1. फलोत्पादन

रोपवाटिका उद्योग गरज आणि संधी

फळझाडांची अभिवृद्धी करून त्यांची काही काळ काळजीपूर्वक संगोपन करण्यात येणाऱ्या ठिकाणास “रोपवाटिका” असे म्हणतात. वनस्पतीची अभिवृद्धी हे शास्त्र आणि कला यांचा संगम अथवा मिश्रण आहे. चांगल्या झाडाच्या बियापासून चांगली झाडे तयार होतात, हे निसर्गाचे आपल्याला शिकवले आहे. बियापासून वृद्धी करण्याचे काम मानवाच्या ध्यानात आल्यानंतर काही काळात त्याच्या असेही लक्षात आले कि, बियापासून वाढविलेली सर्व झाडे एकसारखी वाढत नाहीत आणि फळांच्या गुणवत्तेतही फरक पडतो. गुटी कलमाचा शोध आणि वापर सर्वप्रथम चीन देशात लिचीच्या झाडावर झाला भारतात कंदमुळापासून अभिवृद्धी करण्याचे तंत्र रामायण काळापासून अवगत आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
हरितगृहातील  रोपवाटिका  व्यवस्थापन

हरितगृहातील रोपवाटिका व्यवस्थापन

फळझाडांची अभिवृद्धी करून त्यांची काही काळ काळजीपूर्वक संगोपन करण्यात येणाऱ्या ठिकाणास “रोपवाटिका” असे म्हणतात. वनस्पतीची अभिवृद्धी हे शास्त्र आणि कला यांचा संगम अथवा मिश्रण आहे. चांगल्या झाडाच्या बियापासून चांगली झाडे तयार होतात, हे निसर्गाचे आपल्याला शिकवले आहे. बियापासून(seeds) वृद्धी करण्याचे काम मानवाच्या ध्यानात आल्यानंतर काही काळात त्याच्या असेही लक्षात आले कि, बियापासून वाढविलेली सर्व झाडे एकसारखी वाढत नाहीत आणि फळांच्या गुणवत्तेतही फरक पडतो. गुटी कलमाचा शोध आणि वापर सर्वप्रथम चीन देशात लिचीच्या झाडावर झाला भारतात कंदमुळापासून अभिवृद्धी करण्याचे तंत्र रामायण काळापासून अवगत आहे.

आंबा(Mango) भेटकलमाची कल्पना मोगलांनी भारतात आणली तर मोसंबीत डोळे भरण्याची कला पोर्तुगीजांनी वृद्धिंगत केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. उतीसंवर्धन आणि जैविक तंत्रज्ञान शास्त्राने आता चांगलीच गती घेतली असून पुढील काळात जवळजवळ सर्वच फळझाडे शाखीय अथवा सूक्ष्म पद्धतीने अभिवृधीत केली जातील असे वाटते.

रोपवाटीकेचे फायदे :

  • रोपवाटिकेतून आपणास आयती कलमे-रोपे उपलब्ध होत असल्यामुळे स्वतः कलमे रोपे न करता फळबागा लावता येतात.
  • कलमे रोपे तयार करण्यासाठी वेळ, पैसा व श्रम वाया जात नाहीत.
  • कलम रोपांच्या गुणवत्तेची खात्री असल्याने शंका राहत नाही.
  • दुर्मिळ कलमे सहजासहजी उपलब्ध होऊ शकतात.
  • फळबागा लावण्यास एक प्रकारचे प्रोत्साहन मिळते.

     हेही वाचा:पपई पिकावरील रिंग स्पॉट व्हायरस किंवा पपया मोझॅक रोगाचं कसं कराल व्यवस्थापन

रोपवाटीकेची गरज :

अलीकडे फळांची मागणी वाढत आहे. विविध प्रकारचे नवीन फळझाडेही लागवडीसाठी येत आहेत. तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे आंतरदेशीय बाजारपेठांचे जाळे अधिक बळकट होत आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यातूनही रोजगार हमी योजना, फळबाग लागवड योजना, वृक्ष लागवड योजना, औषधी वनस्पती वृद्धी योजना यासारख्या योजना राबविल्या जात आहेत. कोरडवाहू फळपिके, क्षारयुक्त जमिनीत लागवड, डोंगर उतारावर लागवड यामध्ये वाढ होत आहे आणि यामुळे रोपवाटीकेंची गरज वाढत आहे. आज मागणी आणि पुरवठा यात बरच अंतर आहे.

रोपवाटिका प्रस्थापित करताना पुढील बाबी विचारात घ्याव्यात:

  • कोणत्या प्रकारची रोपवाटिका प्रस्थापित करावयची आहे?
  • किती कालावधीत रोपवाटिका कार्यरत ठेवायची आहे?
  • किती कलमे-रोपे उत्पादित करावयाची आहे?
  • किती जमीन हवी आहे?
  • पाणी
  • रोपवाटीकेसाठी मजुरांची उपलब्धता कशी आहे?
  • मातृवृक्ष
  • कलमे-रोपे करण्यासठी निवारा, आडोसे, गृहे.
  • खुंट-रोपे वाढविण्यास जागा.
  • कलमा-रोपांना हार्डनिंग करणे.

महत्त्वाच्या पिकांची अभिवृद्धी करण्यासाठी लागणारी खुंट रोपे:

  आंबा: ओलर, बाप्पाकई, चंद्रकरन, कुरुक्कन, गोवा बेल्लरी.

  संत्री: जांभिरी, कर्णखट्टा, क्लिओपात्रा, रंगपूर लाईम.

  द्राक्षे: डॉग्रीज, जॉर्ज.

  पेरू: सफेदा, फ्लोरिडा.

  चिकू: खिरनी, पाला.

  फणस: रुद्राक्षी.

महत्त्वाच्या पिकांची अभिवृद्धी पद्धत:

  आंबा: कोयकलम, शेंडाकलम.

  चिकु: शेंडाकलम, भेटकलम, दाबकलम.

  द्राक्षे: फाटे कलम, डोळेभरणे, खोगीर कलम.

  पेरू: दाबकलम.

  काजू: शेंडा कलम.

  केळी: मुनवे, कंद, उतीसंवार्धीत.

  संत्री: डोळे भरणे.

  फणस: शेंडा कलम.

  नारळ: बियापासून.

  पपनस: डोळे भरणे.

  स्ट्रॉबेरी: रनर्स.

  अननस: मुनवे.

  मिरी: फाटे कलम.

  सुपारी: बी फळापासून.

  जायफळ: डोळे भरणे.

रोपवाटीकेशी संबधित अनुदानाची माहिती :

  • राष्ट्रीय बागवानी मंडळ: प्रकल्प किमतीच्या २०% अनुदान credit link back ended subsidy (कर्जाशी संलग्न अनुदान) रु. २५,००,०००/- पर्यंत ४ हे. क्षेत्रासाठी.
  • एकात्मिक बागवानी विकास अभियान (midh.gov.in): ४ हे. क्षेत्राच्या हाय-टेक नर्सरी साठी रु. २५,००,०००/- प्रती. हे. असा खर्च अपेक्षित धरून प्रकल्प किमतीच्या ४०% अनुदान दिले जाते. जास्तीत जास्त अनुदान रु. ४०,००,०००/- प्रती रोपवाटिका
    मुख्य अट: कमीत कमी ५०,००० कलमे प्रती वर्ष हेक्टर तयार करणे आवश्यक आहे.
  • लघुरोपवाटीका (small nursery): १ हेक्टर क्षेत्रासाठी. रु. १५,००,०००/- प्रती हेक्टर असा खर्च अपेक्षित आहे आणि त्यासाठी कमीतकमी रु. ७,५०,०००/- प्रती रोपवाटिका असे अनुदान दिले जाते.

        मुख्य अट: कमीत कमी २५,००० कलमे प्रती वर्ष हेक्टर तयार करणे आवश्यक आहे.

  • प्रमाणिकरण करण्याच्या दृष्टीकोनातून रोपवाटीकेचे आधुनीकीकरण करण्यासाठीचे अनुदान: ४ हे. क्षेत्रासाठी रु. १०,००,०००/- पर्यंत अनुदान दिले जाते. खाजगी रोपवाटिका धारकांसाठी ५०% म्हणजेच ४ हे. क्षेत्रासठी रु. ५,००,०००/- पर्यंत अनुदान दिले जाते.

उत्पादनाचा दर्जा कायम राखण्यासाठी दर्जेदार कलमांची आवश्यकता असते. महाराष्ट्र शासनाने रोपवाटिका व्यवस्थापनातून ग्राहकांची, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये व महाराष्ट्र राज्य फळपिक उत्पादनात तसेच कलमे रोपे निर्मितीत अग्रेसर राहावे म्हणून १९७६ साली महाराष्ट्र फळांचे रोपमळे नियम हा कायदा राज्यभर लागू केला आहे. या कायद्याअंतर्गत कलमांची निर्मिती, चांगल्या दर्जेदार मुळकांडांचा वापर विवक्षित फळांच्या रोपांची आयात, निर्यात किंवा परिवहन तयार होत असलेल्या कलमांची नोंद ठेवणे या सर्व बाबींवर नियंत्रण केले जाते.

कु. स्नेहल ग. रगजी, कु. तेजारती प्र. सौदागर, कु. इंद्रायणी गवस, प्रा. महेश कुलकर्णी
(डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली)

English Summary: Fruit Crop Nursery Management Scope & Importance Published on: 06 July 2018, 10:17 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters