1. फलोत्पादन

हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा, किंमत ऐकाल तर थक्कच व्हाल

KJ Maharashtra
KJ Maharashtra
mango

mango

 आपल्याला आंब्याचे बरेचसे प्रकार माहीत आहेत. केशर, हापुस , तोतापुरी इत्यादी. त्यामध्ये जर आपल्याला कोणी विचारले तर यातील महाग  आंबा  कोणता? तर आपण पटकन उत्तर देतो हापूस. परंतु या लेखामध्ये आम्ही तुम्हाला जगातील सगळ्यात जास्त महाग आंब्या विषयी माहिती देणार आहोत. कारण हा आंबा भारतातील नव्हे तर जपान मधील आहे.  या आंब्याचे नाव आहे ताईयो नो तामागो आणि याची बाजारातील किंमत ही लाखो रुपयात आहे.

 या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दुकानात मिळत नाही तर तो लिलावात विकत घ्यावा लागतो. या आंब्याचा दिल आहात दरवर्षी केला जातो आणि या दोन आंब्याची किंमत तीन लाख रुपये पर्यंतही पोहोचते.

 यावर्षी जगातील कोणता आंबा सर्वात रुचकर आणि महाग आहे याचीही बरीच चर्चा रंगली आणि त्याला कारण ठरली होती पाकिस्तानची मेंगो डिप्लोमसी. परदेशाची आपले संबंध सुधारण्यासाठी यंदाच्या हंगामात पाकिस्तानकडून अनेक परदेशी दूतांना आंब्याच्या पेट्या पाठवले गेल्या. परंतु बऱ्याच देशांनी त्या स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तानची मेंगो डिप्लोमसी यशस्वी झाली नाही, परंतु त्यामुळे जगातील सर्वात महाग आणि उत्तम आंब्याची चर्चा रंगली.

जर आंब्याच्या जातींचा विचार केला तर भारतातील हापूस हा सर्वात स्वादिष्ट  आंबा मानला जातो. या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर रंग, वास आणि चव असलेल्या या आंब्याला जी आय टॅग मिळाला असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी मागणी असते. परंतु जगातील सर्वात महाग आंब्यांचा मान मात्र जपानी आंब्याने पटकावला  आहे. ताईयो नो तामागो नावाचा अंबा जपानमधील मियाझरी प्रांतात पिकवला जातो. या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे आंब्याला गोडव्यांसाह अननस आणि नारळाचे स्वाद असतो.  या आंब्याला एका विशिष्ट पद्धतीने पिकविले जाते. या आंब्याचे प्रत्येक फळ झाडावर असताना जाळीच्या कपड्याने बांधले जातात आणि हा आंबा झाडावरून तोडला जात नाही. आंबा पिकल्यावर तो जाळीत अडकून राहतो. मग ते आंबे तोडून विक्रीसाठी बाजारात आणले जातात. आंबा खायला अतिशय स्वादिष्ट आणि चविष्ट असतो. त्याचा रंग आणि त्याचा वासही अत्यंत विलक्षण  असतो. या आंब्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा फळांच्या दुकानात मिळत नाही, तर त्याचा लिलाव होतो व लिलावात सर्वाधिक किंमत देणारे व्यक्तीलाच हे फळ मिळते. 2017 मध्ये यासाठी दोन लाख 72 हजार रुपये मोजले गेले होते. या आंब्याची जपानी संस्कृतीत एक विशेष महत्त्व आहे. थांबा सूर्यप्रकाशात विकत असल्याने त्याला एग ऑफ द सन असे म्हणतात. तिथले लोक गिफ्ट म्हणून हा अंबा देतात. या आंब्याची भेट मिळणारचे नशीब सूर्यासारखे  चमकते असे मानले जाते. हा आंबा जपान मध्ये मोठा सण आणि उत्सव याप्रसंगी भेट म्हणून  दिला जातो.

मग ते आंबे तोडून विक्रीसाठी बाजारात आणले जातात. आंबा खायला अतिशय स्वादिष्ट आणि चविष्ट असतो. त्याचा रंग आणि त्याचा वासही अत्यंत विलक्षण  असतो. या आंब्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा फळांच्या दुकानात मिळत नाही, तर त्याचा लिलाव होतो व लिलावात सर्वाधिक किंमत देणारे व्यक्तीलाच हे फळ मिळते. 2017 मध्ये यासाठी दोन लाख 72 हजार रुपये मोजले गेले होते. या आंब्याची जपानी संस्कृतीत एक विशेष महत्त्व आहे. थांबा सूर्यप्रकाशात विकत असल्याने त्याला एग ऑफ द सन असे म्हणतात. तिथले लोक गिफ्ट म्हणून हा अंबा देतात. या आंब्याची भेट मिळणारचे नशीब सूर्यासारखे  चमकते असे मानले जाते. हा आंबा जपान मध्ये मोठा सण आणि उत्सव याप्रसंगी भेट म्हणून  दिला जातो.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters