1. फलोत्पादन

हे आहेत प्रमुख विद्राव्य खते, पिकांना होतो त्यांचा भरपूर फायदा आणि उत्पन्नात होते भरघोस वाढ

पिकांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेच त्या अन्नघटकांच्या संबंधित विद्राव्य खतांची फवारणी केल्यास हे खते प्रभावीपणे कार्य करतात. विद्राव्य खतांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की हे खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणी द्वारे दिल्यास लोकांना जास्त फायदाहोतो. विद्राव्य खते पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावीत. या लेखात आपण प्रमुख विद्राव्य खते व त्यांचे उपयोग यांची माहिती घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-agrowon

courtesy-agrowon

 पिकांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेच त्या अन्नघटकांच्या संबंधित विद्राव्य खतांची फवारणी केल्यास हे खते प्रभावीपणे कार्य करतात. विद्राव्य खतांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की हे खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणी द्वारे दिल्यास लोकांना जास्त फायदाहोतो.  विद्राव्य खते पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावीत. या लेखात आपण प्रमुख विद्राव्य खते व त्यांचे उपयोग यांची माहिती घेणार आहोत.

 हे आहेत प्रमुख विद्राव्य खते

1-19:19:10,20:20:20-या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात. या खतांमध्ये नत्र हा घटक अमाईड, अमोनी कल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो.या खतामध्ये  पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण अधिक असते. नवीन मुळाच्या तसेच जोमदार शाखीय वाढ, मुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी या खतांचा उपयोग होतो.

2-12:61:0- या खताला मोनो अमोनियम फॉस्फेट असे देखील म्हणतात. यामध्ये अमो निकल स्वरुपातील नत्र कमी असते.यामध्ये पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण अधिक असते. नवीन मुळाच्या तसेच जोमदार शाखिय वाढ, मुळाची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो.

3-0:52:38- या खतास मोनो पोटॅशियम फॉस्पेट म्हणतात. यामध्ये स्फुरद व पालाश  यांना द्रव्य भरपूर आहेत.फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधी साठी हेखत उपयुक्त आहे.डाळिंब पिकामध्ये फळाच्या योग्य पक्वतेसाठी तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते.

4-13:0:45- या खतासपोटॅशियम नायट्रेट म्हणतात.यात नत्राचे प्रमाण कमी असूनपाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असतं. फुलोरा नंतरच्या अवस्थेत आणि पक्वअवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्ननिर्मिती व त्याच्या वाहनासाठीहे खत उपयोगी पडते. या खतामुळे अवर्षण स्थितीत पिकेतग धरू शकतात.

 

5-13:40:13-कपाशीला पात्या,फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबून कपाशीची बोंडे व अन्य पिकात शेंगांची संख्या वाढते.

6- कॅल्शियम नायट्रेट- मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात ठोंबे किंवा शेंगा वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.

7-24:28:0-यातील नत्र हा नायट्रेट व अमो निकल स्वरूपातील आहे. शाखीय वाढीच्या तसेच फुलधारणा अवस्थेत त्याचा वापर करतायेतो.

English Summary: kind of water soluble fertilizer that useful for crop Published on: 25 October 2021, 02:15 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters