1. फलोत्पादन

फळबागांसाठी घातक आहे फळमाशी

KJ Staff
KJ Staff


महाराष्ट्रातील शेतकरी आता पारंपरिक पिकांऐवजी फळ शेतीकडे वळला आहे.  परंतु फळे शेती करत असताना अनेक प्रकारचे रोग आणि किडींचा सामना फळ बागायतदारांना करावा लागतो. या सगळ्याकडे मध्ये जर सगळ्यात हानिकारक किडा असेल तर ती म्हणजे फळमाशी. ही फळमाशी फळ पिकांप्रमाणेच वेलवर्गीय फळ पिकांमध्ये तिचा प्रादुर्भाव दिसून येतो.  फळमाशी ही बॅक्ट्रोसेरा प्रजातीची कीड असून तिच्या जगभरात जास्त प्रमाणात प्रजाती आहेत.  त्यातील मुख्य शंभर प्रजातींमध्ये फळपिकांचे मोठे नुकसान करण्याची क्षमता असते. मुख्यत्वेकरून या किडीचा प्रादुर्भाव जानेवारीच्या शेवटी दिसायला लागतो.

ही कीड प्रमुख्याने आंबा, पेरू, सिताफळ व कधीकधी डाळिंब फळ पिकावर ही दिसते. तसेच कारले, काकडी, कलिंगड, खरबूज, भोपळा यासारख्या वेलवर्गीय फळ पिकांवरही तिचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो. मुख्यत्वेकरून अशा लक्षात येते की काकडी या वेलवर्गीय फळ पिकावर जास्त प्रभाव असतो. 

फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास दिसणारी लक्षणे

  • फळमाशीचा प्रादुर्भाव झालेली फळे ही वेडीवाकडी दिसतात.
  • फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे लहान फळेही पक्व वाटायला लागतात, तसेच फळांमध्ये कडकपणा येतो.
  • प्रादुर्भाव झालेल्या फळांमध्ये अळ्या पडतात व फळांना बुरशी लागते.
  • फळमाशीचा प्रादुर्भाव झालेली फळेही डाग आलेली दिसतात व मोठ्या प्रमाणात फळगळ होते.

 

फळमाशीचे जीवन चक्र

फळमाशीच्या एका वर्षात अनेक पिढ्या तयार होतात. त्यांच्या विशिष्ट जीवन चक्रामुळे फळमाशी कमी वेळात मोठ्या प्रमाणात उत्पत्ती करते. फळमाशीच्या मादीच  नराशी मिलन झाल्यानंतर फळाच्या सालीखाली 700 ते 900 अंडी पुंजके तयार होतात. त्या पुंजका मधून तीन ते चार दिवसात अळ्या बाहेर पडतात. त्यानंतर या अळ्या फळे कुजवतात. त्यानंतर या अळीचा कोष तयार होतो, जेव्हा फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे फळगळ होते. तेव्हा या गळलेल्या फळातील कोश मातीत मिसळतात व या कोषातून प्रौढ फळमाशी जन्माला येते. फळमाशी ही कोरंटाईन कीड म्हणून ओळखली जाते. युरोप, अमेरिका आदी देशांमध्ये ही फळमाशी कोरंटाईन किड म्हणून जाहीर करण्यात आली आहे. म्हणून या देशांना फळांची निर्यात करताना व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. 

फळमाशीच्या नियंत्रणासाठी उपाय

  • जर आपण आंबा, पेरू, सिताफळ, कलिंगड, कारले, काकडी इत्यादी पिके घेत असाल तर त्या बागांमध्ये मक्षीकारी सापळे वापरायला हवेत.
  • फळबागा नेहमी तण विरहित व स्वच्छ ठेवावीत. जर आपण सामूहिक स्तरावर नियंत्रण केले तर अधिक फायद्याचे ठरते.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters