सध्या शेतीमध्ये शेतकरी रासायनिक खतांचा बेसुमार वापर करतात. या रासायनिक खतांचा विघातक परिणाम हा आरोग्यावर होत असतो. इतकेच नाही तर या रासायनिक खतांच्या अती वापराने जमिनीच्या सुपीकतेवर देखील विपरीत परिणाम होतो.
म्हणून बरेच शेतकरी आता रासायनिक खतांच्या पर्याय शोधताना दिसतात. रासायनिक खतांचा पर्याय शोधणे ही आता काळाची गरज आहे. बरेच शेतकरी आता सेंद्रिय पद्धतीने शेती करीत आहेत. रासायनिक खतांना पर्याय म्हणून हिरवळीचे खत आहे एक उत्तम पर्याय आहे. या लेखामध्ये आपण हिरवळीचे खताचे फायदे आणि तयार करण्याची पद्धत सविस्तर जाणून घेऊ.
हिरवे खत आहे रासायनिक खताला उत्तम पर्याय
हिरवळीचे खत शेताला नायट्रोजन,फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, तांबे,मॅगेनीज आणि लोह इत्यादी पुरवतात. या खतांचा उपयोग रासायनिक खतांना पर्याय म्हणून करता येतो हिरवळीचे खत हे सर्वात सोपे आणि उत्तम साधन आहे. सध्या पशुधन कमी झाल्यामुळे शासनाच्या उपलब्धतेवर देखील अवलंबून राहण्याची गरज नाही. हिरवळीचे खत हे जमिनीची सुपीकता वाढवते.
हिरवळीच्या खताचे फायदे
- हिरवळीच्या खताच्या पिकांमुळे मातीचे गुणवत्ता सुधारते.जमिनीची जलधारण क्षमता वाढते त्यामुळे जमिनीतील आर्द्रता,सेंद्रिय कार्बन,नायट्रोजन आणि सूक्ष्म जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.हे पिके मातीची संरचना सुधारतात तसेच जमिनीत जैविक क्रीया वाढवितात. तसेच हिरवे खत पिकातील तन नियंत्रणास व पशुखाद्य पुरविण्यास मदत करतात. हिरवळीचे खत तयार करण्यासाठी जे पिके लावले जातात त्या पिकांमुळे जमिनीतील वातावरणात नायट्रोजन एकत्र करण्याचे काम करतात.
हिरव्या खतासाठी पिकांची निवड
- वेगाने वाढण्याची क्षमता असलेली पिकांची निवड करावी.
- सुमारे 30 ते 40 दिवसांनंतर हिरव्या खतासाठी पेरलेले पीक मातीमध्ये गाडावे.
- पिकांची मुळे खोल असणे आवश्यक आहे जेणेकरून ते जमिनीत जास्त खोल जाऊन अधिक पोषकद्रव्ये शोषू शकतील.
- निवडलेल्या पिकांमध्ये वातावरणीय नायट्रोजनचे तर्कसंगत करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
- ज्यामुळे जमिनीला अधिकाधिक नायट्रोजन उपलब्ध होऊ शकेल.
- पिकांची पाणी व पोषक द्रव्यांची बांधणी कमीतकमी असावी.
हिरवळीचे खत बनवण्याची पद्धत
- सुमारे 30 ते 40 दिवसांनंतर हिरवे खतासाठी लागवड केलेले पीक जमिनीत गाडावे.
- शेतात हे पीक गाडल्यानंतर दहा ते पंधरा किलो युरिया फवारणी मुळे रोपांचे लवकर विघटन होते.
- हे पिके शेतात मिसळल्यास सूक्ष्मजीव त्यांचे विघटन करतात व ते पिकाला खत म्हणून उपलब्ध होते.
- या पिकाची पेरणी करण्यापूर्वी हिरवे खत पीक मातीमध्ये घाला.
- हिरवे खत अधिक खोलवर मिसळू नये कारण हे पोषक तत्त्वांना खूप खोलवर दडपते.
- शेतामध्ये एका विशिष्ट टप्प्यावर पीक पल्टी केल्यास तुम्हाला जास्तीत जास्त नायट्रोजन चा फायदा होतो.
हिरवळीच्या खतासाठी वापरले जाणारे पिके
मसूर, मुग,उडीद, गवार इत्यादी पिके हिरव्या खतासाठी वापरली जातात. या व्यतिरिक्त बार्सीमआणि धैनंचा हि वापरला जातो.धैचाचीवनस्पती वाढ जलद असल्यामुळे आणि वानस्पतिक भागदेखील विघटनशील असल्याने हिरव्या खतासाठी यशस्वीरीत्या वापरला जाऊ शकतो.धैचाच्या रोस्ट्राटा आणि एक्यूलियाटा या दोन प्रजाती असून त्यांचा हिरवळीच्या खतासाठी वापर केला जाऊ शकतो.
Share your comments