बियाणे जमिनीत लावल्यानंतर किंवा पेरल्यानंतर त्याच्या उगवल्यापासून ते काढणीपर्यंतचा कालावधीत वाढ,फलधारणा होण्याच्या प्रत्येक टप्प्यात जमिनीतून मिळणाऱ्या नायट्रोजन,पालाश,स्फुरदया मुख्य घटकांची आवश्यकता असते. त्याबरोबरच लोह, जस्त, तांबे,मॅगेनीज व बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते.
जर हे सगळे घटक पिकांना योग्य प्रमाणात मिळाले,इतर पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होते.जमिनीमध्ये या घटकांची कमतरताअसली तर पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. या लेखात आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची पिकांवर होणारे लक्षणे जाणून घेणार आहोत.
सुक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे
- तांबे- तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर प्रथम झाडाची कोवळी पाने गर्द हिरवी पडतात व काही कालांतराने फिकट पिवळी होऊनगळून पडतात. पाने पिवळी होऊन दुमडतात व देठाजवळ वाळतात.फुलधारणा च्या काळात फुले न उमलता फुले गळून पडतात. ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांमध्ये कणसांमध्ये पुरेशी दाणे भरत नाहीत.फळझाडांमध्ये ही झाडाची शेंडे गळून पडतात.
- लोह- लोहाच्या कमतरतेमुळे कोवळ्या पानांच्या शिरांमधील भागपिवळा पडतो. शेंडा मात्र हिरवा राहतो.पानांना हिरवा रंग येण्यासाठी जरी आपण नत्राचा उपयोग केला तरी पानांना हिरवा रंग येत नाही.पीक फुलोऱ्यात येण्याच्या प्रक्रियेमध्ये अनियमितता येते.फळ पिकांमध्ये फळांचा आकार लहान होतो व नवीन फांद्या वाकड्या होतात.
- जस्त-या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे झाडांच्या शेंड्याची वाढ मर्यादित प्रमाणात होऊन, त्याचे रूपांतर पुर्ण गुच्छात होते.पानांमध्ये हरितद्रव्याचा अभाव दिसून येतो.त्यामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो.बऱ्याच ठिकाणी पाने जाळून त्यांची पानगळ होते. दपिकाला फुलोरा काही प्रमाणात येऊन पिक फुलांवर येण्यास उशीर होतो.तसेच फळझाडांमध्ये फळांचा आकार लहान होतो.
- बोरान- बोरानच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडून ते पाने खडबडीतवकडक होतात.त्यांचा आकार बेढब होतो. पिकांच्या शेंड्याकडील भागात जे कोवळी पाने येतात ते पाने वाळून मुख्य शेंडा मरतो.
- मॅग्नीज-मॅग्नीज अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे बरीचशी पानही करपल्या सारखे दिसतात.त्यावर तपकिरी रंगाचे डाग येतात व पान जाळीदार दिसते.पानांच्या शिरा हिरव्या व आतील भाग पिवळा दिसतो.कालांतराने पाने गळून पडते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे निरीक्षण करून वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसल्यास संबंधित सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करून पिकांची स्थिती उत्तम बनवावी.
Share your comments