मोहोर संरक्षण : आंबा मोहोर संरक्षणासाठी क्रायसोपली कार्निया या परोपजीवी किडीच्या १o ते १५ हजार अळ्या प्रति हेक्टर झाडावर सोडाव्यात अथवा व्हर्टिसिलियम लेकॅनी या बुरशीवर आधारित कीटकनाशक ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे किंवा कार्बारिल (५० टक्के) २० ग्रॅम अधिक पाण्यात मिसळणारे ८० टक्के गंधक हे २० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
आंबा मोहोर संरक्षणाचे वेळापत्रक :
१) ऑक्टोबरचा तिसरा आठवडा क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली + सायपरमेश्रीन १० टक्के ५ मिली + डायथेन एम-४५ ३०ग्रॅम + १० लिटर पाणी.
२) १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम + इमामेक्टीन बेझोएट ५ ग्रॅम + १o लिटर पाणी.
३) १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान मिथिल डिमिटॉन २o मिली + ८o टक्के सल्फर २० ग्रॅम + १o लिटर पाणी.
४) १ ते ५ डिसेंबर दरम्यान डायक्लोरोव्हॉस २० मिली + प्रोपिकोनॅझॉल ५ मिली + डायकोफॉल २o मिली + १o लिटर पाणी.
५) २० ते २५ डिसेंबर दरम्यान कार्बन्डॅझीम १o ग्रॅम + स्पिनोसॅड ५ मिली + १० लिटर पाणी
६) फळे साधारणपणे ज्वारीच्या आकाराची झाल्यानंतर जिब्रेलीक ऍसीड १ ग्रेम अएँसिटोन ६० मिली किवा अल्कोहोल १०० मिली + १ किलो युरिया अचिलेटेड झिंक २५० ग्रॅम + १oo लिटर पाणी.
शेतकऱ्यांना हक्काचा पिकविमा मिळाच पाहिजे, शेतकरी संघटना आक्रमक..
करपा : रोगाचा प्रादुर्भाव जुन्या पानांपेक्षा नवीन पानांवर जास्त होतो. पानांची रोगग्रस्त देठे काळी पडतात, पाने खाली वाकतात, लक्षण दिसून येते. काही वेळा डागांमुळे संपूर्ण फळ पडते. डागांवर खोल चिरा निर्माण होतात. बुरशी फळात खोल शिरते व फळे नासतात.
नियंत्रण: या रोगाच्या नियंत्रणासाठी काबॅन्डेझीम एक ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बांडगुळे: जुन्या झाडांवर बांडगुळे मोठ्या प्रमाणावर वाढतात. फांद्यांना अत्रपुरवठा न झाल्याने फांद्या सुकतात, उपाय म्हणून संबंधित फांद्या छाटून टाकाव्यात.
भुरी: आंबा फळपिकावरील फारच नुकसानकारक असा हा रोग आहे. या रोगामुळे मोहरावर व दांड्यावर कवकाची पांढुरकी वाढ होते. रोगाचा प्रसार वा-यामुळे होतो. या बुरशीची बीजे कोवळ्या मोहोरावर किंवा पालवीवर उगवतात.
त्यांची मुळे मोहोराच्या पेशींमध्ये शिरून अन्नरस शोषतात, सुरुवातीला रोगाची लागण मोहोराच्या शेंड्याच्या भागात होऊन नंतर इतरत्र पसरते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणत झाल्यास आंब्याच्या मोहोराचे जवळपास ७o ते ८० टक्के नुकसान होऊ शकते.
नियंत्रण : प्रादुर्भावग्रस्त झाडावर हेक्झाकोनॅझोल ५ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
महत्वाच्या बातम्या;
12 कोटींचा रेडा आणि 31 लिटर दुध देणार म्हस!! भीमा कृषी प्रदर्शनाकडे लागले सर्वांचे लक्ष..
हुरडा पार्ट्यांचा फक्कड बेत, गावाकडे अनेकांनी थाटली दुकाने, मिळतात चांगले पैसे..
शेतकऱ्यांनो शेती सोबत एक पोल्ट्री टाकाच, रोज एक कोटी अंड्यांचा आहे तुटवडा..
Share your comments