1. फलोत्पादन

जैविक कीटकनाशके: अशा पद्धतीने बनवा दशपर्णी आणि नीमपर्ण अर्क व त्यांचे फायदे

जैविक पिक संरक्षणामध्ये पिकावरील कीड यांचा नैसर्गिक शत्रू शोधून त्याची कृत्रिम रीत्या वाढ करणे, त्याचा कीड नियंत्रणासाठी वापर करणे,तसेच पिकांवरील किडींचे व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी काही पारंपारिक कीटकनाशकांचा वापरशेतीमध्ये केला जातो.एकात्मिक कीड व रोगनियंत्रण व्यतिरिक्त वेगवेगळ्या वनस्पतींच्या अर्क काढून त्याचा वापर शेतकरी सेंद्रिय शेतीमध्ये करीत आहेत. या लेखामध्ये आपण दशपर्णी अर्क आणि निमपर्ण अर्क या विषयी माहिती घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-LCOA tips

courtesy-LCOA tips

जैविक पिक संरक्षणामध्ये पिकावरील कीड यांचा नैसर्गिक शत्रू शोधून त्याची कृत्रिम रीत्या वाढ करणे, त्याचा कीड नियंत्रणासाठी वापर करणे,तसेच पिकांवरील किडींचे व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी काही पारंपारिक कीटकनाशकांचा वापरशेतीमध्ये केला जातो.एकात्मिक कीड व रोगनियंत्रण व्यतिरिक्त वेगवेगळ्या वनस्पतींच्या अर्क काढून त्याचा वापर शेतकरी सेंद्रिय शेतीमध्ये करीत आहेत. या लेखामध्ये आपण दशपर्णी अर्क आणि  निमपर्णअर्कया विषयी माहिती घेऊ.

दशपर्णी आणि निमपर्णअर्क

दशपर्णी अर्क बनवण्यासाठी चे साहित्य

  • कडुलिंबाचा पाला पाच किलो
  • घाणेरी चा पाला पाच किलो
  • निरगुडी पाला दोन किलो
  • पपई चा पाला दोन किलो
  • गुळवेल / पांढरा धोत्रा 2किलो
  • रुई पाला
  • लाल कव्हेर पाला दोन किलो
  • बन एरंड पाला दोन किलो
  • करंज पाला दोन किलो
  • सिताफळ पाला दोन किलो
  • गोमूत्र दहा लिटर
  • देशी गायीचे शेण दोन किलो
  • गोण पाट

दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत

  • वरील सर्वप्रकारचा पाला बारीक करून 200 लिटर ड्रम मध्ये टाकावा.
  • त्यामध्ये दहा लिटर गोमूत्र टाकावे व देशी गायीचे शेण दोन किलो टाकून पूर्ण ड्रम 200 लिटर पाण्याने भरावा.हे द्रावण गोणपाटाने बंद करावे व हा ड्रम सावलीत तीस दिवस आंबवण्यासाठी ठेवावा.
  • हे द्रावण दिवसातून 2 ते तीन वेळा डावीकडून उजवीकडे ढवळावे.
  • हे द्रावण 30 दिवसानंतर गाळून घेऊन ते आपणास फवारणी करीता वापरता येते. हे द्रावण आपण सहा महिन्यापर्यंत वापरू शकतो.

दशपर्णी अर्क फवारणी साठी चे प्रमाण

अडीच लिटर औषध 200 लिटर पाण्यामध्ये एकत्र करून फवारावे किंवा 300 मिली औषध 15 लिटर पाण्यामध्ये एकत्र करून फवारावे.

पिकांवरील फायदा

 सर्व प्रकारच्या रसशोषण करणाऱ्या किडी, बोंड आळी तसेच पाने खाणाऱ्या अळ्या,नाग अळी साठी उपयुक्त आहे.

निम पर्ण अर्क

 साहित्य-

  • नीम पाला पाच किलो
  • जुने किंवा आंबवलेले गोमूत्र दोन लिटर

निमपर्ण अर्क तयार करण्याची पद्धत

  • पाच किलो नीम पाला बारीक ठेचुन घ्यावाव त्यामध्ये दोन लिटर गोमूत्र एकत्र करून 24 तास भिजत ठेवावे.
  • हे द्रावण 24 तासांनंतर गाळूनघेवून फवारणीस वापरावे.

 फवारणीसाठी प्रमाण

 15 लिटर फवारणी पंपासाठी 600 मिली औषध 14.400 लिटर+ 15 ग्रॅम खादी साबणाचा चुरा एकत्र करून फवारावे.

नीम पर्ण अर्क फवारणी चे फायदे

 केसाळ अळ्या, मावा,तुडतुडे,नाग आळी, विषाणूजन्य रोग साठी उपयुक्त आहे.( संदर्भ-मॉडर्न एग्रीटेक)

English Summary: making method bacterial insecticide like as dashparni ark and nimparn ark Published on: 17 December 2021, 12:37 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters