1. फलोत्पादन

जमिनीची सुपीकता टिकवायची असेल तर फायदेशीर जिवाणूंची संख्या वाढविणे गरजेचे

आपल्या निसर्गाने जमिनीमध्ये असंख्य सूक्ष्मजीव वास्तव्यास घातले. त्यामध्ये जिवाणू, विषाणू,बुरशी आदींचा समावेश आहे. जिवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्ये व अन्न घटक वितरणाचे व उपलब्ध करण्याचे कार्य करतात. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायचे असेल तर जमिनीतील फायदेशीर जिवाणूंची संख्या वाढविणे फार गरजेचे असते

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the land soil

the land soil

आपल्या निसर्गाने जमिनीमध्ये असंख्य सूक्ष्मजीव वास्तव्यास घातले. त्यामध्ये जिवाणू, विषाणू,बुरशी आदींचा समावेश आहे. जिवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्ये व अन्न घटक वितरणाचे व उपलब्ध करण्याचे कार्य करतात. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायचे असेल तर जमिनीतील फायदेशीर जिवाणूंची संख्या वाढविणे फार गरजेचे असते

या फायदेशीर जीवाणूंमध्ये रायझोबियम, ऍझोटोबॅक्‍टर, निळे, हिरवे शेवाळ वातावरणातील निसर्गतः उपलब्ध असलेला  नत्र स्थिर करतात. त्याच प्रमाणे स्फुरद विरघळणारे जिवाणू जमिनीमध्ये नैसर्गिक आता उपलब्ध असलेल्या घट्ट स्वरूपातील स्फुरदाचे विघटन करून द्राव्य स्वरूपातीलस्फूरदात रूपांतर करतात. सध्याच्या काळात मायकोरायझा जिवाणू ला बरेच महत्त्व आले आहे. त्याच्या वापरामुळे पिकांना जास्तीत जास्त किंवा पुरेशा प्रमाणात स्फूरदाचा तसेच पाण्याचा, अन्य सूक्ष्म अन्नघटक यांचा पुरवठा होत असतो.

 जिवाणू संग म्हणजे डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्म व जिवंत सूक्ष्मजीवांचे संघहोय.ते बियाण्यांना लावल्याने मातीत वापरल्याने किंवा सेंद्रिय पदार्थात टाकल्यामुळे ठराविक ठिकाणी नत्र स्थिर करणाऱ्या, स्फुरद विरघळणाऱ्या व सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या कार्यक्षम जिवाणूंच्या संख्येत खूप वाढ होते.त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन जमिनीचा पोत सुधारतो व काही प्रमाणात बुरशी रोधक द्रवाचा स्त्रावहोत असल्याने रोगाचे पण नियंत्रण केले जाते. जैविक खतांच्या उपयुक्त क्रियेने जमिनीत असलेले जिवाणू पिकांना अन्नद्रव्य पुरवण्याचे कार्य करतात.

रायझोबियम जैविक संवर्धक अॅझोटोबॅक्टर जैविक संवर्धक..

 स्फुरद विरघळणारे जिवाणू यांना इंग्रजी मध्ये फॉस्फरस सोलूबिलायसिंग बॅक्टेरिया म्हणजेच पीएसबी असे संबोधले जाते. या जैविक संवर्धक यांचा वापर सर्व पिकांकरिता होतो. ट्रायकोडर्मा ही एक जैविक बुरशीनाशक बुरशी आहे. या जैविक संवर्धक याचा वापर सर्व पिकांकरिता होतो. आपल्या उत्पादनातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपली जमीन. पूर्वी काळापासून शेतकरी जमिनीत विविध पिके घेत आला आहे. पूर्वीच्या काळात सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकण्याचे प्रमाण जास्त होते. सहाजिकच जमिनीचा पोत टिकण्यास आपोआप मदत होत असे. आता परिस्थिती उलट निर्माण झाली. अन्नधान्याची गरज जशी वाढू लागली, तसा जमिनीतून अधिकाधिक उत्पादन काढण्याकडे कल गेला.

त्यामध्ये जीवाणू संवर्धनाचा अभाव दिसत आहे. परिणाम काय तर आपल्या शेतातील पिकांमध्ये मरचे व प्रमाण भरपूर वाढले ते म्हणजे जमिनीतील उपयुक्त जिव कमी झाले. आता वेळ आहे जिवाणूंची संवर्धन करणे म्हणजे जिवाणूंचे अन्न तयार करून जिवाणूंचे  संगोपन करून शेतीला बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता रासायनिक, सेंद्रिय व जैविक खतांच्या वापरात समतोल राखून जमिनीचा कस कमी होऊ न देता उत्पादन वाढ करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी रासायनिक खताला पर्याय म्हणून जैविक खताचा किंवा जीवाणू संघाचा वापर करणे हे फायदेशीर ठरू शकते.

 लेखक

 मिलिंद जी. गोदे

 युवा शेतकरी मित्र

English Summary: for soil fertility is nessesary is organic bacteria to promotion soil Published on: 08 January 2022, 02:39 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters