शेतीसोबत फळपिकांची सुद्धा लागवड केली जात आहे जसे की खरबूज आणि टरबूज. या फळांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढत आहेच त्याचप्रमाणे याचे औषधी गुण सुद्धा चांगले आहेत. खरबूज फळ खायला स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगले मानले जाते. डिसेंम्बर ते मार्च या महिन्याच्या कालावधीत हे याची लागवड केली जाते. प्रामुख्याने हे फळ पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार मध्ये लावले जाते याव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये हे फळ लावले जाते ही एक विशेष बाब आहे.उन्हाळ्यामध्ये नदीच्या बाजूला बागायत शेतजमिनीत याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खरबूज गोड असुन त्यामध्ये जीवनसत्त्वे ए, बी, सी आहेत त्यामुळे बाजारात सुद्धा ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तुम्ही या फळपिकांची लागवड करून मोठ्या प्रमाणात कमाई करू शकता.
जमीन आणि हवामान:-
या फळासाठी मध्यम अशी काळी आणि सिंचनखालची जमीन योग्य आहे. मातीची पातळी ५.५ - ७ एम एम योग्य आहे तसेच तापमान पाहायला गेले तर उष्ण आणि कोरडे हवामान आणि मुबलक सूर्यप्रकाश आवश्यक असतो. वेल वाढीसाठी २४ अंश डिग्री सेल्सिअस ते २७ अंश डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक असते. १८ अंश पेक्षा कमी आणि ३२ अंश पेक्षा जास्त तापमान वेल वाढीसाठी धोकादायक आहे.
खताचे प्रमाण:-
९० किलो नायट्रोजन, ७० किलो फॉस्फरस, ६० किलो पोटॅश प्रति एकर अशी मात्रा खरबूज लागवडीसाठी द्यावी. रासायनिक खतांमध्ये निम्मी नायट्रोजन मात्रा तर शेतामध्ये वाफे बनवताना फॉस्फरस आणि पोटॅशचे संपूर्ण प्रमाण दिले जाते तसेच नायट्रोजन चे जे उरलेले प्रमाण आहे तर समान दोन भागात केले जाते. उभ्या पिकातील मुळांजवळ पेरणी केली की त्यानंतर २० दिवस आणि नंतर ४५ दिवसांनी डॉस द्यावेत. प्रति लिटर पाण्यात 3 मिलीग्रॅम बोरॉन, कॅल्शियम आणि मॅलिब्डेनम मिळसून फवारणी करावी त्यामुळे उत्पन्न वाढते आणि फळांची संख्या सुद्धा वाढते.
खरबूज वाण आणि लागवडच:-
शेत उभे आणि आडवे नांगरून वाफे तयार करून काशी मधु, हारा मधु, पंजाब सुनहरी आणि पंजाब हायब्रिड या वाणांची लागवड केली जाते. शेतामध्ये शेणखत टाकावे त्यामुळे उत्पादनात वाढ होते आणि पीक सुद्धा जोरात वाढते. खरबूज साठी प्रति एकर १.५ - २ किलो बियाणे आवश्यक आहेत.
रोगांपासून संरक्षण करण्यासाठी उपाय:-
पानाच्या तळाला पिवळे तपकिरी डाग दिसतात आणि नंतर पानांच्या देठामध्ये व फांद्यांमध्ये ते पसरले जातात. यासाठी तुम्हाला डिथेन झेड-78 ची फवारणी करावी. यामुळे रोग सरंक्षण होते.
Share your comments