1. फलोत्पादन

Coconut Farming: नारळ शेतीतील संधी आणि नारळाच्या उत्पादनाचे महत्त्व,वाचा महत्वाची माहिती

जर आपण नारळ शेतीचा विचार केला तर पटकन आपल्या डोळ्यासमोर येते ती कोकण किनारपट्टी व त्याठिकाणी असलेले नारळाच्या बागाच बागा. परंतु आता बहुतेक ठिकाणी नारळाची लागवड ही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये थोड्याबहुत प्रमाणात होऊ लागले आहे. अजूनही लागवडीचे प्रमाण कमी आहे परंतु सुरुवात होत आहे हे महत्त्वाचे आहे.जर आपण नारळ शेतीतील संधीचा विचार केला तर वर्षभर मागणी असणारे नारळ हे शेतकऱ्यांसाठी एक चांगला आर्थिक उत्पन्नाचा दीर्घकालीन स्त्रोत बनू शकतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
coconut farming

coconut farming

जर आपण नारळ शेतीचा विचार केला तर पटकन आपल्या डोळ्यासमोर येते ती कोकण किनारपट्टी व त्याठिकाणी असलेले नारळाच्या बागाच बागा. परंतु आता बहुतेक ठिकाणी नारळाची लागवड ही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये थोड्याबहुत प्रमाणात होऊ लागले आहे.

अजूनही लागवडीचे प्रमाण कमी आहे परंतु सुरुवात होत आहे हे महत्त्वाचे आहे.जर आपण नारळ शेतीतील संधीचा विचार केला तर वर्षभर मागणी असणारे नारळ हे शेतकऱ्यांसाठी एक चांगला आर्थिक उत्पन्नाचा दीर्घकालीन स्त्रोत बनू शकतो.

नक्की वाचा:Fertilizer: गंधकाचा वापर ठरेल ऊस उत्पादन वाढीत माईलस्टोन,वाचा सविस्तर माहिती

जर आपण नारळाच्या आरोग्यदायी गुणधर्मांचा विचार केला तर त्यातील पाण्यामध्ये सोडियम, कॅल्शियम, पोट्याशियम, मॅग्नेशियम तसेच फॉस्फरस,  लोह, तांबे तसेच क्लोरीन, विटामिन सी व सल्फर तसेच ब जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात.

नारळाच्या पाण्यामध्ये तहान भागवण्याचा गुणधर्म तर आहेच परंतु शरीरात असलेला ताप दूर करण्यासाठी देखील महत्वाचे गुण त्यामध्ये आहे. त्यामुळे नारळाला खूप मोठी मागणी असते. एवढेच नाही तर आपल्याला माहित आहे की धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा धार्मिक प्रसंगी नारळाची आवश्यकता असतेच असते.

 नारळ पाणी एक महत्त्वाचे उत्पादन

 संपूर्ण देशभरात नारळाच्या पाण्याला मागणी असून देशातील कुठल्याही भागांमध्ये नारळ पाण्याची विक्री खूप मोठ्या प्रमाणात होते. जर आपण दक्षिण भारताचा विचार केला तर या ठिकाणी नारळाच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी त्यावर प्रक्रिया करून बाटल्यांमध्ये नारळ पाणी विकले जाते.

नक्की वाचा:Cotton Tips: 'या' गोष्टीचा वापर करा आणि वाढवा कपाशीमध्ये पाते आणि फुलांची संख्या, वाचा सविस्तर

 यासाठी उत्तम प्रतीचे हिरवेगार नारळ निवडले जाते व प्रक्रिया युनिटमध्ये नेऊन पाणी बाहेर काढले जाते व नंतर ते फिल्टर करून बाटल्यांमध्ये पॅकिंग केले जाते. बाटलीबंद नारळाच्या पाण्याचे मार्केटिंग करणे तसे अवघड आहे

परंतु नारळाचे पाणी जवळपास सर्वत्र सहज उपलब्ध होते व हळूहळू त्याची बाजारपेठ तयार होत आहे. नारळ पाण्याचे निर्यात देखील आता वाढत असून युरोपीय देश तसेच आखाती देशांमध्ये व अमेरिकेत देखील नारळ पाण्याची निर्यात वाढत आहे. 

नारळाचे इतर भाग देखील महत्वाचे असून त्यापासून नारळाचे पावडर, नारळाचे दूध तसेच दुधाची पावडर, कॉयर फायबर आणि कोकोपीट सारखी उत्पादने तयार केली जातात व त्यापासून उत्तम प्रतीचे दोरखंड देखील बनवले जाते.

या शेतीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षभर चांगले उत्पन्न मिळू शकते. समजा तुमच्या शेतामध्ये दहा-बारा जरी नारळाची झाडे असतील तर नारळ सतत वाढत राहते व ते विकून तुम्हाला निश्चित उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतकरी बांधव शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोतासाठी नारळाची लागवड करू शकतात.

नक्की वाचा:Business Tips: बाजारपेठेचे गाव असेल तर 'हे' व्यवसाय देऊ शकतील आर्थिक समृद्धी,वाचा सविस्तर

English Summary: golden oppurtunity in coconut farming to farmer and can earn more profit Published on: 26 September 2022, 04:40 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters