1. फलोत्पादन

डाळिंबावरील तेल्या रोगाचा प्रसार आणि या रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन

भारतामध्ये डाळिंब हे 1986 पर्यंत दुर्लक्षित व उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जायचे. परंतु कालांतराने औषधी गुणधर्मांमुळे याचे महत्त्व वाढीस लागले असून सन दोन हजार सात ते आठ नंतर डाळिंब खालील क्षेत्र उत्पादन वाढले. अशाप्रकारे अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले डाळिंब सध्या वेगवेगळ्या अडचणींमधून जात आहे. डाळिंबावरील विविध समस्यांपैकी तेल्या रोग एक मोठी समस्या आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
telya dalimb

telya dalimb

 भारतामध्ये डाळिंब हे 1986 पर्यंत दुर्लक्षित व उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जायचे. परंतु कालांतराने औषधी गुणधर्मांमुळे याचे महत्त्व वाढीस लागले असून सन दोन हजार सात ते आठ नंतर डाळिंब खालील क्षेत्र उत्पादन वाढले. अशाप्रकारे अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले डाळिंब सध्या वेगवेगळ्या अडचणींमधून जात आहे. डाळिंबावरील विविध समस्यांपैकी तेल्या रोग एक मोठी समस्या आहे.

या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. या लेखात आपण डाळिंबावरील तेल्या रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत माहिती घेऊ.

डाळिंबावरील तेल्या रोगास असलेल्या अनुकूल बाबी

1-या रोगाच्या जिवाणूंची वाढ 28 ते 32 अंश सेल्सिअस तापमान तसेच वातावरणातील आद्रता 80 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास झपाट्याने होते.

2- बागेत किंवा बागेत शेजारी तेलकट डाग रोगाचे अवशेष असणे

3- बागेत स्वच्छता असणे म्हणजे तणांचे मोठ्या प्रमाणावर वाढअसणे.

4- ढगाळ व पावसाळी हवामान, वादळी पाऊस आणि वातावरणातील आद्र्रता जास्त असणे.

5- रोगग्रस्त बागेतील गुट्टी कलमांचा वापर

या रोगाचा प्रसार कसा होतो?

 त्याचा प्रसार प्रामुख्याने बॅक्टेरीयल ब्लाईट ग्रस्त मातृवृक्ष पासून बनवलेल्या रोपा द्वारे होतो. याशिवाय रोगट डागांवर उडणारे पावसाचे थेंब, पाट पद्धतीने दिलेले ओलिताचे पाणी, निर्जंतुकीकरण करता वापरता येणारी छाटणीची अवजारे, शेतमजुरांच्या आवागमन तसेच विविध कीटक आधारे या रोगाचा प्रसार होतो.

तेल्या रोगाचे एकात्मिक रोग व्यवस्थापन

  • रोप कॅल्शियम हायड्रोक्लोराइड निर्जंतुक केलेला खड्ड्यात लावावे.
  • रोपांची लागवड कमीत कमी साडेचार मीटर बाय 30 मीटर अंतरावर करावी आणि प्रत्येक ठिकाणी तीन खोड लावावी.
  • स्वच्छता मोहीम काळजीपूर्वक राबवावी. खाली जमिनीवर पडलेले पाने गोळा करून नष्ट करावेत. बहार धरताना जमिनीवरील रोगट जिवाणूंची संख्या कमी करण्यासाठी ब्लिचिंग पावडर दीडशे ग्रॅम प्रति पाच ते सहा लिटर पाण्यात मिसळून झाडाखाली भिजवून करावे किंवा झाडाखाली भुकटीहेक्‍टरी 20 किलो धुरळावी.
  • फळे काढणी पावसाळ्यात झाली असेल तर ब्रोनोपोल 500 पीपीएम फवारावे. ( ब्रोनोपोल 50 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात )
  • संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर बागेला तीन महिने विश्रांती द्या.
  • बहार घेण्यापूर्वी संपूर्ण पानगळ करून घ्यावी तसेच रोगट फांद्यांची छाटणी करावी. खाली पडलेली संपूर्ण पाने व छाटलेली रोगट अवशेष गोळा करून जाळून टाकावीत.
  • छाटणी करताना खात्री प्रत्येक वेळी 1 टक्का  डेटॉल च्या द्रावणात निर्जंतुक करून घ्यावी.
  • छाटणी झाल्यानंतर लगेच कापलेल्या भागावर दहा टक्के बोर्डो पेस्ट लावावी.
  • झाडाच्या खोडाला नीम ओईल + बॅक्टेरिया नाशक (500पी पी एम )+ कॅप्टन 0.5टक्के याचा मुलामा द्यावा.
  • पानगळ व छाटणीनंतर बॅक्टरिया नाशक + कॅप्टन 0.5 टक्के यांची फवारणी करावी.
  • नवीन पालवी फुटल्यावर बॅक्टेरिया नाशक ( 250 पीपीएम)/ बोर्डो मिश्रण एक टक्का + कॅप्टन (25 टक्के) ची फवारणी करावी.
English Summary: management of bacterial blet disease in pomegranate Published on: 14 October 2021, 04:39 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters