून 30 सेंमी अंतरावर येणारे फुटवे सुद्धा काढावेत. नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी -
7) ज्या शेतकऱ्यांना चालू वर्षात फळबाग लागवड करावयाची असेल त्यांनी खालील बाबींचा प्रकर्षाने विचार करायला हवा जेणेकरून या परिस्थितीत कमी कालावधीत फळबाग लागवडीची पूर्वतयारी शास्त्रोक्त पद्धतीने करता येईल.
1) जमिनीची निवड :- फळबागांना जमीन निवडताना फक्त जमिनीचा पृष्ठभाग पाहून चालत नाही तर खालील मातीचे परीक्षण महत्त्वाचे आहे. त्याकरिता लागवड करण्यापूर्वी 4 ते 5 ठिकाणी 1 ते 1.7 मीटर खड्डे खोदून परीक्षण करावे. जमिनीची खोली 1 मीटर असावी पाण्याची पातळी 3 मीटर असावी. जमिनीचा रासायनिक गुणधर्माचा विचार करता जमिनीचा आम्लनिर्देशांक 7 पर्यंत असावा. फळ झाडा करिता गाळाची उत्तम निचरा होणारी जमीन असावी. पूर्वमशागत जागा ची निवड करताना जागा स्वच्छ करावे. झाडे झुडपे तोडून जमीन नांगरून काढावी. नंतर जमीन समपातळीत आणावी.
2) कुंपणाची सोय :- नवीन लागवड केलेल्या झाडांचे भटक्या गुरापासून संरक्षण करणे फारच गरजेचे आहे. त्याकरिता चिलार सारख्या काटेरी झाडांचे कुंपण करावे.शक्य झाल्यास तारांचे कुंपण करावे बागेचे उष्ण वारा, थंडीपासून संरक्षण होण्याकरिता निलगिरी, शेवरी यांसारख्या उंच झाडांची बागेच्या पश्चिम व दक्षिण दिशेने 2 - 3 फुटावर लागवड करावी.
3) जातीची वाणाची निवड :- कोणत्याही पिकांची व्यापारी तत्त्वावर लागवड करावयाची झाल्यास त्या पिकांची उत्पादन क्षमता व प्रत अतिशय उत्तम असणे आवश्यक आहे. यासाठी वाणांची निवड अतिशय महत्त्वाची आहे. बागायतदार यांनी नमूद जातींचा प्रामुख्याने विचार करायला हवा. पीकनिहाय जातीमध्ये संत्रा( नागपूर संत्रा नागपुर सीडलेस ) मोसंबी (काटोलगोल्ड न्यसेलर) कागदी लिंब ( पिडीक व्हिलाईम पिडीक व्हिबहार, पिडीक व्हिचक्रधर, फुलेसरबती, प्रमालिनी. विक्रम ), आंबा ( केशर, दशेरी, मल्लिका, आम्रपाली, रत्ना ) पेरू ( एल-49 अलाहाबाद सफेदा, ललित, श्वेता ), चिकू ( कालीपत्ती, क्रिकेट, बॉल ) बोरकडाका, उमरानछुहारा, सोनूर - 6) आवळा ( बनारसी, कृष्णा, एन ए - 7, कांचन ) चिंच (अकोला स्मृती, प्रतिष्ठान), सिताफळ ( बालानगर, अंकासहान, जानकी, धारूर - 6 फुले पुरंदर), या जातींची लागवड करावी.
4) फळबागांची आखणी व आंतर :
फळझाडांची आखणी व अंतर पिक निहाय असल्याकारणाने यामध्ये चौरस, षटकोनी व उतार अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यानुसार प्रत्येक पद्धतीमध्ये हेक्टरी संख्या सारखी येणार नाही. संत्रा वर्गीय पिकात 64 मिटर, आंबा, चिकू, चिंच 10 × 10 मीटर तर पेरू, सीताफळ, आवळा या पिकात 444,547 मीटर अंतर उपयोगात येते.
5) खड्डा खोदणे व भरणे :
खड्डे खोदण्याचे काम एप्रिल - मे महिन्यात करावे. खड्डे तीन आठवडे तापू द्यावे. मे महिन्यात शेवटी किंवा जून मध्ये पहिल्या आठवड्यात खड्डे भरावे. भरताना माती अधिक शेणखत अधिक 2 - 3 किलो ( एस एस पी ) स्फुरद व एक कोणतेही बुरशीनाशक वापरावे.खड्डा भरताना 5 ते 7 सेमी जमिनीपासून उंच भरावा.
6) कलमारोपांची निवड व लागवडीची वेळ :
कलमे व रोपांवर फळबागेचे अंतरीमयश अवलंबून असते. बागे करिता उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण दर्जेदार कलम / रोपे निवडावीत. कृषी विद्यापीठातील रोपवाटिकेत किंवा शासकीय रोपवाटिकेतून कलमे घ्यावी. कलमांची निवड करताना ती किती उंच आहे ती योग्य त्या मातवक्ष झाडांपासून केली आहेत की नाही हे तपासणी किंवा खात्री करणे गरजेचे आहे.कलमांची लागवड पावसाळा सुरू झाल्यावर नक्कीच फायद्याची ठरते. अशा परिस्थितीत लागवडीनंतर मुळांची वाढ होण्यास पोषक वातावरण असते व कलमांची वाढ चांगली होते. आवश्यक वाटल्यास हलकेसे पाणी द्यावे व कलमांना काठीचा आधार द्यावा.
( स्त्रोत-किसान राज)
Share your comments